Lokmat Sakhi >Beauty > विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस; धुण्याआधी 'या' तेलानं मसाज करा-मिळवा दाट केस

विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस; धुण्याआधी 'या' तेलानं मसाज करा-मिळवा दाट केस

Caster oil Is Best Oil For Hair Growth (erandel telache fayde) : या तेलात एंटी बॅक्टेरिअल, एंटी फंगल गुण असतात. ज्यामुळे स्काल्प इन्फेक्शन आणि खाज येण्याचा त्रास टळतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 12:32 PM2023-10-30T12:32:12+5:302023-10-30T13:47:58+5:30

Caster oil Is Best Oil For Hair Growth (erandel telache fayde) : या तेलात एंटी बॅक्टेरिअल, एंटी फंगल गुण असतात. ज्यामुळे स्काल्प इन्फेक्शन आणि खाज येण्याचा त्रास टळतो.

Best Oil For Hair Growth : How to use caster oil for hair growth arandi telache kesanna fayde | विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस; धुण्याआधी 'या' तेलानं मसाज करा-मिळवा दाट केस

विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस; धुण्याआधी 'या' तेलानं मसाज करा-मिळवा दाट केस

केस वाढवण्यासाठी काय  करावं असा प्रश्न सर्वच महिलांना पडलेला सगळ्यात कॉमन प्रश्न आहे. (Hair Growth Tips) केस गळून  आपण म्हातारे दिसू  का टक्कल पडेल की काय अशी भिती अनेकांच्या मनात असते. केसांच्या वाढीसाठी पोषण मिळणं फार महत्वाचं असतं. (Erandel tel kesanvar kase lavave) खाण्यापिण्यातून आणि  हेअर केअर उत्पादनांमधून केसांना पोषण मिळते. (Hair Care Tips)  एरंडेल तेलाचा वापर पूर्वापार घरगुती उपायांमध्ये केला जातो. सौंदर्य प्रसाधनातही एरंडेल तेलाचे फार महत्व आहे. (How to use caster oil for hair growth)

याच्या औषधी गुणांमुळे अनेक फार्मास्युटिकल कंपन्यांचे हे पसंतीचे आहे.  पातळ केस, केसांना फाटे फुटणं यासाठी हा सगळ्यात प्रभावी उपायांपैकी एक आहे. यात एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी बॅक्टेरियलल गुणांमुळे अनेक ब्युटी प्रोडक्टसमध्ये हा कॉमन घटक असतो. प्रोटीन्स, मिनरल्स आणि व्हिटामीन ई ने परिपूर्ण असल्यामुळे हे तेल एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. (Which is Best Oil For Hair Growth)

एरंडेल तेलाचे फायदे (How to use castor oil for hair growth and thickness)

केस गळणं रोखते-केसांच्या वाढीसाठी गुणकारी 

एरंडेल तेलात रिसिनोलिक एसिड आणि ओमेगा ६ फॅटी एसिड असते. जे स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढवते आणि केसांची वाढ चांगली होते. यातून केसांना पोषक तत्व मिळण्यास मदत होते. याशिवाय केसांची मुळे मजबूत होतात. एका छोट्या भांड्यात एरंडेल  तेल घेऊन त्यात नारळाचे तेल मिसळा. थोडं तेल आपल्या हातावर घेऊन व्यवस्थित मालिश  करा. नंतर केस शॉवर कॅपने व्यवस्थित झाकून घ्या. शक्य असल्यास रात्रभरासाठी असेच लावून ठेवा. दुसऱ्य दिवशी केस पाण्याने स्वच्छ धुवा. 

स्काल्प इन्फेक्शन पासून बचाव होतो

या तेलात एंटी बॅक्टेरिअल, एंटी फंगल गुण असतात. ज्यामुळे स्काल्प इन्फेक्शन आणि खाज येण्याचा त्रास टळतो.  हिवाळ्यात केसांमध्ये जास्त कोंडा होत असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईलबरोबर १ मोठा चमचा एरंडेल तेल लावू शकता. यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून व्यवस्थित केसांना लावा आणि अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुवा. 

केसांना फाटे फुटणं कमी होतं

केसांना फाटे फुटणं खूप कॉमन आहे.  एंरडेल तेल स्काल्पमध्ये प्रवेश करून  केसांच्या क्युटिकल्सना पोषण देतो. एरंडेल तेल घट्ट असते त्यामुळे जोजोबा ऑईलमध्ये मिसळून तुम्ही हे तेल लावू  शकता. या तेलाने केस स्ट्रेट राहण्यास मदत होते आणि केसांना पोषण मिळते. (केस गळणं ताबडतोब थांबवायचंय? 8 कारणं समजून घ्या- खर्च न करता लांब, सुंदर केस मिळतील)

नॅचरल कंडिशनिंग- केस मॉईश्चराईज राहतील

एरंडेल तेलात मॉईश्चर भरपूर असते. म्हणूनच  हे तेल केसांच्या मुळांपर्यंत जाऊन केसांना डिप कंडीशनिंग देते. केसांची हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी हे तेल फायदेशीर ठरतं. शॅम्पूने केस धुण्याच्या १५ मिनिटं आधी केसांमध्ये एरंडले तेल लावा.  या तेलाचे काही थेंब केसांच्या मुळांना लावू शकता. अर्ध्यासाठी केसांवर तसंच राहू द्या मग केस धुवा. जास्वंदाचा हेअर पॅकही तुम्ही एरंडेल तेलाबरोबर केसांना लावू शकता. (रोज गळतात- केस पातळ झाले? सकाळी न चुकता १ लाडू खा; भराभर वाढतील-काळे राहतील केस)

Web Title: Best Oil For Hair Growth : How to use caster oil for hair growth arandi telache kesanna fayde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.