Join us  

१ बटाटा-१ टोमॅटो-१ लिंबू, ब्लिच करण्याचा घरगुती उपाय - पार्लरला जायचंच विसराल मिळेल असा ग्लो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2023 6:42 PM

Here's How You Can Make Facial Bleaches Using Natural Ingredients : ब्लीचिंग करताना येणारा तीव्र वास आणि स्किनला सौम्य जळजळ होत असूनसुद्धा, काहीजणी नियमितपणे ब्लीच करतात, यापेक्षा घ्या घरगुती ब्लिचिंगचा सोपा पर्याय...

आपल्यापैकी काही स्त्रिया या फेस ब्लिचिंग व फेशियल हे दर महिन्याला न चुकता करण्याचे रुटीन फॉलो करतात. साधारणतः त्वचा उजळण्यासाठी, टॅनिंग काढण्यासाठी आणि चेहऱ्यावरील केस लपवण्यासाठी त्वचेवर ब्लीचिंग केले जाते. चेहऱ्याच्या केसांना ब्लीच केल्याने चेहेऱ्याला इंस्टंट चमक येते. ब्लीचमध्ये असलेले हायड्रोजन पेरोक्साईड रसायन चेहऱ्याच्या केसांचा रंग हलका सोनेरी बनवते, ज्यामुळे चेहरा पूर्वीपेक्षा अधिक चमकतो. चेहऱ्यावरील केसांमुळे चेहऱ्याचा रंग असमान आणि डार्क दिसतो. त्यामुळे जेव्हा या केसांचा रंग ब्लीचने हलका सोनेरी केला जातो तेव्हा चेहरा उजळ आणि चमकदार दिसू लागतो(Here's the best homemade face bleach recipe).

चेहऱ्याच्या केसांना थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करुन काढणे खूप वेदनादायक असू शकते, म्हणून ते ब्लीच करणे (Easy Homemade Bleach for Face- Instant Natural Skin Glow) हा एक सोपा उपाय आहे.(best natural bleach for face and how to make them at home) याशिवाय, ब्लीचिंगमुळे पिगमेंटेशन, डाग आणि टॅनिंग देखील हलके होऊ शकते. ब्लिचिंग (How To Do Facial Bleach At Home) करताना येणारा तीव्र वास आणि स्किनला सौम्य जळजळ होत असूनसुद्धा, काहीजणी  नियमितपणे ब्लीच करतात. त्वचेला नियमितपणे ब्लीच करणे अजिबात चांगले नाही, कारण याचा आपल्या त्वचेच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होऊ शकतो. वारंवार ब्लीच केल्यामुळे त्वचा ठिसूळ होऊ शकते, त्वचेला लालसरपणा येऊ शकतो, त्वचा पातळ होऊ शकते आणि मुरुमांची समस्या वाढू शकते. आपल्या त्वचेसाठी बाहेरील रासायनिक, केमिकल्सयुक्त ब्लीचचा वापर करण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा(Natural Bleach) आपण वापर करु शकतो. घरच्या घरी होममेड ब्लीच बनवण्याची सोपी कृती पाहुयात(Homemade Facial Bleaches To Restore Your Natural Complexion At Home).

होममेड ब्लीच नेमके कसे बनवावे ? 

प्रत्येकी १ छोटा बटाटा, टोमॅटो, लिंबू घेऊन त्याचे लहान - लहान तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतल्यानंतर एका गाळणीत ओतून व्यवस्थित गाळून घ्यावे. गाळून घेतलेल्या या मिश्रणात प्रत्येकी १ टेबलस्पून बेसन, तांदुळाचे पीठ, आंबेहळद घालूंन हा ब्लीच फेसपॅक व्यवस्थित ढवळून घ्यावा. आपले घरगुती नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तयार केलेले होममेड ब्लीच तयार आहे. 

हनुवटीवरची चरबी खूप वाढल्यानं जॉ लाइन दिसतच नाही ? परफेक्ट जॉ लाइन मिळवण्यासाठी ८ सोपे उपाय...

मेकअप किटमधील कॉम्पॅक्ट पावडर फुटून त्याचा भुगा झाला ? १ सोपी ट्रिक, कॉम्पॅक्ट पावडर अशी करा सेट...

हेअर ब्रश स्वच्छ करण्यासाठी ६ सोपे उपाय, एका मिनिटांत कळकट - घाणेरडा हेअर ब्रश होईल स्वच्छ...

टोमॅटो-कॉफी-मध साखर; सेलिब्रिटी योग ट्रेनर अंशुका परवानी सांगते खास फेसस्क्रब, चेहऱ्यावर येईल ग्लो...

हे ब्लीच वापरावे कसे ? 

हे होममेड ब्लिच तयार झाल्यानंतर आपल्या चेहेऱ्यावर हळूहळू बोटांनी लावून घ्यावे. चेहऱ्यावर सगळीकडे हे ब्लीच व्यवस्थित पसरवून लावल्यानंतर हलक्या बोटांनी ३ ते ५ मिनिटे मसाज करून घ्यावा. मसाज केल्यानंतर हे ब्लिच १५ ते २० मिनिटे किंवा संपूर्ण सुकेपर्यंत चेहेऱ्यावर तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर एका छोट्या बाऊलमध्ये २ ते ३ टेबलस्पून दूध घेऊन कापसाच्या बोळ्याच्या मदतीने ते संपूर्ण चेहेऱ्यावर लावून घ्यावे. आता चेहेरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी