Lokmat Sakhi >Beauty > केस खूप गळतात पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही? १ सोपा उपाय- केस होतील दाट 

केस खूप गळतात पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही? १ सोपा उपाय- केस होतील दाट 

Best Remedy To Control Hair Loss: वेळ नसल्याने केसांकडे लक्ष देणं होत नसेल तर हा एक घरगुती उपाय करा. केस गळणं तर कमी होईलच पण अधिक चमकदारही दिसतील. (use of rice water and aloe vera for hair)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2024 03:27 PM2024-07-27T15:27:09+5:302024-07-27T15:28:00+5:30

Best Remedy To Control Hair Loss: वेळ नसल्याने केसांकडे लक्ष देणं होत नसेल तर हा एक घरगुती उपाय करा. केस गळणं तर कमी होईलच पण अधिक चमकदारही दिसतील. (use of rice water and aloe vera for hair)

best remedy to control hair fall or hair loss, how to make hair shiny and silky, use of rice water and aloe vera for hair | केस खूप गळतात पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही? १ सोपा उपाय- केस होतील दाट 

केस खूप गळतात पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही? १ सोपा उपाय- केस होतील दाट 

Highlightsहा उपाय आठवड्यातून दोन वेळा केल्यास केस गळणं तर कमी होईलच पण ते छान चमकदार आणि सिल्की होतील.

बऱ्याच जणी अशा आहेत की त्यांचे केस तर खूप गळतात किंवा अगदी राठ, कोरडे झाले आहेत. पण तरीही त्यांच्याकडे त्यांच्या केसांची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. इतर कामं एवढी जास्त असतात की त्या सगळ्या पसाऱ्यात केसांसाठी अर्ध्या तासाचा वेळ काढणंही होत नाही. तुमचंही असंच असेल तर हा एक सोपा उपाय तुमच्यासाठीच आहे. हा उपाय केल्याने तुमचे केस गळणं तर कमी होईलच, पण त्यांची चांगली वाढ होऊन त्यांच्यावर छान चमकदेखील येईल (best remedy to control hairfall or hair loss). हा उपाय नेमका कसा करायचा ते पाहा..(how to make hair shiny and silky)

 

केस गळणं कमी करण्यासाठी सोपा उपाय

केस गळणं कमी करण्यासाठी काय उपाय करावा याविषयीचा व्हिडिओ aanchalnavneetjain या इन्सटाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांदूळ आणि ॲलोव्हेरा जेल एवढ्या दोनच गोष्टी लागणार आहेत.

देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या ७ कर्तबगार लेकी, परिस्थितीवर मात करत त्यांनी पाहा कसा रचला इतिहास

सगळ्यात आधी तर २ मोठे चमचे भरून तांदूळ घ्या. ते एका पातेल्यामध्ये टाका. 

पावसाळ्यात काही खाल्लं तरी पोट गच्चं होतं, गॅसेसचा त्रास होतो? बघा चटकन आराम देणारे ५ उपाय

त्या तांदळात आता १ ग्लास पाणी टाका आणि ते गॅसवर गरम करायला ठेवा.

हळूहळू तांदूळ शिजतील आणि त्याच्या पाण्यावर फेस जमा होईल. असं झाल्यावर गॅस बंद करा. 

 

थंड झाल्यानंतर हे तांदळाचं पाणी एका वाटीमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये २ चमचे ॲलोव्हेरा जेल टाका. किंवा तुम्ही कोरफडीचा ताजा गरदेखील टाकू शकता. आता हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित हलवून एकत्र करा.

केसांचा गुंता काढा आणि आपण तयार केलेला हेअरमास्क केसांच्या मुळांपासून ते लांबीपर्यंत लावा. 

ड्रेसचा गळा खूपच मोठा झाला? १ मिनिटांत करा १ छानशी ट्रिक- तुमचा ड्रेस होईल अधिकच स्टायलिश

हा लेप लावल्यानंतर केस बांधू नका. ते तसेच सरळ ठेवा. यानंतर अर्ध्या तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू लावून केस धुवून टाका. 

हा उपाय आठवड्यातून दोन वेळा केल्यास केस गळणं तर कमी होईलच पण ते छान चमकदार आणि सिल्की होतील. 



 

Web Title: best remedy to control hair fall or hair loss, how to make hair shiny and silky, use of rice water and aloe vera for hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.