Lokmat Sakhi >Beauty > ऑइली स्किनसाठी सनस्क्रीन लोशन म्हणजे डोक्याला ताप? तज्ज्ञ सांगतात, कोणतं सनस्क्रीन चांगलं..

ऑइली स्किनसाठी सनस्क्रीन लोशन म्हणजे डोक्याला ताप? तज्ज्ञ सांगतात, कोणतं सनस्क्रीन चांगलं..

Best Sunscreen for oily Skin in Summer : सनस्क्रीनची निवड करताना काय काळजी घ्यायची याबाबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2023 11:29 AM2023-03-10T11:29:54+5:302023-03-10T17:07:12+5:30

Best Sunscreen for oily Skin in Summer : सनस्क्रीनची निवड करताना काय काळजी घ्यायची याबाबत

Best Sunscreen for oily Skin in Summer : Which sunscreen is good for oily skin? Experts say, when going out in the sun... | ऑइली स्किनसाठी सनस्क्रीन लोशन म्हणजे डोक्याला ताप? तज्ज्ञ सांगतात, कोणतं सनस्क्रीन चांगलं..

ऑइली स्किनसाठी सनस्क्रीन लोशन म्हणजे डोक्याला ताप? तज्ज्ञ सांगतात, कोणतं सनस्क्रीन चांगलं..

उन्हात बाहेर जाताना त्वचेचं संरक्षण व्हावं म्हणून आपण आवर्जून सनस्क्रीन लावतो. सूर्याचे अतिनील किरण थेट त्वचेवर पडल्यास त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते. यामुळे रॅश येणे, खाज येणे, त्वचेची आग होणे किंवा त्वचा काळवंडणे अशा समस्या उद्भवतात. म्हणूनच घराच्या बाहेर पडताना आवर्जून सनस्क्रीन लोशन लावायला हवे असे वारंवार सांगितले जाते. सनस्क्रीन खरेदी करताना आपण त्याचा ब्रँड, त्याचा SPF काऊंट हे सगळे बघतो (Best Sunscreen for oily Skin in Summer). 

भारतीयांच्या त्वचेत मेलानीनचे प्रमाण जास्त असल्याने प्रखर उन्हाचा आपल्याला जास्त त्रास होतो. यातच सनस्क्रीन लावल्याने जास्त घाम येतो किंवा चेहरा पांढरा दिसतो. त्यामुळे आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रीनची निवड कशी करायची याबाबत मात्र आपल्याला काहीवेळा प्रश्न पडतो. यासाठीच प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल पंथ आपल्याला काही महत्त्वाच्या टिप्स देतात. ऑयली स्कीन असलेल्यांनी सनस्क्रीनची निवड करताना काय काळजी घ्यायची याबाबत काय सांगतात पाहूया... 

(Image : Google)
(Image : Google)

ऑयली त्वचेला कोणती सनस्क्रीन चांगली ?

स्कीन क्यू सन प्रोटेक्स अल्ट्रा लाईट जेल (Skin Q Sun Protect Ultra Light Gel) असे या सनस्क्रीनचे नाव आहे. ज्यांची त्वचा खूप ऑयली आहे त्यांच्यासाठी ही सनस्क्रीन उत्तम पर्याय आहे असे डॉ. आंचल यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यासाठी तुम्ही सनस्क्रीन घेण्याचा विचार करत असाल तर हा उत्तम पर्याय आहे. 

काय आहेत गुणधर्म? 

१. ही सनस्क्रीन वजनाने अतिशय हलकी आहे. 

२. तसेच ही जेल चिकट किंवा तेलकट नसल्याने ती त्वचेत झटपट शोषली जाते.


 

३. ही जेल पाण्याला प्रतिरोध करणारी असल्याने उन्हामुळे तुम्हाला जास्त घाम येत असेल तरीही ती त्वचेवर टिकून राहते.

४. य़ा जेलचा SPF म्हणजेच सन प्रोटेक्शन फॅक्टर ४० आहे तसेच PA म्हणजे अतिनील किरणांपासून मिळणारे प्रोटेक्शन ४ हून अधिक आहे. 

५. यातील रासायनिक फिल्टर UVA आणि UVB असे दोन्ही संरक्षण देतात.

६. यात व्हिटॅमिन सी हे अँटिऑक्सिडेंट असून सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण मिळण्यास याची मदत होते. 

Web Title: Best Sunscreen for oily Skin in Summer : Which sunscreen is good for oily skin? Experts say, when going out in the sun...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.