Join us  

तेल लावल्यानंतर केस तुटून हातात येतात? ३ टिप्स; दाट होतील केस, अजिबात गळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 11:27 AM

Best way to apply oil on hair : स्काल्पला तेलानं मसाज  केरा. जेव्हा तुम्ही केसांना तेल लावाल तेव्हा लांबीलाही तेल लावा. यामुळे केसांना फाटे फुटण्याची समस्या कमी होईल.

केस वाढवण्यासाठी केसांना नेहमी तेल लावणं गरजेचं असतं. (How To Oil Your Hair Correctly) केसांना तेल लावले नाही तर केस तुटतात आणि जास्त प्रमाणात गळू लागतात. केसांना तेल लावल्यानंतर केस खूपच गळतात. (How to stop hair fall) अशी अनेकांची तक्रार असते. जर तुम्हाला केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत माहित असेल तर केस गळणं थांबवू शकता. (Hair Care Tips) केस चंपू दिसतात, चिकट होतात म्हणून काहीजणी अजिबातच केसांना तेल लावत नाहीत. 

योग्य तेलाची निवड करा (How To Oil Your Hair The Right Way)

केसांना कोणत्याही प्रकारचे तेल लावण्याआधी केसांची स्थिती कशी आहे ते समजून घ्या.  नारळाचं तेल, मोहोरीचं तेल केसांना लांब आणि शायनी बनवतात. म्हणूनच नारळाचं तेल आणि ऑलिव्ह ऑईलचा वापर करा.

कोमट तेलाचा वापर करा

केसांना थंड तेल लावत असाल तर ही सवय आधी बदला.  थंड तेलाऐवजी कोमट तेल केसांना लावा. कोमट तेल केसांच्या मुळांमध्ये सहज प्रवेश करते. इतकंच नाही तर केसांसाठीही आरामदायकही ठरते. गरम पाण्याचं भाडं ठेवून त्यावर छोट्या वाटीत तेल ठेवा. तेल गरम झाल्यानंतर बाहेर काढा. वाटल्यास तुम्ही मायक्रोव्हेव्हमध्येही तेल गरम करू शकता. 

केसांच्या मुळांसह केसांच्या लांबीलासुद्धा तेल लावा

स्काल्पला तेलानं मसाज  केरा. जेव्हा तुम्ही केसांना तेल लावाल तेव्हा लांबीलाही तेल लावा. यामुळे केसांना फाटे फुटण्याची समस्या कमी होईल. तेल लावल्यानंतर रूंद दातांचा कंगवा वापरा. यामुळे संपूर्ण केसांना पोषण मिळते आणि केस तुटणार नाहीत. केसांची लांबी आणि घनतेनुसार तेलाचा वापर करा. केसांमध्ये गरजेपेक्षा जास्त तेल लावल्यानं केस चिपचिपीत होऊ शकतात.  चिकट केस धुणं सोपे नसते. अनेकदा शॅम्पू लावूनही तेल निघत नाही.

तुम्ही आठवड्यातून कितीवेळा तेल लावता हे केसांच्या स्थितीवर अवलंबून असते. केसांना तेल लावल्यानं शॅम्पू आणि कंडिशनर लावायला विसरू नका. सल्फेट नसलेला आणि सौम्य शॅम्पू वापरा. यामुळे तुमच्या केसांना कमी नुकसान होते.  केसांना फक्त १५ ते ३० मिनिटांसाठीच तेल लावलेले राहू द्या. त्यानंतर केस व्यवस्थित स्वच्छ धुवा. पावसाळ्याच्या दिवसात केस जास्त चिकट होतात म्हणून फक्त आठवड्यातून एकदाच ऑयलिंग करा.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स