हिवाळ्यात त्वचेपासून केसांपर्यंत सगळंच कोरडं, निस्तेज, रुक्ष दिसू लागत. केसांचा ड्रायनेस वाढणे, ते निर्जीव, रुक्ष दिसणे अशा केसांच्या अनेक समस्या हिवाळ्यात फार मोठ्या प्रमाणांत सतावतात. हिवाळा सुरू झाला की सगळ्यात आधी डोक्याची त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते आणि डोक्यातला कोंडा वाढत जातो. कोंडा वाढला की केस गळायला सुरुवात होते. हिवाळ्यात त्वचेतलं नॅचरल मॉईश्चरायझर कमी झाल्यामुळे केस कोरडे पडू लागतात. हिवाळ्यात केसांना फाटे फुटण्याचं प्रमाणही खूप वाढलेलं असतं. केसांच्या अशा अनेक समस्या वारंवार वाढत गेल्यास परिणामी केसांची मूळ कमकुवत होऊन त्यांची योग्य वाढ देखील होत नाही(How To Use Coconut Oil & Glycerine For Soft & Long Hair In Winter).
इतर कोणत्याही ऋतूंपेक्षा हिवाळ्यांत केसांचे आरोग्य आणि सौंदर्य अधिक जास्त खराब होते. थंड हवा आणि वातावरणातील कोरडेपणा याचा वाईट परिणाम केसांवर लगेच दिसून येतो. यामुळे हिवाळ्यामध्ये योग्य पद्धतीने केसांची निगा कशी राखायची हे देखील माहित असणे महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी आपण आपल्याला माहित असलेले घरगुती उपाय तर करतोच. पण सुप्रसिद्ध हेअर एक्स्पर्ट जावेद हबीब (Jawed Habib Hair Care Tips) यांनी नुकतेच त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत हिवाळ्यात केसांचा ड्रायनेस वाढू नये म्हणून एक खास घरगुती उपाय सांगितला आहे. हा उपाय केल्याने हिवाळ्यात केसांना ड्रायनेस येणार नाही तसेच केसांच्या अनेक समस्या दूर होऊन केस लांबसडक व मुलायम होतील(Jawed Habib Hair Care Tips With Coconut Oil & Glycerine).
खोबरेल तेलात मिसळा हा पदार्थ...
जावेद हबीब सांगतात की, हिवाळ्यात वारंवार कोरड्या पडणाऱ्या केसांसाठी खोबरेल तेलासोबतच ग्लिसरीन वापरणे अधिक फायदेशीर ठरते. खोबरेल तेलासोबत ग्लिसरीन वापरणे हा केसांचा ड्रायनेस घालवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. खोबरेल तेल आणि ग्लिसरीन दोन्ही केसांना आर्द्रता पोहोचवण्याचे मुख्य कार्य करतात आणि कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात. खोबरेल तेलात केसांसाठी आवश्यक असे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे केसांना पोषण मिळवून देतात.
हिवाळ्यात केसांतला कोंडा वाढतो, खाजही येते? ४ गोष्टी करा- डोक्यातला कोंडा वर्षभर परतणार नाही...
यासाठी एका बाऊलमध्ये समप्रमाणात खोबरेल तेल आणि ग्लिसरीन मिसळा आणि हेअर ब्रशच्या मदतीने हे मिश्रण केसांच्या मुळांना म्हणजे स्काल्पवर लावून घ्या. त्यानंतर अर्ध्या तासासाठी हे तसेच केसांवर लावून ठेवावे. अर्ध्या तासांनंतर शाम्पूने केस धुवून घ्यावेत. आठवड्यातून एक वेळा हा उपाय नक्की करावा, यामुळे केसांच्या कोरडेपणाची समस्या दूर होते आणि केस लांबसडक, घनदाट, मऊमुलायम होतात.
थंडीत त्वचेला मायेनं लावा या ५ पैकी १ गोष्ट रोज, कोरडी त्वचा-पायाला भेगा- सगळ्यांवर उत्तम उपाय...
घ्या फक्त चमचाभर साजूक तूप, पायाच्या भेगा - फुटलेले ओठ- कोरडी त्वचा होईल पुन्हा मऊ, मुलायम...
केसांसाठी खोबरेल तेल व ग्लिसरीन वापरण्याचे फायदे...
१. खोबरेल तेल :- खोबरेल तेलातील मॉइश्चरायझिंग गुणधर्म केसांतील ओलावा टिकवून ठेवतात ज्यामुळे हिवाळ्यात येणारा कोरडेपणा कमी होतो.
२. ग्लिसरीन :- हिवाळ्यात केसांतील ओलावा टिकवून केसांना हायड्रेटेड ठेवणं खूप गरजेचं असत. अशावेळी ग्लिसरीन वापरणे फायदेशीर ठरते. ग्लिसरीन वापल्याने केस केस हायड्रेटेड राहून केसांना कोरडेपणा येत नाही.