प्युबिक हेअर्स काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम्स, वॅक्स, रेजर बाजारात उपलब्ध आहेत. प्युबिक हेअर काढून टाकण्याचा ट्रेंड सध्या वेगानं वाढतोय. जास्तीत जास्त महिला क्लिन आणि कॉन्फिडंट राहण्यासाठी प्युबिक हेअर्स काढून टाकतात. केस काढण्यासाठी तुम्ही कोणती पद्धत वापरताय हेसुद्धा तितकंच महत्वाचं असतं. (Waxing shaving or trimming know what is the best way of pubic hair removal)
अनेकदा इंटिमेट एरियाचे केस काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. ज्याचे साईड इफेक्टस दिसून येतात. या प्रक्रियांबद्दल विस्तारात जाणून घेऊया. हेअर रिमुव्हलची सगळ्यात योग्य याबाबत गायनोकोलॉजिस्ट आणि ऑब्सटेट्रिशियन डॉक्टर यांनी हेल्थ शॉट्सला दिलेल्या माहितीनुसार प्युबिक हेअर रिमुव्ह करण्यासाठी काही सोप्या पद्धतींकडे लक्ष द्यायला हवं (what is the best way of pubic hair removal)
व्हजायनल आरोग्यासाठी प्युबिक हेअर्स का गरजेचे असतात?
ज्याप्रकार आपल्या नाकातले केस धूळ, घाण आणि बॅक्टेरियांना शरीरात प्रवेश करण्यापासून रोखतात. त्याप्रकारचे हाथ, पाय आणि त्वचेच्या इतर भागांवरील केल हानीकारक किरणांपासून धूळ, घाणीपासून सुरक्षा करतात. डॉक्टर अंजली कुमार यांच्यामते प्युबिक हेअर्स व्हायरस, बॅक्टेरिया आणि अन्य इतर हानीकारक मायक्रोऑर्गनिज्मला व्हजायनात प्रवेश करण्यापासून रोखतात. यामुळे सेक्शुअली ट्रांसमिटेड आजार आणि युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका टळतो.
प्युबिक हेअर्स काढण्याची सुरक्षित पद्धत कोणती
ट्रिमिंग हा प्युबिक हेअर्स काढण्याचा सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे. यामुळे रॅशेज, कट, इनग्रोथ हेअर्ससारखे साईड इफेक्ट्स जाणवत नाहीत. यासाठी तुम्हाला चांगल्या, शार्प सिजरची आवश्यकता असले. बाजारात उपलब्ध असलेल्या ट्रिमरचा ही तुम्ही उपयोग करू शकता.
ट्रिमिंग करण्यापूर्वी प्युबिक क्षेत्र पूर्णपणे स्वच्छ करा आणि ट्रिम केल्यानंतर ते साफ करायला विसरू नका. याशिवाय कात्री आणि ट्रिमर व्यवस्थित स्वच्छ करून कोरड्या जागी ठेवा. प्यूबिक केस काढण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शेव्हिंग. पण सोपे असण्याव्यतिरिक्त ते खूप धोकादायक देखील असू शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शेव्हिंग करताना त्या भागातील केस कापणे, पुरळ उठणे आणि इन्ग्रोथ केस येण्याची समस्या खूप सामान्य आहे. यासोबतच योनीतून होणारी खाज आणि योनीमार्गाचे संक्रमणही तुम्हाला अडचणीत आणू शकते.
या गोष्टींची काळजी घ्या
त्यामुळे असे शेव्हिंग शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. पण जर तुम्ही शेव्हिंग करत असाल तर योग्य रेजर निवडा. खूप जुने रेझर ब्लेड वापरू नका. यासह, शेव्हिंग करण्यापूर्वी आपली त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा आणि एक्सफोलिएटिंग देखील एक चांगला पर्याय असेल.
प्युबिक हेअर्स काढून टाकण्यासाठी वॅक्स वापरत असाल तर विशेष सावधगिरी बाळगा. नेहमी प्रोफेशनल्सकडून वॅक्स करून घ्या. कारण वॅक्स खूपच गरम असते अशात इंटिमेट एरिया जळण्याची भिती असते म्हणून काळजी घ्या.
हेअर रिमूव्हल क्रीम वापरणे पूर्णपणे टाळणे योग्य ठरेल. कारण जेव्हा तुम्ही ते प्रायव्हेट भागात लावाल तेव्हा ते योनीमार्गाच्या आसपास लावले जाईल. अशा स्थितीत अनेक प्रकारच्या ऍलर्जी होण्याची शक्यता असते.