Join us  

तांदूळ व मसूर डाळीचा डी - टॅन फेसमास्क, उन्हानं झालेलं टॅनिंग चुटकीसरशी गायब, त्वचा दिसेल चमकदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2023 9:30 AM

Sun Tan Removal Home Remedy De-Tan Mask homemade sun Tan removal mask : त्वचेवरचे टॅनिंग घालवण्यासाठी डि - टॅन फेसमास्कचा सोपा उपाय.....

उन्हाळ्यात आपल्याला आपल्या संपूर्ण शरीराची आतून बाहेरून काळजी घ्यावी लागते. सूर्यकिरणांमध्ये अतिनील किरणे असतात. या सूर्याच्या अतिनील किरणांच्या आपण वारंवार संपर्कात आल्यास आपल्या त्वचेला इजा होऊ शकते. त्याचबरोबर त्वचेच्या वरच्या थराला नुकसान पोहोचवून सनबर्न सारखी समस्या उद्भवू शकते. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे बऱ्याचदा आपली त्वचा टॅन होऊ लागते. कडक उन्हामुळे अनेकांची त्वचा उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये काळी पडते. तसेच त्यामुळे त्वचेवर एक थर जमा होतो ज्याला घासून काढावे लागते. यालाच स्कीन टॅन होणं म्हणतात. यावर उपाय म्हणून सनस्क्रीन आणि छत्री वापरल्यानंतरही सूर्याची अतिनील किरणे तुम्हाला हानी पोहोचवू शकतात, ज्यामुळे तुमची त्वचा टॅन होण्याची समस्या असते.

उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये टॅनिंग होणं ही फारच सामान्य समस्या आहे. मात्र, ही समस्या फारच त्रासदायक ठरते. त्यामुळे आपल्या त्वचेची खास काळजी उन्हाळ्यात घ्यावी लागते. सूर्याची किरणे आपल्या त्वचेला जाळतात आणि त्याचा प्रभाव आपल्या त्वचेवर दिसून येतो. टॅनिंग सोबतच उन्हामुळे चेहऱ्यावर धूळ, घाण आणि घामाचा थर साचू लागतो.यामुळे उन्हाळ्यात त्वचेच्या समस्यांमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते. उन्हाळा येताच बहुतेक महिलांना त्वचेची चिंता सतावू लागते कारण सूर्यप्रकाशातून निघणाऱ्या अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते आणि त्वचेची चमक हिरावून घेतली जाते. उन्हात बाहेर पडताना अनेकजण चेहरा झाकतात. पण अनेक वेळा असे केल्यावरही त्वचेच्या नुकसानासोबतच त्वचेची चमकही निघून जाते. सूर्यप्रकाश टाळण्यासाठी सनस्क्रीनचा वापर केला जाऊ शकतो. पण फक्त सनस्क्रीन वापरणे पुरेसे नाही. त्वचेवरचे टॅनिंग घालवण्यासाठी सोपा उपाय(Sun Tan Removal Home Remedy De-Tan Mask homemade sun Tan removal mask).

समर स्पेशल डि - टॅन फेसमास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. तांदूळ - १ कप २. मसूर डाळ - १ कप ३. पाणी - गरजेनुसार ४. कॉफी पावडर - १ टेबलस्पून ५. दही - १ कप 

केस विंचरण्यासाठी प्लास्टिक नाही लाकडी कंगवा वापरा, केसांच्या समस्या चुकीचा कंगवा वापरल्याने वाढतात कारण...

कोरफड म्हणजे उन्हाळ्यात वरदान, ७ प्रकारे कोरफड वापरा- उन्हामुळे होणारे त्रास होतील पटकन कमी...

समर स्पेशल डि - टॅन फेसमास्क नेमका कसा बनवायचा ?

एका बाऊलमध्ये तांदूळ व मसूर डाळ घ्यावी. यात पाणी घालून तांदूळ व मसूर डाळ १ तास भिजत ठेवावी. तांदूळ व मसूर डाळ १ तास भिजवून घेतल्यानंतर त्याची थोडी घट्टसर पेस्ट होईपर्यंत मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यावी. ही पेस्ट मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर त्यात १ टेबलस्पून कॉफी पावडर व १ कप दही घालावे. त्यानंतर हा फेसमास्क चमच्याने ढवळून एकजीव करुन घ्यावा. समर स्पेशल डि - टॅन फेसमास्क वापरण्यासाठी तयार आहे. 

उन्हाळ्यात घामोळे होवू नये म्हणून ५ टिप्स, आग - पुरळ - खाज हे त्रास होणार नाहीत...

समर स्पेशल डि - टॅन फेसमास्क वापरायचा कसा ? समर स्पेशल डि - टॅन फेसमास्क हातांवर घेऊन शरीराचा जो भाग टॅन झाला आहे त्या भागावर हलक्या हाताने लावून मसाज करुन घ्यावा. हा मास्क तुम्ही चेहेऱ्याला देखील लावू शकता. हा फेसमास्क लावून झाल्यानंतर तो संपूर्ण सुकेपर्यंत किंवा २० ते ३० मिनिटे तसाच ठेवून द्यावा. त्यानंतर सध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. 

स्किन टॅन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ?

१. कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे. जाणे अत्यावश्यक असल्यास संपूर्ण अंग झाकून राहील असेच कपडे घालावेत. 

२. उन्हात बाहेर जाताना सनस्क्रीन लोशनचा वापर जरूर करावा. 

३. भरपूर फळे आणि हिरव्या पालेभाज्या असणारा आहार घ्यावा. त्यामुळे त्वचा हायड्रेटेड रहाण्यास मदत होते.   

४. भरपूर पाणी पिणे उन्हाळ्यात त्वचेसाठी उपयुक्त ठरते.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स