Join us  

५ मिनिटांत करा ३ हेअर स्टाईल, केस पातळ असतील तरीही दिसाल खूप सुंदर-स्टायलिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2023 5:30 PM

Best Self Hair Style for thin Hair केस पातळ आहेत म्हणून हेअर स्टाईल करत नाही? ३ हेअरस्टाईल करून तर पाहा, बदलेल पूर्ण लूक

लूक आकर्षित व स्टायलिश दिसावा यासाठी पेहरावासह हेअर स्टाईल देखील महत्वाचे असते. हेअर स्टाईल करताना केसांच्या टेक्सचरचीही विशेष काळजी घ्यावी लागते. विविध आउटफिटवर विविध हेअर स्टाईल सूट होतात. बदलत्या हवामानामुळे आपले केस खराब होऊ लागतात. ज्यामुळे केस गळणे व केस पातळ होण्याची समस्या वाढते.

पातळ केसांवर हेअर स्टाईल कोणते करावे हे सुचत नाही. व पातळ केसांची हेअर स्टाईल देखील होत नाही. पातळ केसांची हेअर स्टाईल आयडिया आपल्याला हवी असेल तर, या काही हेअर स्टाईल टिप्स फॉलो करून पाहा. या हेअर स्टाईल ५ मिनिटात तयार होतात, व केस पातळ देखील दिसत नाही(Best Self Hair Style for thin Hair).

टीस्ड पोनीटेल

पोनीटेल अनेक प्रकारकच्या असतात. पण ५ मिनिटात स्टाईलिश पोनीटेल हवी असेल तर ही हेअर स्टाईल करून पाहा. यासाठी सर्वप्रथम, कंगव्याने केस विंचरून घ्या. व एकत्र हाताने गोळा करा. यानंतर पुढचे केस थोडे वर उचलून पफ तयार करा. पुढील केसांना पिनच्या मदतीने सेट करा. त्यानंतर हेअरबँडच्या मदतीने पोनीटेल सेट करा. आपल्याला हवं असल्यास पुढच्या केसांना व्हॉल्यूम देण्यासाठी हेअर बन देखील वापरू शकता.

फक्त ४ आठवडे आणि २ चमचे चारोळ्या, गळणारे -बेजान केस विसरा! पाहा उपाय

लो मेसी बन

लो मेसी बन सध्या ट्रेण्डिंगवर आहे. हा बन प्रत्येकीला आवडतो. ही हेअर स्टाईल साडीवर सूट करते. लो मेसी बन ही हेअर स्टाईल करणे खूप कठीण नाही. यासाठी केस हाताने एकत्र करा. व केसांची मेसी बन तयार करा. बन तयार झाल्यानंतर एका पिनने बन सेट करा. आपण या बनवर फुल किंवा गजरा देखील माळू शकता.

फक्त १ बटाटा आणि ३ फेसपॅक, चेहरा चमकेल चकाचक-दिसा फ्रेश

ब्रेड्स हेअरस्टाइल

पातळ केसांची वेणी खूप छोटी दिसते, पातळ केसांची वेणी मोठी दिसावी यासाठी सर्वप्रथम, सगळे केस एकत्र करा, व त्यावर थ्रेड किंवा रिबन लावून सजवा. किंवा पातळ सुटसुटीत वेणी घालून हटके लूक तयार करा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी