आपल्या आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. प्रत्येक ऋतुमानानुसार आपण त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे स्किन केअर रुटीन फॉलो करत असतो. चेहऱ्यावर जमा झालेली धुळ आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासठी स्क्रबिंग करणे फार गरजेचेअसते. आपण स्क्रबिंग करुन चेहऱ्याची खोलवर स्वच्छता करू शकता. जेव्हा चेहरा डल होतो तेव्हा स्क्रबिंगच्या (Homemade Face Scrubs to Help You Get That Glow) मदतीने आपण चेहऱ्याची त्वचा उजळ करू शकतो. स्क्रबिंग केल्यावरच त्वचा अॅक्टिव्ह होते आणि यामुळेच त्वचा इतर प्रोडक्ट्स योग्य प्रकारे शोषून घेऊ शकते(Celebrity yoga trainer Anshuka Parwani).
सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. सणांच्या दिवसांत सर्वांनाच सुंदर दिसायची इच्छा असते. असे असले तरीही धूळ, प्रदूषण आणि माती यामुळे त्वचेवर टॅन (tanning) जमा होऊन त्वचा काळवंडते. अशा परिस्थितीत आपली त्वचा निर्जीव दिसू लागते. त्वचेवरील डेड स्किन (Gentle Homemade Face Scrubs For Glowing Skin) सेल्सचा थर (dead skin) हटवण्यासाठी आपण घरी बनवलेल्या स्क्रबचा (EXFOLIATE YOUR SKIN WITH EFFECTIVE HOMEMADE FACE SCRUBS) वापर करू शकता. स्क्रब केल्याने मृत त्वचा, घाण आणि धूळ निघून जाण्यास मदत होते. यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते. सेलिब्रिटींची योगा ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) हिने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यात तिने फेस स्क्रबिंग (Homemade Scrubs For Glowing Skin) करण्यासाठी किचनमध्ये असणाऱ्या घरगुती पदार्थांचा वापर करुन नैसर्गिकरीत्या फेसस्क्रब कसे तयार करायचे याविषयी अधिक माहिती दिली आहे(Homemade Face Scrubs That You Need To Try Right Now).
फेस स्क्रब करण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. टोमॅटो - अर्धा तुकडा २. कॉफी - १ टेबलस्पून ३. मध - १ टेबलस्पून४. साखर - १ टेबलस्पून
हनुवटीवरची चरबी खूप वाढल्यानं जॉ लाइन दिसतच नाही ? परफेक्ट जॉ लाइन मिळवण्यासाठी ८ सोपे उपाय...
फेस स्क्रबिंग कसे करावे :-
फेस स्क्रबिंग करण्यासाठी सर्वातआधी टोमॅटो अर्धा कापून घ्यावा. या अर्ध्या कापलेल्या टोमॅटोवर प्रत्येकी १ टेबलस्पून कॉफी, मध, साखर घालून घ्यावे. त्यानंतर या टोमॅटोने चेहऱ्याच्या त्वचेवर हलक्या हातांनीं चोळून सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करुन घ्यावा. ५ ते १० मिनिटे हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करून घेतल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. हा घरगुती फेसस्क्रब आपण आठवड्यातून १ ते २ वेळा वापरु शकतो.
फेशियल तर करतोच पण हे मेडी फेशियल नेमकं काय आहे, फेशियलचा नवा ट्रेंड...
गोरं करण्याचा दावा करणाऱ्या फेअरनेस क्रिम्स रोज वापरल्या तर खरंच रंग उजळतो का ?
फेस स्क्रबिंग करण्याचे फायदे :-
१. कॉफी, साखर यांचे मिश्रण आपल्या त्वचेवरील निस्तेजपणा दूर करण्यासाठी एखाद्या टॉनिकप्रमाणे कार्य करते. कॉफीमुळे त्वचेच्या पेशींमधील रक्तप्रवाह वाढतो तर साखरेमुळे त्वचेला ग्लुकोजचा पुरवठा होतो.
२. कॉफी आणि साखरेमुळे आपल्या त्वचेमध्ये ऊर्जेचा प्रवाह जलदगतीने वाढतो. याचबरोबर टोमॅटोमुळे त्वचेला पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि त्वचेवरील मृत पेशींची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते.
स्टील वाटी मसाज थेरपी ऐकली आहे कधी ? महागडे फेशियल विसराल असा भारी फुकट फॉर्म्युला...
३. चेहऱ्याला टोमॅटो व मधापासून तयार केलेला फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, तर साखर एक उत्कृष्ट एक्सफोलिएटर आहे. ज्यामुळे त्वचेच्या संबंधित अनेक समस्या दूर होतात.
४. मध हे नैसर्गिक ब्लीच आहे आणि याच्या वापराने आपल्या चेहऱ्यावर वय दिसून येत नाही. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म आपली त्वचा अधिक चमकदार होण्यासाठी आणि अॅक्नेशी लढा देण्यासाठी मदत करतात.
५. स्किन एजिंग थांबवण्यासाठी कॉफी मधील अँंटिएजिंग ऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात मदत करतात. त्यामुळे आपला चेहरा अधिक तरूण दिसतो.