केसांशी संबंधित अनेक समस्यांमुळे लोक हैराण असतात. कधी केसांचं गळणं थांबत नाही तर कधी केसांचं वॉल्यूम कमी असते. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही जडी-बूटी म्हणजेच हर्ब्सचा वापर करू शकता. घराच्या आजूबाजूला सहज उपलब्ध होणाऱ्या वनस्पतींचा वापर करून तुम्ही केसांचं गळणं थांबवू शकता. (Four herbs for hair growth and long hair) यामुळे केस गळती कमी होईल आणि केसांचे वॉल्यूम वाढेल. कोणत्या पदार्थांचा केसांवर वापर केल्यास केसांची वाढ चांगली होते ते पाहूया. (Best ways to stop hair loss)
आवळा
आवळ्यात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे केसांना पोषण मिळते. केस वाढवण्यासाठी तुम्ही केसांवर आवळा लावू शकता. आवळ्याच्या रसाने केसांच्या मुळांची मसाज केल्यास केस मजबूत होतात आणि गळणंही कंट्रोलमध्ये राहतं. आवळ्याच्या पावडरचा हेअरमास्कही तुम्ही लावू शकता. हा मास्क एखाद्या हेअर टॉनिकप्रमाणे केसांवर काम करेल.
मान खूप काळी पडली? फक्त ३ मिनिटांत करा बनाना फेशियल; १० रुपये खर्च- मान दिसेल स्वच्छ
शिकेकाई
शिकेकाईला हेअर क्लिंजर असंही म्हटलं जातं. यामुळे केसांची स्वच्छता होते आणि स्काल्पवर जमा झालेली घाण निघून जाण्यास मदत होते. केस वाढवण्यास आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिकेकाई गरम पाण्यात घालून ठेवा नंतर हे पाणी केसांवर शिंपडा यामुळे केस लांब आणि दाट होण्यास मदत होईल.
रोजमेरी
रोजमेरी केसांसाठी फक्त १ घरगुती उपाय नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या केस वाढवण्यासाठी फायदेशीर मानला जातो. रोजमेरीची पानं पाण्यात उकळून हे पाणी थंड करून आपल्या स्काल्पवर शिंपडा, याव्यतिरिक्त रोजमेरी तेल इतर कोणत्याही तेलात मिसळून तुम्ही केसांची मालिश करू शकता.
रात्री चेहऱ्याला 'हा' पदार्थ लावून झोपा; सकाळी चेहऱ्यावर आलेलं असेल तेज, त्वचा टवटवीत
जटामांसी
जटामांसी केसांसाठी एक कमालीची औषधी वनस्पती आहे. हे केसांवर लावल्याने केसांची वाढ चांगली आणि वेगाने होते. जटामांसी एखाद्या हेअर टॉनिकप्रमाणे तुम्ही केसांवर लावू शकता. याचा हेअरमास्क लावल्यास अधिकाधिक फायदे मिळतील.
जास्वंद
जास्वंदाचे फुल तुम्हाला सहज उपलब्ध होईल. जास्वंदाच्या फुलाचा वापर अनेक शॅम्पू आणि कंडीशनर्समध्ये केला जातो. केसांचा पोत सुधारण्यासाठी आणि केसांना लांबसडक-दाट बनवण्यासाठी जास्वंद गुणकारी ठरतं. जास्वंदाची फुलं २ ते ३ तास पाण्यात भिजवून नंतर त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावून तसंच ठेवा त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे केसांची वाढ चांगली होईल आणि केस गळणंही थांबेल.