त्वचेची काळजी घेण्यात आपण बऱ्याचदा कमी पडतो. शिवाय आपल्या त्वचेला रोजच धूळ, धूर, प्रदूषण, ऊन या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. बऱ्याच जणींच्या आहारात तर पौष्टिक पदार्थांचीही कमतरता असते. याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो आणि मग कमी वयातच त्वचेवर वांगाचे डाग दिसू लागतात. याशिवाय ॲक्ने किंवा त्वचेवर बारीकसे खड्डे दिसणे आणि पिंपल्सचे प्रमाणही खूप वाढलेले दिसते (Best Home Remedy To Get Rid Of Pimples And Acne). तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर इतर कोणतेही कॉस्मेटिक्स चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हा एक घरगुती उपाय एकदा नक्की करून बघा. तुमच्या त्वचेमध्ये खूप छान फरक दिसून येईल.(how to remove pimples and acne from skin?)
पिंपल्स, ॲक्ने कमी करण्यासाठी घरगुती उपाय
तुमच्या चेहऱ्यावर जर खूप पिंपल्स, ॲक्ने झाले असतील तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय fashionwithfahad या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
'या' पद्धतीने डोक्याला लावा एरंडेल तेल! टक्कल पडलेल्या भागातही उगवतील केस-होतील घनदाट
हा उपाय करण्यासाठी कडुलिंबाची १५ ते २० पाने घ्या आणि ती व्यवस्थित धुवून घ्या. कडूलिंबाच्या पानांमध्ये एंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्स कमी करण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो.
कडुलिंबाची पाने मिक्सरमध्ये टाका आणि त्याची बारीक पेस्ट करा. ही पेस्ट गाळणीने गाळून घ्या. आता भांड्यात जे पाणी जमा झालेलं असेल त्या पाण्यात १ चमचा एलोवेरा जेल, १ चमचा मध, २ टेबलस्पून गुलाब जल आणि २ टेबलस्पून बेबी वॉश क्रिम टाका.
हे सगळे पदार्थ व्यवस्थित हलवा आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
कॉटन साडीवर घालायला कलमकारी ब्लाऊज शिवायचं? बघा ८ सुंदर पॅटर्न्स- दिसाल एकदम स्टायलिश
तुम्हाला चेहरा जेव्हा धुवायचा असेल तेव्हा इतर कोणतेही फेसवॉश किंवा साबण न वापरता हा फेसवॉश वापरून तुमचा चेहरा धुवा.
दिवसातून २ वेळा याचा वापर करा. यामुळे काही दिवसांतच त्वचेवरचे पिंपल्स, बारीकसे खड्डे निघून जातील आणि त्वचा छान स्वच्छ, नितळ आणि चमकदार होईल.