Lokmat Sakhi >Beauty > बापरे आली पंचविशी!- असं वाटून एकदम स्किन केअरच्या मागे लागलात? फक्त ३ गोष्टी करा, राहाल कायम तरुण

बापरे आली पंचविशी!- असं वाटून एकदम स्किन केअरच्या मागे लागलात? फक्त ३ गोष्टी करा, राहाल कायम तरुण

आपल्या त्वचेची एजिंग प्रोसेस साधारणपणे २५ ते २८ व्या वर्षापर्यंत सुरू होत असते. त्यामुळे एकदा पंचविशी गाठली, की त्वचेची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी काळजीपुर्वक करण्याची गरज आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 03:58 PM2021-08-31T15:58:59+5:302021-08-31T15:59:34+5:30

आपल्या त्वचेची एजिंग प्रोसेस साधारणपणे २५ ते २८ व्या वर्षापर्यंत सुरू होत असते. त्यामुळे एकदा पंचविशी गाठली, की त्वचेची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी काळजीपुर्वक करण्याची गरज आहे.

Best skin care routine after the age of 25, just follow 3 steps for glowing skin | बापरे आली पंचविशी!- असं वाटून एकदम स्किन केअरच्या मागे लागलात? फक्त ३ गोष्टी करा, राहाल कायम तरुण

बापरे आली पंचविशी!- असं वाटून एकदम स्किन केअरच्या मागे लागलात? फक्त ३ गोष्टी करा, राहाल कायम तरुण

Highlightsधुळ, धूर, प्रदुषण यामुळे त्वचा निस्तेज होते. त्यामुळे झोपताना आपल्या त्वचेलाही काहीतरी पोषण देण्याची गरज असते.

पंचविशी म्हणजे एकदम मुक्त होऊन बागडण्याचं वय. हे वय असं असतं की स्वत:च्या पायावर उभे राहून थोडाफार पैसा आपल्या हातात यायला सुरूवात झालेली असते. त्यामुळे मग 'जिंदगी ना मिलेगी दोबारा..' या थाटात आपण लाईफ एन्जॉय करत असतो. काही जणी तर बोहल्यावर देखील चढलेल्या असतात. अशा सगळ्या मस्त मस्त वातावरणात मग आपण मेकअपकडेही जरा बारकाईने लक्ष द्यायला लागतो. बाजारात जी मिळती ती स्किन केअर प्रोडक्ट्स ट्राय करून पाहतो. सुरूवातीला या गोष्टीचा त्रास होत नाही, पण नंतर मात्र तुमची त्वचा साथ देणं सोडते आणि मग चेहऱ्यावर त्याचे पडसाद उमटायला सुरूवात होते.

 

पंचविशी हे असं वय असतं की साधारण इथपासून तुमच्या त्वचेची एजिंग प्रोसेस सुरू झालेली असते. अनुवंशिकता किंवा आपल्या त्वचेची आपण किती काळजी घेतो, आपला आहार आणि रूटीन कसं, फिटनेस कसा, यावरही एजिंग प्रोसेस कधी सुरू होणार हे अवलंबून असतं. त्यामुळे २५ ते २८ हे वय एजिंग प्रोसेस सुरू होण्याचं असतं, असे सौंदर्यतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे या वयापासूनच आपण उत्तम स्किनकेअर रूटीन सुरू करण्याची गरज आहे. कारण या वयात जर आपण योग्य पद्धतीने त्वचेची काळजी घेतली, तरच चाळीशीनंतरही आपला चेहरा आपल्याला वाढत्या वयाची चिन्हे दाखवत नाही. 

 

पंचविशीनंतर या गोष्टींची असते गरज
१. स्किन केअर रूटीन

पंचविशीपर्यंत तुम्ही तुमच्या त्वचेची खूप काळजी करण्याची गरज नसते. पण त्यानंतर होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलांमुळे मात्र तुम्ही सतर्क झाले पाहिजे. स्किन केअर रूटीनसाठी तुम्ही CTM पद्धती अवलंबिली पाहिजे. सीटीएम म्हणजे क्लिंजिंग, टोनिंग ॲण्ड मॉईश्चराईजिंग. या तीन स्टेप्सनुसार घेतलेली काळजी, तुमच्या त्वचेचा पोत चांगला ठेवते. दिवसातून दोन ते तीन वेळेस तरी चेहरा धुतलाच पाहिजे. त्यापैकी जेव्हा तुम्ही सकाळी आंघोळ करता, तेव्हा तुमच्या त्वचेला सुट होणारे क्लिंजर वापरा. यानंतर चेहरा स्वच्छ कोरडा करून त्यावर टोनर लावा. टोनर सुकल्यावर मॉईश्चरायझर लावा. या तीन गोष्टी सकाळी आंघोळीनंतर करणे अत्यंत गरजेच्या आहेत. 

 

२. ॲण्टीएजिंग प्रोडक्ट्स
पंचविशीनंतर एजिंग प्रोसेस सुरू झालेली असते. त्यामुळे जर वाढत्या वयाच्या खाणाखुणा चेहऱ्यावर लवकर दिसू नयेत, असं वाटत असेल तर पंचविशीनंतर तुम्ही जे कोणते कॉस्मेटिक्स घ्याल, ते ॲण्टी एजिंग प्रोडक्ट्स असतील याची काळजी घ्या.

 

३. नाईट केअर रूटीन
दिवसभर चेहऱ्याची काळजी घेतली आता रात्री काय गरज आहे, असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. रात्री झोपताना चेहरा धुवून त्यावर नाईट क्रिम लावण्याची सवय या वयापासूनच लावा. दिवसभर आपली त्वचा थकलेली असते. धुळ, धूर, प्रदुषण यामुळे त्वचा निस्तेज होते. त्यामुळे झोपताना आपल्या त्वचेलाही काहीतरी पोषण देण्याची गरज असते. म्हणूनच रात्री चेहरा एकदा स्वच्छ धुवून नाईट क्रिम लावले तर चेहरा रात्रभर हायड्रेटेड राहतो. 

 

Web Title: Best skin care routine after the age of 25, just follow 3 steps for glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.