Lokmat Sakhi >Beauty > रोज २ वेळा धुवूनही चेहऱ्यावर पिंपल्स येतात? पाण्यात 'हा' पदार्थ मिसळा; ग्लोईंग, फ्रेश दिसेल चेहरा

रोज २ वेळा धुवूनही चेहऱ्यावर पिंपल्स येतात? पाण्यात 'हा' पदार्थ मिसळा; ग्लोईंग, फ्रेश दिसेल चेहरा

Best Homemade Oatmeal Face Pack For Glowing Skin (Chehra Kasa Dhuvaycha) :  साध्या पाण्याने चेहरा धुण्यापेक्षा जास्त सोपे उपाय करून तुम्ही चेहरा चमकवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 09:09 PM2023-11-13T21:09:49+5:302023-11-15T09:23:26+5:30

Best Homemade Oatmeal Face Pack For Glowing Skin (Chehra Kasa Dhuvaycha) :  साध्या पाण्याने चेहरा धुण्यापेक्षा जास्त सोपे उपाय करून तुम्ही चेहरा चमकवू शकता.

Best Homemade Oatmeal Face Pack For Glowing Skin : Mix Oats With Water For Glowing Face Wash For Skin Care | रोज २ वेळा धुवूनही चेहऱ्यावर पिंपल्स येतात? पाण्यात 'हा' पदार्थ मिसळा; ग्लोईंग, फ्रेश दिसेल चेहरा

रोज २ वेळा धुवूनही चेहऱ्यावर पिंपल्स येतात? पाण्यात 'हा' पदार्थ मिसळा; ग्लोईंग, फ्रेश दिसेल चेहरा

सगळ्याच मुली आपली चेहऱ्याची काळजी घेण्याबाबत  जागरूक असतात. कारण आपला चेहरा सुंदर, ग्लोईंग दिसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते अशावेळी स्किन केअर रूटीनकडे लक्ष देणं फार महत्वाचे असते. (Chehra Kasa Dhuvava) बदलत्या  वातावरणाचा त्वचेवरही परिणाम होतो.  त्वचेवर तुम्ही काही पदार्थांचा वापर करून ग्लोईंग चेहरा मिळवू शकता. (Best Homemade Oatmeal Face Pack For Glowing Skin)

केमिकल्सयुक्त पदार्थ त्वचेला नुकसान पोहोचवतात.  यापेक्षा तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करू शकता किंवा स्किन केअर रूटीनमध्ये बदल करून  सुंदर ग्लोईंग चेहरा बनवू शकता.  साध्या पाण्याने चेहरा धुण्यापेक्षा जास्त सोपे उपाय करून तुम्ही चेहरा चमकवू शकता. (Mix Oats With Water For Glowing Face Wash For Skin Care)

ओट्स वॉटरने चेहरा धुण्याचे फायदे

ओट्सचे सेवन तब्येतीसाठी उत्तम मानले जाते. त्याचप्रमाणे त्वचेवर ओट्स  गुणकारी ठरतात. ओट्सचे पाणी त्वचेला मॉईश्चराईज ठेवण्यात मदत करते. याव्यतिरिक्त हिवाळ्याच्या दिवसांतही  तुम्ही या पाण्याने तोंड धुवू शकता. यामुळे त्वचा मॉईश्चराईज राहण्यास मदत होते आणि मॉईश्चराईजर लावण्याची गरज पडत नाही. ज्या लोकांची त्वचा तेलकट असते. त्यांच्यासाठी ओट्स वॉटरने तोंड धुणं फायदेशीर ठरू  शकते.

हलवायासारखी खुसखुशीत बालूशाही घरीच करा; फक्त ३ वस्तूंनी बनेल परफेक्ट-रसरशीत बालूशाही

ओट्स वॉटर कसं तयार करायचं?

ओट्स वॉटर  बनवणं खूपच सोपं आहे. त्यासाठी एक ग्लास पाणी घ्या आणि गरम करण्यासाठी ठेवा. पाणी उकळल्यानंतर एक चमचा ओट्स मिसळा. काही वेळानंतर पाणी आणि ओट्स वेगळे करून घ्या. या पाण्याने चेहरा धुवा. दिवसातून कमीत कमी दोन वेळा हा उपाय करा. पाण्याने चेहरा धुणं फायदेशीर ठरू शकतं.

हा उपाय करताना काही गोष्टींची काळजी घ्या. या पाण्याने चेहरा धुताना साबण किंवा फेस वॉश ज्या प्रमाणे वापरता त्याप्रमाणे ओट्सचं घट्ट मिश्रण वापरा. ओट्सच्या पाण्याने चेहरा धुतल्यानंतर १५ मिनिटांनी साध्या पाण्याने चेहरा धुवा. या उपायाने चेहरा  दीर्घकाळ फ्रेश राहण्यास मदत होईल. तुम्ही ओट्समध्ये दूध आणि हळद मिसळून याचा फेसवॉशही तयार करू शकता. ज्यामुळे चेहरा ताजा-तवाना राहण्यास मदत होईल. 

Web Title: Best Homemade Oatmeal Face Pack For Glowing Skin : Mix Oats With Water For Glowing Face Wash For Skin Care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.