केमिकल्सयुक्त प्रोडक्ट्सचा वापर, खाण्यापिण्यातील अनियमितता यांमुळे केस गळणं, केस पांढरे होण्याची समस्या अधिकाधिक लोकांमध्ये उद्भवत आहे. पांढरे केस काळे करण्यासाठी बाजारात अनेक शॅम्पू, हेअर केअर प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत पण त्यांचा हवातसा परिणाम दिसून येत नाही. (How To Mix Henna For Hair)
केस काळे करण्यासाठी केमिकल्सयुक्त डाय लावल्यास केस पुन्हा पांढरे होतील का अशी भिती मनात असते. पांढरे केस काळे करण्यासाठी पूर्वापार मेहेंदीचा वापर केला जात आहे. मेहेंदीमध्ये काही पदार्थ मिसळल्यास केसांवर चांगला परीणाम दिसून येईल. (Natural Ingredients To Mix With Hair Mehendi Powder)
पांढरे केस काळे करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात १ ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात १ चमचा कलौंजी, १ चमचा तांदूळ, १ चमचा चहा पावडर घाला. हे पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा. एका दुसऱ्या भांड्यात मेहेंदी काढून त्यात अंड फोडून घाला. (How to prepare henna hair dye paste for silky smooth hair)
अंड नको असल्यास तुम्ही फक्त दही घालून मेहेंदी पावडर व्यवस्थित एकत्र करून घ्या. या मेहेंदीच्या मिश्रणात उकळलेलं पाणी घाला आणि एकजीव करून घ्या. तयार मिश्रण केसांना ब्रशच्या साहाय्यानं व्यवस्थित लावून घ्या. १ तासानं मेहेंदी सुकल्यानंतर स्वच्छ पाण्यानं केस धुवून घ्या. या उपायानं केस जास्त दिवस काळेभोर दिसण्यास मदत होईल. (Mehandi Hair Pack Recipe)
चांगल्या रिजल्टसाठी मेहेंदी लावताना ५ गोष्टी लक्षात ठेवा
१) केसांना मेहेंदी लावताना त्यात आवळा, शिकेकाई, रिठा पावडर यांव्यतिरिक्त कॉफी पावडर आणि आवश्यकतेनुसार चहा पावडर उकळून घाला.
२) ज्या दिवशी तुम्ही केसांना मेहेंदी लावणार आहात त्या दिवशी केसांना तेल लावू नका. जर तुम्ही तेल लावल्यानंतर मेहेंदी लावली तर त्याचा रंग व्यवस्थित येणार नाही.
३) मेहेंदी लावताना व्यवस्थित भिजवणंही महत्वाचं आहे. मेहेंदी लोखंडाच्या भांड्यात भिजवा. स्टिल, सेरॅमिक किंवा प्लास्टीकच्या भांड्यांचा वापर करू नका. लोखंडाच्या भांड्यांचा वापर केल्यानं मेहेंदीचा रंग डार्क होण्यास मदत होते.
४) पांढरे केस कव्हर करण्यासाठी मेहेंदी ३ ते ४ तासांसाठी झाकून ठेवा. केसांना शाईन येण्यासाठी हलका रंग लावू शकता. १ ते दीड तास केसांना मेहेंदी लावणं योग्य ठरेल.
५) मेहेंदी लावण्याआधी केस व्यवस्थित विंचरून घ्या म्हणजे नंतर गुंता होणार नाही. मेहेंदी लावून केस स्वच्छ पाण्यानं धुतल्यानंतर केसांना तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी माईल्ड शॅम्पूनं केस धुवा.