आजकाल बरेच जण केसांच्या निगडीत समस्येने त्रस्त आहेत. पांढरे केस, केसात कोंडा, केसांची वाढ खुंटणे, यासह इतर समस्येमुळे केस निर्जीव दिसतात (Hair care Tips). केसांची योग्य वाढ व्हावी म्हणून आपण ब्यूटी उत्पादनांचा वापर करतो (Beauty Tips). पण यामुळे केस आणखीन खराब होऊ शकतात.
केसांच्या वाढीसाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करतो. पण फक्त खोबरेल तेल पुरेसं नाही आहे. त्यात ३ गोष्टी मिसळा. होमिओपॅथी डॉक्टर हेमंत श्रीवास्तव यांनी केसांसाठी खोबरेल तेलात कोणत्या गोष्टी मिसळायच्या, याची माहिती दिली आहे. या घरगुती तेलामुळे केसांना नवीन जीवन मिळेल(Best Homeopathic Treatment For Premature Greying Of Hair and Hair fall).
केसांची गळती रोखण्यासाठी होमिओपॅथी उपाय
खोबरेल तेल
व्हिडिओमध्ये हेमंत यांनी जबरांडी, अर्निका आणि ब्राह्मी हे तिन्ही घटक खोबरेल तेलात मिसळण्यास सांगितले. तयार तेल आठवड्यातून स्काल्पला लावून मसाज करावे. यामुळे केस मजबूत होतात.
घरातल्या कुंडीत कडीपत्ता वाढतच नाही? त्यात घाला चमचाभर 'ही' पांढरी गोष्ट; मिळतील भरपूर सुगंधी पाने
जास्वंदाची फुलं
केसांच्या वाढीसाठी जास्वंदाची फुलं फायदेशीर ठरू शकतात. यासाठी मिक्सरच्या भांड्यात ५ जास्वंदाची फुलं, पानं, एलोवेरा जेल आणि एक चमचा खोबरेल तेल घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट स्काल्पला लावा. आठवड्यातून एकदा आपण या हेअरमास्कचा वापर करू शकता.
मेथी दाणे
केसांच्या वाढीसाठी मेथी दाणे फायदेशीर ठरते. यात प्रोटीन, विटामिन - सी असते. जे स्काल्प हेल्दी ठेऊन केस अधिक घनदाट आणि लांबसडक करण्यास मदत करतात.
कोण म्हणते ' त्या ' मैत्रिणी नसतात, एकमेकींवर जळतात! बघा, सेलिब्रिटी मैत्रिणींच्या या खास जोड्या
भोपळ्याच्या बिया
केसांसह आरोग्यासाठीही भोपळ्याच्या बिया फायदेशीर ठरते. यात झिंक, सेलेनियम, कॉपर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आढळतात. आपण भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश करू शकता.