रोजची धावपळ, दगदग, उन्हामध्ये फिरणं यामुळे त्वचा टॅन (tanned skin) होते. शिवाय रोजच्या रोज त्वचेची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळही मिळत नाही. त्यामुळे मग मुळचा उजळ रंग असला तरी मग काळवंडल्यासारखी दिसू लागते. असं झालं की आपण तडक पार्लर गाठतो आणि तिथे जाऊन जवळपास हजार रुपये खर्च करून मॅनिक्युअर, पेडिक्युअर, फेशियल असं काय काय करतो (How to get tan free, fresh skin)... पण खरंच त्वचेचं टॅनिंग काढून टाकण्यासाठी एवढा पैसा खर्च करण्याची गरज नाही. कारण आपल्या स्वयंपाक घरातलेच काही पदार्थ वापरून त्वचेचं सौंदर्य खुलविता येतं (Best solution for tanning in just 10 rupees)...
स्वयंपाक घरातले अगदी आपल्या रोजच्या वापरातलेच पदार्थ वापरून टॅनिंग कसं कमी करायचं, याविषयीचा हा उपाय इन्स्टाग्रामच्या mydelishbowl या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यासाठी आपल्याला नेमकं कोणतं साहित्य लागणार आहे ते पाहूया...
बाळ हसायला लागलं की आईचे केस गळू लागतात, असं का? तज्ज्ञ सांगतात खरंखुरं कारण आणि उपाय
साहित्य
२ टेबलस्पून हळद
१ टेबलस्पून कॉफी पावडर
१ टेबलस्पून मध
२ टेबलस्पून कच्चं दूध
कसा करायचा उपाय?
१. यासाठी सगळ्यात आधी गॅसवर छोटीशी कढई ठेवा आणि ती तापली की मग त्यात हळद टाकून थोडीशी भाजून घ्या.. यावेळी गॅसची फ्लेम कमी ठेवा. भाजताना हळद जळणार नाही, याची काळजी घ्या.
२. हळद थंड झाली की ती एका वाटीत काढून घ्या. त्या वाटीत मध, दूध आणि कॉफी पावडर घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.
पाणी वाहून जात नसल्याने सिंक तुंबलेय? २ घरगुती उपाय, पाण्याचा होईल चटकन निचरा
३. हा लेप तुम्ही चेहरा, हात, पाय, मान, पाठ यावरचं टॅनिंग कमी करण्यासाठी वापरू शकता.
४. यासाठी जिथे लेप लावणार आहात, ती त्वचा आधी ओलसर करून घ्या. त्यावर लेप लावा. ५ ते ७ मिनिटे हलक्या हाताने मालिश करा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.