Lokmat Sakhi >Beauty > झोप उडाली की चेहऱ्याचा रंग उडणार, कितीही क्रीम चोपडा उपयोग शून्य! करा ' हा ' निवांत उपाय...

झोप उडाली की चेहऱ्याचा रंग उडणार, कितीही क्रीम चोपडा उपयोग शून्य! करा ' हा ' निवांत उपाय...

What is the best way to sleep for beauty on face : Everything You Need to Know About Beauty Sleep : ग्लोइंग स्किनसाठी घ्या शांत, निवांत 'ब्यूटी स्लिप' चेहऱ्यावर चमचमता ग्लो येण्यासाठी स्वस्त - मस्त उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 06:52 PM2024-07-30T18:52:08+5:302024-07-30T19:12:04+5:30

What is the best way to sleep for beauty on face : Everything You Need to Know About Beauty Sleep : ग्लोइंग स्किनसाठी घ्या शांत, निवांत 'ब्यूटी स्लिप' चेहऱ्यावर चमचमता ग्लो येण्यासाठी स्वस्त - मस्त उपाय...

Best ways to get the Ultimate Beauty Sleep What is beauty sleep and how to achieve it | झोप उडाली की चेहऱ्याचा रंग उडणार, कितीही क्रीम चोपडा उपयोग शून्य! करा ' हा ' निवांत उपाय...

झोप उडाली की चेहऱ्याचा रंग उडणार, कितीही क्रीम चोपडा उपयोग शून्य! करा ' हा ' निवांत उपाय...

आपली स्किन कायम सुंदर, ग्लोइंग, निस्तेज दिसावी असे प्रत्येकीला वाटत असते. चेहऱ्यावर येणारा कायमचा चमचमता ग्लो कुणाला आवडणार नाही. स्किन सुंदर दिसण्यासाठी तिची तितकीच काळजी घेणे देखील गरजेचे असते. स्किनवर हवा तसा ग्लो येण्यासाठी स्किनची आतून - बाहेरुन योग्य ती काळजी घ्यावी लागते. काहीवेळा पार्लरला जाऊन महागड्या ट्रिटमेंट्स, क्रिम्स वापरुन देखील त्वचेवर हवा तसा ग्लो येत नाही. स्किन कायम चमकदार, तजेलदार राहावी यासाठी इतर कोणत्याही महागड्या उपायांपेक्षा पुरेशी झोप घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे, असे सांगितले तर यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. आपली स्किन आणि झोपेचे अगदी जवळचे नाते असते(Everything You Need to Know About Beauty Sleep). 

'झोप' हा (Beauty Sleep - How Sleep Affects Your Skin) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपण झोपलेलो असताना आपले शरीर, मन, ज्ञानेंद्रिये, मेंदू विश्रांती घेत असतात. योग्य वेळी पुरेशा प्रमाणात झोप घेतली तर त्याचे अनेक चांगले फायदे आपल्या आरोग्याबरोबरच शरीरावर दिसून येतात. योग्य प्रमाणांत झोप घेतल्यास एकूणच शरीर व त्वचेवर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. स्किनवर ग्लो येण्यासाठी आपण महागड्या क्रिम्स, ट्रिटमेंट्सचा वापर करण्यापेक्षा 'ब्यूटी स्लिपचा' उपाय आजमावून पाहू शकतो(Best ways to get the Ultimate Beauty Sleep).

'ब्यूटी स्लिप' म्हणजे काय ? 

डायरेक्टर ऑफ स्किन डेकोर आणि चीफ डर्मेटोलॉजिस्ट डॉ. मोनिका चहर यांच्या मते, " सध्या बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. यामागे अनेक कारणे आहेत. जसे की ऑफिसचे काम करण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत जागे राहणे किंवा सोशल मिडीयावर वेळ घालवणे. बरेच लोक रात्री जागे राहण्यासाठी कॅफीनचे सेवन करतात. अशा प्रकारच्या जीवनशैलीचा वापर करणाऱ्यांना अनेकदा वेळेवर पुरेशी झोप मिळत नाही. याचा थेट परिणाम त्यांच्या त्वचेवर होतो. त्यामुळे तज्ज्ञ 'ब्यूटी स्लिप' घेण्याचा सल्ला देतात. तज्ज्ञांच्या मते, झोप आणि त्वचेचा खोलवर संबंध असतो. चांगली झोप न मिळाल्याने डोळ्यांच्या आजूबाजूची संवेदनशील त्वचा व डोळे  यासंबंधित अनेक लहान - मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. यासोबतच याचा आपल्या त्वचेवर नकारात्मक परिणाम देखील पहायला मिळतो. 

२ चमचे भात ५ प्रकारे चेहऱ्याला लावा, आयुष्यभर ब्यूटी पार्लरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही...

ग्लोइंग त्वचेसाठी 'ब्यूटी स्लिप' घेण्याची पद्धत कोणती ?     

१. रोज किमान ७ ते ९ तासांची पुरेशी झोप घ्यावी. 
२. रोजच्या झोपेची एक वेळ सेट करा. यामुळे अमुक एकावेळी शरीराला आराम करण्याची तसेच झोपण्याची सवय लागेल. 
३. जर आपल्याला ग्लोइंग स्किन हवी असेल तर पाणी पिऊन आपले शरीर हायड्रेट ठेवा. 
४. आरोग्यदायी गोष्टींचा आहारात सतत समावेश करा. यासाठी अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्वे आणि खनिजयुक्त आहार घ्या. 
५. ताणतणावांपासून स्वतःला दूर ठेवा. स्ट्रेस हार्मोन्सचा त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो. तणाव कमी करण्यासाठी योग किंवा ध्यान करा.

नीता अंबानींचा हेअरस्टायलिस्ट सांगतो, महिलांच्या ३ चुकांमुळेच होतात चांगले केस खराब-त्या कोणत्या?

  'ब्यूटी स्लिप' चे फायदे कोणते ? (The Benefits of Beauty Sleep)

१. एजिंगच्या खुणा कमी करते. 
२. त्वचेवर मुरुम, पुटकुळ्यांचे प्रमाण कमी होते. 
३. डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत करते. 
४. झोपलेलो असताना त्वचा आतल्या आत रिपेअर केली जाते.

Web Title: Best ways to get the Ultimate Beauty Sleep What is beauty sleep and how to achieve it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.