Join us  

गणपतीत चेहऱ्यावर ग्लो हवाय? १ टोमॅटो घ्या-घरीच करा टोमॅटो फेशियल, टॅनिंग दूर-उजळेल चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 4:34 PM

Best Tomato Fecial at Home For Get Skin : टोमॅटो स्क्रबिंग टॅनिंग काढून टाकण्याचा एक उत्तम उपाय आहे.  यामुळे तुमच्या चेहऱ्यावर डेड सेल्स  निघून जातील आणि त्वचेवर मऊपणा येईल.

(Image Credit - Glam Girl)

व्यस्त लाईफस्टाईमध्ये चेहऱ्यावर टॅनिंग येण्याची समस्या अनेकांना उद्भवते.  हळूहळू पिंपल्स, डाग त्वचेच्या इतर समस्याही उद्भवतात. हेल्दी लाईफसस्टाईल आणि डेली स्किन केअर रूटीन फॉलो केल्यास त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यास मदत होते. सणासुधीला चेहऱ्यावर ग्लो असावा, आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं त्यासाठी पार्लरमध्ये हजारो रूपये खर्च केले जातात. अनेकदा कामाच्या गडबडीत अनेकांना पार्लरलाही जायला वेळ मिळत नाही. (Simple steps to do  tomato fecial at home)

वेळ मिळाला तरी ब्युटिशियन्स सण उत्सवांच्या काळात फार बिझी असतात. अशावेळी चेहऱ्याचं टॅनिंग काढून टाकण्यासाठी घरगुती उपायांचा वापर फायदेशीर ठरेल. टोमॅटोच्या साहाय्याने तुम्ही चेहऱ्याचं टॅनिंग काढून टाकू शकता.  टोमॅटोमुळे त्वचेचा पीएच बॅलेन्स मेंटेन राहतो आणि दीर्घकाळ रिंकल्सची समस्या उद्भवत नाही.  टॅनिंग मूळापासून दूर घालवण्यसाठी टोमॅटो फायदेशीर ठरतो. (Best Tomato Fecial at Home For Get Skin)

दिवसरात्र गळून केस विरळ झाले? किचनमधले ३ पदार्थ 'या' पद्धतीनं लावा, दाट होतील केस

पहिली स्टेप- क्लिंजिंग

क्लिनजिंगसाठी एका बाऊलमध्ये एक चमचा टोमॅटो प्यूरी घ्या.  त्यात दोन चमचे कच्च दूध मिसळा आणि जवळपास ५ ते १० मिनिटं मसाज करा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. 

दुसरी स्टेप- स्क्रबिंग

टोमॅटो स्क्रबिंग टॅनिंग काढून टाकण्याचा एक उत्तम उपाय आहे.  यामुळे तुमच्या चेहऱ्यावर डेड सेल्स  निघून जातील आणि त्वचेवर मऊपणा येईल. टोमॅटो २ भागांमध्ये चिरा त्यानंतर  तांदळाचं पीठ किंवा पिठीसाखर टोमॅटोवर लावून चेहऱ्यावर हळूहळू स्क्रब करा.  कमीत कमी ५ मिनिटं स्क्रब केल्यानंतर १५ मिनिटं तसंच सोडा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

तिसरी स्टेप - टोमॅटो फेसपॅक

टोमॅटो फेशियलची सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे टोमॅटो फेसपॅक. टोमॅटो फेसपॅक लावल्यानं त्वाचा हायड्रेट राहते. हा पॅक त्वचेला आतून पोषण देतो. याशिवाय त्वचा उजळ बनवतो. २ चमचे टोमॅटो  प्यूरी घ्या.  त्यात १ चमचा बेसन आणि २ चमचे दही मिसळा. नंतर अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चुटकी हळद घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण मान आणि चेहऱ्याला लावून २० मिनिटांसाठी तसंच ठेवा. यामुळे चेहरा स्वच्छ होतो.

 

मॉईश्चरायजिंग

मॉईश्चरायजिंग त्वचेसाठी फार महत्वाचं असतं. यामुळे त्वचेच्या पेशी दुरूस्त होतात आणि त्वचा चांगली राहते. तुम्ही कोणतंही लाईट मॉईश्चरायजर किंवा एलोवेरा  जेल लावून त्वचा मॉईश्चराईज करू शकता. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स