Lokmat Sakhi >Beauty > केस जास्तच पिकलेत? जास्वंदाच्या फुलाचा १ उपाय; डाय न लावता काळेभोर-दाट होतील केस

केस जास्तच पिकलेत? जास्वंदाच्या फुलाचा १ उपाय; डाय न लावता काळेभोर-दाट होतील केस

Best Way To Use Hibiscus For Hairs : केमिकल्सयुक्त केसांमुळे केस डॅमेज होतात. केसांना काळे बनवण्यासाठी तुम्ही नॅच्युरल हेअर कलरचा वापर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:56 AM2024-03-26T11:56:10+5:302024-03-26T17:17:05+5:30

Best Way To Use Hibiscus For Hairs : केमिकल्सयुक्त केसांमुळे केस डॅमेज होतात. केसांना काळे बनवण्यासाठी तुम्ही नॅच्युरल हेअर कलरचा वापर करू शकता.

Best Way To Use Hibiscus For Hairs : Hibiscus For Hair Growth Benefits And Uses | केस जास्तच पिकलेत? जास्वंदाच्या फुलाचा १ उपाय; डाय न लावता काळेभोर-दाट होतील केस

केस जास्तच पिकलेत? जास्वंदाच्या फुलाचा १ उपाय; डाय न लावता काळेभोर-दाट होतील केस

केस पांढरे होणं फार हे खूपच कॉमन आहे. (Hair Care Tips) वेळेआधीच केस पांढरे झााल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.  आजकाल कमी वयातच लोकांना केस पांढरे होण्याच्या त्रास सहन करावा लागतो.  ज्यामुळे कॉन्फिडेंन्स लेव्हल कमी होते.  केस काळे करण्यासाठी लोक वेगवेगळ्या हेअर  केअर उत्पादनांचा वापर करतात. (Mix Hibiscus Flowers Aloe Vera Vitamin E Capsule Curd Coffee Naturally Black Hair)

केमिकल्सयुक्त केसांमुळे केस डॅमेज होतात. केसांना काळे बनवण्यासाठी तुम्ही नॅच्युरल हेअर कलरचा वापर करू शकता. (Hibiscus For Hair Growth Benefits And Uses) या हेअर पॅकमुळे केसांवर केमिकल्स न लावता केस नैसर्गिकरित्या काळे होतील.  जास्वंदाचा शॅम्पू हेअर केअर उत्पादनांतील खूप महत्वाचे उत्पादन आहे. यात जीवनसत्वे, खनिजे जास्त असतात.

क्लिनिकली.कॉमच्या रिपोर्टनुसार जास्वंदाच्या वापराने केसांना वेगवेगळे फायदे मिळतात ज्यामुळे केस निरोगी राहतात. केस गळणं थांबते आणि केसांचे आरोग्यही चांगले राहते.  हिबिस्कसमध्ये नैसर्गिक कंडिशनिंग गुण असतात ज्यामुळे केस मऊ राहतात. जास्वंदाचा हेअर मास्क केसांना लावल्याने केसांन नैसर्गिक शाईन मिळते. यात नॅच्युरल एंजाईम्स असतात ज्यामुळे केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते.

खूप मेहनत करूनही वजन कमी नाहीये? या आजारामुळे वजन घटवणं होतं कठीण-४ वेट लॉस टिप्स

हिबिस्कसमध्ये केसांचे विविध प्रकारचे फायदे आहेत. हे निरोगी केसांना प्रोत्साहन देते, केस गळणे थांबवते आणि केसांचे एकूण स्वरूप आणि आरोग्य वाढवते असे मानले जाते. हिबिस्कस त्याच्या नैसर्गिक कंडिशनिंग गुणधर्मांसाठी देखील ओळखले जाते. यामुळे केसांतील कोंडा कमी होण्यासही मदत होते.

नॅच्युरल हेअर पॅक करण्यासाठी लागणारं साहित्य

१)  जास्वंदाची  सुकलेली फुलं - ४ ते ५

२) दही- २ चमचे

३) कॉफी पावडर- २ मोठे चमचे

४) व्हिटामीन ई कॅप्सूल- २ मोठे चमचे

५) एलोवेरा जेल- १ मोठा चमचा

हा हेअर पॅक बनवण्यासाठी  सगळ्यात आधी  जास्वंदाची फुलं हाताने क्रश करून  घ्या. त्यात दही, कॉफी पावडर, व्हिटामीन  ई कॅप्सूल, एलोवेरा जेल घालून मिक्स करून घ्या. हा पॅक  केसांच्या मुळांना  लावून व्यवस्थित मसाज करा. त्यानंतर एक टॉवेल घ्या आणि गर पाण्यात भिजवून पिळून घ्या.

हा टॉवेल केसांना जवळपास ३० मिनिटं लावा. ३० मिनिटांनी हा टॉवेल काढून पाण्याने धुवून घ्या. केस धुण्यासाठी तुम्ही माईल्ड शॅम्पूचा वापर करू शकता. ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून २ वेळा हा हेअर पॅक वापरू शकता.

Web Title: Best Way To Use Hibiscus For Hairs : Hibiscus For Hair Growth Benefits And Uses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.