Join us  

केस गळणं खूप वाढलंय? १ आवळा-चमचाभर मेथी; घरगुती तेल बनवा, पटापट वाढतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 12:32 PM

Best Homemade Hair Oil For Hair Growth : हे तेल बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात अर्धी वाटी तिळाचं तेल गरम करून घ्या.

घरगुती पदार्थ कधी कधी मोठ्या समस्यांवर फायदेशीर ठरू शकतात. हेअर फॉलचा त्रास आजकाल सगळ्याच वयोगटातील मुलामुलींना जाणवतो. (Best Homemade Hair Oil For Hair Growth) केसांचं सौंदर्याच्या दृष्टीनं फार महत्व आहे. जर केस गळून गळून पातळ झाले असतील किंवा टक्कल पडलं असेल तर आत्मविश्वास कमी होतो आणि पर्सनॅलिटीवरही याचा परिणाम होतो. केसाचं गळणं थांबवण्यासाठी बाजारात अनेक तेलं, शॅम्पू उपलब्ध आहेत पण त्याचा उपयोग सर्वांनाच होत नाही. (Hair oil for healthy hair growth)

अनेक उपाय करून, पैसे खर्च करूनही चांगले केस मिळत नाही. त्यापेक्षा जर घरगुती उपाय करून पाहिले आणि तुमचे केस पुन्हा आधीसारखे दाट झाले तर कमी खर्चात केसांचा रिजल्ट दिसेल. केस वाढण्यासाठी आणि केसांचं  गळणं लवकरात लवकर थांबवण्यासाठी घरच्याघरी तेल कसं बनवायचं ते पाहूया. (Which oil is best for healthy hair growth)

घरगुती तेल कसं बनवायचं?

हे तेल बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात अर्धी वाटी तिळाचं तेल गरम करून घ्या. त्यात अर्धी वाटी नारळाचं तेल घाला. त्यात एलोवेरा, आवळा, कढीपत्ता, कलौंजी आणि मेथीच्या बिया, कांदा  घाला. हे पदार्थ चांगले तळून घ्या काळपट, ब्राऊन झाल्यानंतर गॅस बंद करा.

केस पातळ झाले? १ चमचा नारळाचं तेल अन् एलोवेरा; घरी करा खास सिरम, भराभर वाढतील केस

थंड झाल्यानंतर तेल गाळून एका बाटलीत भरून घ्या. हे तेल आठवड्यातून २ किंवा ३ वेळा लावल्यास केसांवर चांगला परिणाम दिसून येईल. रात्री हे तेल लावून चांगली मसाज करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ पाण्यानं धुवा. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्सहेल्थ टिप्स