हल्ली केस गळण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. अगदी शाळकरी मुलांचेही केस गळतात, अशी तक्रार त्यांच्या पालकांची असते. केस गळणं जर एवढ्याच झपाट्याने होत राहिलं तर लवकरच टक्कल पडेल की काय अशी भीतीही अनेकांना वाटते (How To Control Hair Fall?). केस गळायला लागले किंवा त्यांची वाढ खुंटली असेल तर आपण बाजारात विकत मिळणारे वेगवेगळे हेअरऑईल, शाम्पू, कंडिशनर आणून केसांना लावतो. पण त्यांचा म्हणावा तसा परिणाम दिसत नाही. म्हणूनच आता असे वरवरचे उपाय थांबवा आणि केस गळणं कमी करण्यासाठी काही व्यायाम नियमितपणे करा (best remedies for controlling hair fall). हे व्यायाम नेमके कोणते ते पाहा..(yoga and exercise for reducing hair loss)
केस गळणं कमी करण्यासाठी व्यायाम
१. केस गळणं कमी करण्यासाठी एक अतिशय सोपा उपाय योग अभ्यासकांनी bhawanifitness या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी हाताच्या बोटांची एक विशिष्ट हालचाल करायला सांगितली असून त्यामुळे केस गळणं बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतं.
हवा शुद्ध करणारी 'ही' रोपं तुमच्याकडे आहेत का? घरातला कुबट वास घालवून घर ठेवतात फ्रेश
यासाठी दोन्ही हाताची बोटं एकदम ताठ करा आणि त्यानंतर बोटं दुमडून घ्या. बोटांची अशा पद्धतीने रोज ५ मिनिटांसाठी उघडझाप करा. यामुळे हातावरचे काही प्रेशर पॉईंट्स दाबले जातात आणि त्याचा फायदा केसांना होतो.
२. वरील व्यायामाव्यतिरिक्त अशी काही योगासनं आहेत जी केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. या व्यायामांमध्ये शरीराची अशी काही अवस्था होते की ज्यामुळे डोक्याच्या भागाकडे जास्त रक्तपुरवठा होताे.
भाकरी नेहमीच खाता, आता बाजरीच्या पिठाचे आप्पे करून पाहा; लहान मुलंही मिटक्या मारत खातील
त्यामुळे डोक्याच्या त्वचेला जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळून केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते. केसांची मुळं पक्की झाल्यास आपोआपच केस गळण्याचे प्रमाण बरेच कमी होऊन केसांची चांगली वाढ होते. त्यासाठी शिर्षासन, सर्वांगासन, हॅण्डस्टॅण्ड, चक्रासन, सुर्यनमस्कार अशा पद्धतीची योगासनं नियमितपणे करायला पाहिजे.