शरीरावरील नको असलेले अनावश्यक केस काढण्यासाठी आपण शेविंग, वॅक्सिंग करतो. आपल्यापैकी बहुतेकजणींना शेविंग किंवा वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेशीसंबंधित अनेक समस्या त्रास देतात. काहीवेळा त्वचा लाल होणे, त्वचेवर पुरळ येणे किंवा खाज सुटणे अशा वेगवेगळ्या कुरबुरी सतावतात. इतकेच नव्हे तर काहीवेळा वॅक्सिंग केल्यानंतर (Best scrub to exfoliate before shaving or waxing) लगेचच काही दिवसांत त्या भागावरील केसांची वाढ खूप जलद गतीने (The Best Body Scrubs) होते. ज्याला 'इनग्रोन हेअर' असे म्हणतात. त्वचेतून निघणारे हे छोटे टोकदार केस फारच विचित्र दिसतात.
वॅक्सिंगमुळे आपले केस व्यवस्थित आपल्या त्वचेवरुन काढले जातात. परंतु, कधीकधी ते व्यवस्थित काढले जात नाहीत किंवा त्वचेमध्ये अडकले जातात. जेव्हा वॅक्सिंग योग्य प्रकारे केले जात नाही, तेव्हा इनग्रोन केसांची भरपूर वाढ होण्याची शक्यता असते. वॅक्सिंग केल्यामुळे उद्भवणाऱ्या या समस्या कमी करण्यासाठी शेविंग, वॅक्सिंग करण्यापूर्वी आपण एक सोपा घरगुती उपाय करु शकतो. या घरगुती उपायामुळे त्वचा लाल होणे, त्वचेवर पुरळ येणे किंवा खाज सुटणे तसेच 'इनग्रोन हेअर' यांसारख्या समस्यांचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. हे घरगुती उपाय नेमका आहे तरी काय ते पाहूयात.
साहित्य :-
१. पिठीसाखर - ३ टेबलस्पून २. तांदुळाचे पीठ - ३ टेबलस्पून ३. चंदन पावडर - २ टेबलस्पून ४. बदामाचे तेल - २ टेबलस्पून ५. खोबरेल तेल - २ टेबलस्पून ६. बॉडी वॉश - २ टेबलस्पून
उन्हाळ्यात अंगाला साबण नका लावू, ‘ही’ पावडर लावा-घामाची दुर्गंधी जाईल,डिओ-परफ्युमची गरजच नाही...
काळी पडून जास्त पिकलेली केळी फेकू नका! करा हेअर मास्क - रुक्ष, निस्तेज केस होतील मऊमुलायम...
कृती :-
सगळ्यांत आधी एक मोठा बाऊल घेऊन त्यात पिठीसाखर, तांदुळाचे पीठ, चंदन पावडर, बदामाचे तेल, खोबरेल तेल असे सगळे पदार्थ घालून एकत्रित करून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणात सगळ्यांत शेवटी आपला नेहमीच्या वापरातील बॉडी वॉश मिसळून पुन्हा चमच्याने सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे. या एकत्रित मिश्रणाची मध्यम कंन्सिस्टंसीची पेस्ट तयार करून घ्यावी. या मिश्रणात गुठळ्या राहिल्या असतील तर त्या चमच्याने कालवून घ्याव्यात. आपले स्क्रब तयार आहे.
१ वाटी पुदिन्याचे ५ हेअर मास्क, उन्हात डोकं राहील थंड आणि केसही होतील सुंदर...
याचा वापर कसा करावा ?
शरीराच्या कोणत्याही अवयवाचे वॅक्सिंग कारण्यापूर्वी, म्हणजेच जर तुम्हाला हातापायांचे वॅक्सिंग करायचे असेल तर वॅक्सिंग करण्यापूर्वी हे तयार सिक्रेट स्क्रब त्वचेवर लावून घ्यावे. ज्या भागात वॅक्सिंग करणार त्या भागातील त्वचेवर व्यवस्थित पसरवून लावावे. हलक्या हाताने मसाज करत ५ मिनिटे स्क्रबिंग करून घ्यावे. ५ मिनिटे स्क्रबिंग केल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. मग त्वचेवर नेहमीच्या वापरातील मॉइश्चरायर लावून घ्यावे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्या भागातील त्वचेचे वॅक्सिंग किंवा शेव्हिंग करू शकता.
या स्क्रबच्या वापराने तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाते. यामुळे त्वचा मऊमुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर शेविंग, वॅक्सिंग केल्यानंतरही इनग्रोन केसांची लगेच वाढ होत नाही. तसेच शेविंग, वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा लाल होणे, त्वचेवर पुरळ येणे यांसारख्या समस्यांचे प्रमाण कमी करण्यास देखील मदत करते.