Join us  

केस खूप कोरडे झाले? फक्त ५ भेंड्यांचा करा १ उपाय, खराट्यासारखे केसही होतील सिल्की-सुळसुळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2024 5:10 PM

Best Remedies For Dry And Frizzy Hair: केस खूप कोरडे झाले असतील किंवा तुमचे केस खूप फ्रिझी प्रकारचे असतील तर हा एक सोपा उपाय करून पाहा..(how to give keratin treatment to hair using okra water?)

ठळक मुद्देकेस छान मऊ, सिल्की होतील. शिवाय त्यांना चांगलं पोषण मिळून केस तुटण्याचं, केस गळण्याचं प्रमाणही बरंच कमी होईल. 

हिवाळा सुरू झाला की त्वचेची जशी जास्त काळजी घ्यावी लागते, तशीच काळजी केसांचीही घ्यावी लागते. कारण या काळात डोक्याची त्वचा कोरडी पडते. त्यामुळे मग डोक्यामध्ये खूप जास्त कोंडा होतो. केसांतला कोंडा वाढला की आपोआपच केस गळणं सुरू होतं. याशिवाय हिवाळ्याच्या दिवसांत केस खूप कोरडे, रुक्ष होतात. त्यामुळे या दिवसांत अनेकजणी केसांसाठी पार्लरमध्ये  जाऊन महागडी केरॅटिन ट्रिटमेंट करून घेतात (remedy for soft, shiny and silky hair). पण एवढे पैसे घालविण्यापेक्षा ५ भेंड्या आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेऊन  घरच्याघरी हा एक सोपा उपाय करा (how to give keratin treatment to hair using okra water?). ज्यांचे केस फ्रिझी, चिकट प्रकारचे असतात त्यांच्यासाठीही हा उपाय खूप उपयुक्त ठरणारा आहे.(best remedies for dry and frizzy hair)

 

केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

केस खूप कोरडे झाले असतील तर ते पुन्हा मऊ, सिल्की होण्यासाठी कोणता घरगुती उपाय करावा, याविषयीची माहिती dr.vivek_joshi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

कार्तिकी एकादशी : भगरीसोबत हवीच उपवासाची आमटी, १० मिनिटांत करा चमचमीत पारंपरिक आमटी

यामध्ये भेंडी आणि तांदळाचं पीठ वापरून घरच्याघरी केसांना केरॅटिन ट्रिटमेंट कशी द्याची, याची माहिती सांगितली आहे.

हा उपाय करण्यासाठी ५ ते ६ भेंड्या घ्या आणि त्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.

त्यानंतर एका पातेल्यामध्ये १ ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये चिरलेल्या भेंड्या टाका आणि पाणी गॅसवर उकळायला ठेवा.

जेव्हा पाणी उकळून ते चिकट होईल, तेव्हा गॅस बंद करा. भेंडीचं पाणी थंड झाल्यानंतर ते भेंडीसकट मिक्सरमध्ये टाका आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्या. हे पेस्ट गाळणीने किंवा कपड्याने गाळून घ्या. त्यानंतर ते एका पातेल्यात ठेवून गॅसवर गरम करायला ठेवा. 

 

पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये तांदळाची थोड्याशा पाण्यामध्ये कालवलेली पावडर टाका. या मिश्रणाला उकळी आली की गॅस बंद करा. आता हे मिश्रण जेव्हा कोमट होईल तेव्हा त्यात १ चमचा कोणतंही हेअरऑईल टाका. 

त्या ४ दिवसांत अजिबात करू नका ५ चुका, तज्ज्ञ सांगतात मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी...

वरीलपद्धतीने तयार केलेला लेप केसांच्या मुळांपासून अगदी शेवटच्या टोकापर्यंत लावा. दिड ते दोन तासांनी केस धुवून टाका. केस धुताना शाम्पू नाही लावला तरी चालेल. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा. केस छान मऊ, सिल्की होतील. शिवाय त्यांना चांगलं पोषण मिळून केस तुटण्याचं, केस गळण्याचं प्रमाणही बरंच कमी होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी