काही जणींचे केस अजिबातच वाढत नाहीत. अगदी ६ - ६ महिने होऊन जातात तरीही केसांची इंचभरही वाढ झालेली नसते. त्या तुलनेत केसांचं गळणं मात्र खूप जास्त वाढलेलं असतं. या तुलनेत जर केस सातत्याने गळत राहिले तर लवकरच टक्कल पडेल की काय अशी भीती वाटते. तुमचंही तसंच झालं असेल तर लगेचच हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय करायला अतिशय सोपा आहे आणि केसांसाठी खूपच गुणकारी (most simple remedy for fast hair growth). यामुळे केस तर भराभर वाढतीलच पण केस गळणंही खूप कमी होऊन जाईल.(best home remedy to control hair fall)
केसांची वाढ होण्यासाठी सोपा घरगुती उपाय
केसांची वाढ होण्यासाठी तसेच केस गळणं कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करावा याविषयीची माहिती clubfunny327 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
तुम्ही पाहिले का हे संक्रांत स्पेशल पतंग कानातले? पतंगबाजीच्या दिवसांत थीमनुसार करा मस्त फॅशन
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका लाेखंडाच्या कढईमध्ये अर्धा लीटर पाणी घ्या आणि ते गॅसवर गरम करायला ठेवा.
जेव्हा पाण्याला उकळी यायला सुरुवात होईल तेव्हा त्यामध्ये २ चमचे जवस, २ चमचे मेथी दाणा आणि २ चमचे तांदूळ घाला.
हे पाणी चांगलं उकळू द्या. जेव्हा पाणी घट्ट व्हायला सुरुवात होईल तेव्हा गॅस बंद करा. पाणी थोडं कोमट झालं की ते एका वाटीमध्ये गाळून घ्या. तुम्ही जेवढं पाणी घेतलं असेल त्याच्या साधारण एक चतुर्थांश पाणीच वाटीमध्ये जमा होईल.
पौष्टिक म्हणून नेहमीच शिळी पोळी, शिळा भात खाता? आहारतज्ज्ञ सांगतात शिळं खायचंच तर..
आता त्या पाण्यात आणखी ५० मिली साधं पाणी घाला आणि दोन्ही पाणी व्यवस्थित हलवून एकत्र करून एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
दर दोन दिवसांनी हा स्प्रे केसांच्या मुळाशी मारा आणि हळूवार हाताने मसाज करा. महिन्यातून १२ ते १३ वेळा हा उपाय करा. महिनाभरातच तुम्हाला केसांमध्ये खूप छान फरक जाणवेल आणि केस गळणं कमी होऊन त्यांची वाढही होऊ लागेल.