महिलांना नटायला खूप आवडते. पण कामाच्या व्यापात ते इतके गुंतून जातात की, त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. काही महिला कामात बिझी जरी असले तरी, वेळात वेळ काढून स्वतःसाठी खास वेळ काढतात. अनेकांना ड्रेसवर मॅचिंग मेकअप, मॅचिंग कानातले, मॅचिंग ज्वेलरी परिधान करायला आवडते. काही महिला दररोज विविध प्रकारचे कानातले घालतात. जे दिसायला आकर्षक व चेहऱ्यावर शोभून दिसतात. पण दररोज विविध प्रकारचे कानातले घातल्याने, कानाची छिद्रे मोठे होण्याची शक्यता वाढते.
कानाची छिद्रे मोठे झाल्यानंतर काय करावं हे सुचत नाही, अशा वेळेस कानातले देखील कानाखाली लोंबतात. तुमच्याही कानाची छिद्रे मोठे झाले असतील, व कानाला टाके लावून घेण्यास घाबरत असाल तर, हा एक घरगुती उपाय करून पाहा. या उपायामुळे नक्कीच आपल्याला मदत होईल(Best Way to Reduce Ear Hole Size ).
सर्जिकल टेपचा करा वापर
कानाच्या छिद्रांचा आकार कमी करण्यासाठी, आपण सर्जिकल टेपची मदत घेऊ शकता. ही टेप शस्त्रक्रियेच्या दुकानात म्हणजेच, ज्या मेडिकल स्टोअरमध्ये ऑपरेशनच्या संबंधित सामान मिळतात, त्या ठिकाणी ही टेप मिळेल. ही टेप सामान्य बँडेजिंग टेपपेक्षा थोडी वेगळी असते. त्यावर बारीक छिद्रे दिसतात, ज्यामुळे स्किन हवा घेऊ शकते, त्यात चांगल्या प्रतीचा गोंद देखील लावला जातो. आपण ही टेप लावून त्यावर कानातले घालू शकता.
आंघोळीच्या पाण्यात ४ गोष्टी मिसळा, दिवसभर वाटेल फ्रेश- स्किन प्रॉब्लम्स छळणार नाहीत
कानाची छिद्रे लहान करण्यासाठी उपाय
कानाची छिद्र लहान करण्यासाठी, सर्व प्रथम टेपचा एक लहान भाग कापून घ्या. आपण कानातले घालतो, त्या आकाराप्रमाणे टेप कापून घ्या. हवं असल्यास आपण याचे २ भाग करू शकता. आता कानाच्या दोन्ही बाजूने ही टेप लावा. छिद्रे मोठे असतील तर, मधोमध देखील ही टेप आपण लावू शकता. आता यावर आपण आपल्या आवडीचे कानातले घालू शकता.
चमचाभर तांदळाचे पीठ-चमचारभर कोरफड जेल; चेहऱ्याला लावा- मिळवा चकचकीत कोरियन ब्यूटी ग्लो
यामुळे कानातले लोंबणार नाही, व ते कानात व्यवस्थित बसतील. यासह कानाची छिद्रे देखील आकाराने छोटे दिसतील, ज्यामुळे स्किन सैल दिसणार नाही.