Join us  

करीनासारखी मऊ-मुलायम स्किन हवी? वापरा 'हा' नारंगी रंगाचा फेसमास्क, स्किन होईल मलईसारखी मुलायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2024 1:38 PM

Best & Simple Homemade Face Masks For Skin Softening : Kareena Kapoor Khan’s Skin Softening Face Pack : Skin Softening & Smoothening Facemask : मऊ, तजेलदार स्किनसाठी गाजर, बेसन, मुलतानी माती वापरून करा घरगुती फेसमास्क....

आपली त्वचा एखाद्या अभिनेत्रींप्रमाणे नितळ, मऊ, मुलायम असावी अशी प्रत्येकीची इच्छा असते. चांगल्या त्वचेमुळे आपल्या सौंदर्यात अधिकच भर पडते. यासाठीच आपण त्वचेची अनेकप्रकारे काळजी घेतो. त्वचा चांगली राहावी म्हणून आपण अनेक उपाय करुन पाहतो. पण काही ना काही कारणाने चेहऱ्यावर पिंपल्स येणे, डाग पडणे, त्वचा सुरकुतणे किंवा रुक्ष होणे अशा समस्या निर्माण होतात. मग यासाठी आपण बाजारात मिळणारे महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स आणतो आणि केमिकल्स असलेले हे प्रॉडक्ट्स त्वचेसाठी वापरतो. याचा तात्पुरता उपयोग होत असला तरी दिर्घकाळ उपयोग होत नाही आणि पुन्हा त्वचेच्या नेहमीच्या तक्रारी सुरु होतात. असे होऊ नये म्हणून घरच्या घरी करता येईल असा सोपा उपाय आपण नक्की ट्राय करु शकता(Kareena Kapoor Khan’s Skin Softening Face Pack).

आपल्या रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये या खास नारंगी रंगाच्या फेसपॅकचा समावेश केल्यास आपली त्वचा नितळ, मऊ, मुलायम राहण्यास निश्चितच मदत होईल. हा फेसमास्क (Navratri 2024 Day 4 : Orange Facemask For Skin Softening) किमान आठवडाभर तरी रोज वापरल्यास त्वचेचा पोत सुधारुन त्वचा मऊ, तजेलदार आणि तुकतुकीत होते. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर देखील स्किन सॉफ्टनिंगसाठी (Skin Softening & Smoothening Facemask) आपल्या स्किनकेअर रुटीनमध्ये या खास नारंगी रंगाच्या मास्कचा वापर करते. स्किन सॉफ्टनिंगसाठी वापरला जाणारा हा खास नारंगी रंगाचा फेसमास्क नेमका तयार कसा करावा आणि तो वापरण्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात(Best & Simple Homemade Face Masks For Skin Softening).

साहित्य :- 

१. गाजराचा रस - २ ते ३ टेबलस्पून २. बेसन - १ टेबलस्पून ३. मुलतानी माती - १ टेबलस्पून 

फेसमास्क कसा तयार करायचा ? 

एका बाऊलमध्ये गाजराचा रस घेऊन त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून बेसन आणि मुलतानी माती घालावी. हे सगळे जिन्नस व्यवस्थित चमच्याच्या मदतीने हलवून एकजीव करुन घ्यावे. आपला फेसमास्क स्किनवर लावण्यासाठी तयार आहे.  

अथिया शेट्टी स्किन टाईटनिंगसाठी वापरते हा राखाडी फेसमास्क! ऐन तारुण्यात त्वचेवर सुरकुत्या येणार नाहीत...

अनन्या पांडे लावते ‘हा’ पिवळा फेसमास्क, १ रुपयाही खर्च न करता त्वचेवर येईल गोल्डन ग्लो...

फेसमास्क कसा वापरावा ? 

हा तयार केलेला नारंगी रंगाचा फेसमास्क आपल्या चेहऱ्यावर ब्रशच्या मदतीने लावून घ्यावा. त्यानंतर १५ मिनिटे किंवा हा फेसमास्क संपूर्णपणे सुकेपर्यंत स्किनवर लावून ठेवावा. १५ ते २० मिनिटानंतर आपल्या हातांनी स्किनला मसाज करुन घ्यावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.  

हा फेसमास्क वापरल्याने नेमके कोणते फायदे मिळतात ? 

१. गाजराचा रस :- गाजराच्या रसात पोटॅशियम, व्हिटॅमिन 'सी', व्हिटॅमिन 'ए' आणि इतर महत्वाची जीवनसत्वे असतात जी आपल्या त्वचेला पोषण देतात. याचबरोबर त्वचेचा ग्लो वाढवण्यात देखील मदत करतो.

२. बेसन :- बेसन वापरल्याने आपली त्वचा आतून खोलवर स्वच्छ केली जाते. बेसन त्वचेवर नॅचरल एक्सफोलिएटर म्हणून काम करते. बेसनमध्ये अँटिऑक्सिडंट आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा मऊ - मुलायम ठेवण्यास मदत होते.  

३. मुलतानी माती :- त्वचेवरील पिंपल्स, पिंपल्सचे काळे डाग, काळवंडलेली त्वचा इत्यादी त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मुलतानी माती फायदेशीर ठरते. मुलतानी माती त्वचेमधील घाण स्वच्छ करून त्वचा उजळण्यास मदत करते. याचबरोबर चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकण्याचे काम करते.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४ब्यूटी टिप्सनवरात्रीत्वचेची काळजी