केस पातळ होण्याची समस्या हल्ली खूपच वाढली आहे. प्रत्येक वेळी केस विंचरताना ते एवढे गळतात की ते प्रमाण पाहून आपल्याला लवकरच टक्कल पडेल की काय अशी भीती वाटते. असं होण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे केसांना पुरेसं पोषण न मिळणं. केसांना पुरेसं पोषण मिळालं नाही, तर त्यांची मुळं पक्की राहात नाहीत (home remedies for reducing hair loss). त्यामुळे मग केस गळणे, मुळापासून तुटून येण्याची समस्या वाढते आणि केस पातळ होतात. यासाठीच हा एक सोपा उपाय करून पाहा. (how to control hair fall)
केस पातळ झाले असतील तर काय उपाय करावा?
केस पातळ झाले असतील तर केसांची मुळं पक्की होऊन ते दाट होण्यासाठी काय उपाय करावा, याची माहिती rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
गोल गरगरीत ढेरी येण्याची ४ कारणं, पोट सुटूच द्यायचं नसेल तर फक्त ‘हे’ एवढंच करा..
यामध्ये असं सांगितलं आहे की इतर कोणताही महागडा उपाय करण्याऐवजी हा एक अगदी सोपा आणि स्वस्तात मस्त उपाय करून पाहा. काही आठवडे हा उपाय नियमितपणे केल्यास लवकरच केसांची चांगली वाढ झालेली दिसून येईल, शिवाय केसही दाट होतील.
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये २ टेबलस्पून खोबरेल तेल घ्या.
त्यामध्ये १ टेबलस्पून कॅस्टर ऑईल टाका. कॅस्टर ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा फॅटी ॲसिड उत्तम प्रमाणात असते. या दोन्ही पदार्थांमुळे केसांचे गळणे कमी होते.
स्टीलच्या नळांना, शॉवरला पांढरट डाग पडले? यापैकी कोणताही १ उपाय करा- नळ होतील चकाचक
खोबरेल तेल आणि कॅस्टर ऑईलच्या मिश्रणात ७ ते ८ थेंब रोजमेरी इसेंशियल ऑईल टाका. केसांसाठी ते एक सर्वोत्तम ऑईल मानलं जातं कारण केस दाट होण्यासाठी त्यातले घटक अतिशय उपयुक्त ठरतात.
आता या तेलाने केसांच्या मुळाशी मसाज करा. त्यानंतर एखाद्या तासाने कोणताही सल्फेट फ्री शाम्पू वापरून केस धुवून टाका. हे तेल रात्री केसांना लावून दुसऱ्या दिवशी केस धुतले तरी चालेल. आठवड्यातून १ वेळा हा उपाय करावा.