Join us  

अलायाला आवडणारा लाल फेसमास्क पाहा, चेहरा काळवंडला असेल तर चटकन होईल फ्रेश आणि चमकदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2024 2:02 PM

Best Tan Removal Face Packs To Remove Sun Tan : Home-made Face Packs to Remove Sun Tan Instantly : Alaya F Shares Her SECRET Home Made Face Mask Recipe For Skin Tanning : टॅनिंग होऊन काळवंडलेल्या त्वचेचा रंग पुन्हा उजळ करण्यासाठी वापरा टोमॅटो - बीटरूटचा होममेड फेसमास्क...

सध्याच्या काळात वाढते प्रदूषण, धूळ, माती, उन्हाचा तडाखा यांचे प्रमाण वाढले आहे. घराबाहेर पडताना आपली त्वचा टॅन होऊ नये म्हणून आपण सनस्क्रीन लावूनच घराबाहेर पडतो. त्वचेसाठी सनस्क्रीनचा वापर करताना आपण शक्यतो ते चेहऱ्याच्या त्वचेवर लावतो. मात्र कित्येकदा हातापायांच्या त्वचेकडे आपले दुर्लक्ष होते. शक्यतो चेहऱ्याच्या त्वचेला सनस्क्रीन (Powerful punch of Tomato & Beetroot for healthy skin) लावल्यानंतर आपण हात पायांना सनस्क्रीन लावणे विसरतो आणि तसेच घराबाहेर पडतो. यामुळेच कडक उन्हाच्या तडाख्याने हातापायांची त्वचा काळी पडते, ही त्वचा अशीच काळी पडून नंतर त्वचेचे टॅनिंग वाढते(Beetroot tomato face pack for pink fair glowing skin).

उन्हामुळे आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे काळा पडलेला त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आपण महागड्या क्रिम्स,पार्लरच्या ट्रिटमेंट, त्वचा उजळ करण्यासाठी ब्राइटनिंग क्रिम असे अनेक उपाय करतो. पण याचा परिणाम फारकाळ त्वचेवर दिसून येत नाही. यासाठी टॅनिंग होऊन काळवंडलेल्या त्वचेचा रंग पुन्हा उजळ करण्यासाठी आपण एका खास घरगुती फेसमास्कचा (Best Tan Removal Face Packs To Remove Sun Tan) वापर करु शकतो. या खास लाल रंगाच्या फेसमास्कचा वापर केल्याने आपली टॅनिंग झालेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी उजळून येण्यास मदत मिळते. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री (Alaya F Shares Her SECRET Home Made Face Mask Recipe For Skin Tanning) अलाया एफ (Alaya F) ही देखील शूटिंग दरम्यान टॅन झालेली स्किन पुन्हा पहिल्यासारखी करण्यासाठी या होममेड फेसमास्कचा वापर करते. हा स्किन टॅनिंग रिमूव्हल फेसमास्क कसा तयार करायचा ते पाहूयात(Home-made Face Packs to Remove Sun Tan Instantly).

साहित्य :- 

१. टोमॅटोचा रस - २ ते ३ टेबलस्पून २. बीटरुटचा रस - १ ते २ टेबलस्पून ३. बेसन - १ टेबलस्पून  ४. आंबेहळद - १ टेबलस्पून 

फेसमास्क कसा तयार करायचा ?  

हा फेसमास्क तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये टोमॅटोचा रस व बीटरुटचा रस प्रत्येकी २ ते ३ टेबलस्पून घ्यावा. त्यानंतर या रसात प्रत्येकी १ टेबलस्पून बेसन व आंबेहळद घालून हे सगळे जिन्नस चमच्याने व्यवस्थित ढवळून एकजीव करुन घ्यावे. आपला फेसमास्क स्किनवर लावण्यासाठी तयार आहे.     

लग्न ठरलंय-चेहऱ्यावर हवा सिलेब्रिटींसारखा ग्लो? वापरा 'हा' खास फेसमास्क, ब्रायडल ग्लो येईल...

नखांवरचं नेलपेंट झटपट काढायचंय, ही पाहा अफलातून ट्रिक- नेलपेंट काढा कापूसही न वापरता...

फेसमास्क कसा वापरावा ? 

हा तयार केलेला लाल रंगाचा फेसमास्क आपल्या चेहऱ्यावर ब्रशच्या मदतीने लावून घ्यावा. त्यानंतर १५ मिनिटे किंवा हा फेसमास्क संपूर्णपणे सुकेपर्यंत स्किनवर लावून ठेवावा. १५ ते २० मिनिटानंतर आपल्या हातांनी स्किनला मसाज करुन घ्यावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. 

हा फेसमास्क वापरल्याने नेमके कोणते फायदे मिळतात ? 

१. टोमॅटोचा रस :- टोमॅटोचा रस स्किनवर लावल्याने त्वचेतील छिद्रे स्वच्छ होतात आणि पिंपल्स कमी होतात. त्वचा टॅन झाली असेल तर टोमॅटोचा रस उपयुक्त ठरतो. टोमॅटोच्या रसाचा वापर त्वचा स्वच्छ करण्यासाठी तसेच रंग उजळ करण्यासाठी करु शकता. 

२. बीटरुटचा रस :- बीटमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म फार मोठ्या प्रमाणावर असतात. जे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यास मदत करतात. स्किनवर नॅचरल गुलाबी ग्लो येण्यास बीट फायदेशीर ठरते. 

३. बेसन :-  बेसन त्वचेवरील टॅनिंग काढून टाकते आणि त्वचेची चमक कायम राखण्यास मदत करते. बेसन वापरल्याने स्किन अधिक मुलायम आणि स्मूद होते.

४. आंबेहळद :- आंबेहळद त्वचेवरील सुरकुत्या, डाग, पिंपल्स  इत्यादी समस्या दूर होण्यास मदत मिळते. याचबरोबर त्वचेचा रंग नैसर्गिक स्वरूपात उजळवतो.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४ब्यूटी टिप्सनवरात्रीत्वचेची काळजी