घरातील म्हाताऱ्या आजी - आजोबांना आपण अनेकदा पान खाताना पाहिले असेल. अशा या हिरव्यागार पानाला खायचे पान, विड्याचे पान किंवा नागवेलीचे पान देखील म्हटले जाते. हे खायचे पान (Betel leaf can help reduce these 3 skin problems) आपण खाण्यासाठी किंवा अनेक शुभ कार्यात वापरतो. परंतु या पानाचा (Using Betel Leaf For Skincare) वापर फक्त तेवढ्या पुरताच मर्यादित न राहता आपण चक्क त्वचेच्या अनेक (Benefits And How You Can Use It) समस्या कमी करण्यासाठी देखील याचा वापर करू शकतो(How to use betel leaves for skin).
आपल्या त्वचेवर अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे पिंपल्स येतात, तसेच या पिंपल्सचे काळे डाग त्वचेवर पडतात इतकेच नव्हे तर अनेक स्किन प्रॉब्लेम्स होतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन प्रॉब्लेम्सवर उपाय म्हणून हे नागवेलीचे पान फारच असरदार ठरते. नागवेलीचे पान अनेक स्किन प्रॉब्लेम्सवर असरदार असले तरी, त्वचेवरील पिंपल्स, काळे डाग कमी करून त्वचेचा रंग उजळ करण्यात अधिक फायदेशीर ठरते. त्वचेसाठी नागवेलीच्या पानांचा वापर कसा करायचा आणि कोणत्या स्किन प्रॉब्लेम्ससाठी ते फायदेशीर आहे ते पाहूयात.
१. पिंपल्स कमी करण्यासाठी...
विड्याच्या पानामध्ये दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपल्स दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यासाठी विड्याची पाने घेऊन पेस्ट तयार करा. तयार पेस्ट मधील जास्तीचे पाणी काढून उरलेल्या पानाचा चोथा थेट पिंपल्सवर लावून घ्यावा. याचबरोबर, तुम्ही या पानाच्या पेस्टमध्ये चिमूटभर हळद आणि एलोवेरा जेल देखील मिक्स करु शकता. आता ही पेस्ट पिंपल्सवर लावून २० मिनिटे तशीच राहू द्या. नंतर चेहरा धुवा. या उपायाने पिंपल्स कमी होऊ लागतील.
सतत हेअर स्टाईल करुन खराब झालेल्या केसांसाठी माधुरी दीक्षितचा 'देसी उपाय' - केस होतील मऊमुलायम...
२. त्वचेवरील डार्कस्पॉट कमी करण्यासाठी...
पिंपल्स सोबतच त्वचेवरील डार्कस्पॉट कमी करण्यासाठी देखील नागवेलीची पाने अतिशय फायदेशीर ठरतात. त्वचेवरील पिंपल्स गेल्यानंतर त्वचेवर त्याचे काळे डाग राहतात. हे डाग घालवण्यासाठी नागवेलीच्या पानांचा हातांनी दाब देत चुरा करावा. त्यानंतर यात चमचाभर मध घालावे. असे पान आणि मधाचे मिश्रण एकत्रित करून काळ्या डागांवर लावावे. यामुळे त्वचेवरील पिंपल्सचे काळे डाग कमी होण्यास मदत मिळते.
मोस्टलीसेन प्राजक्ता कोळीच्या सुंदर केसांचं सिक्रेट, तिच्या वडिलांनी तयार केलं ‘असं’ खास तेल...
३. काळवंडलेली त्वचा उजळ करण्यासाठी...
विड्याच्या पानांचा फेस पॅक अनेक प्रकारे वापरला जातो. विड्याच्या पानांच्या पेस्टमध्ये १ टेबलस्पून तांदळाचे पीठ मिसळा. ते चेहऱ्यावर लावा आणि थोडे कोरडे होऊ द्या. कोरडे होताच आपले हात ओले करा आणि गोलाकार हालचालींनी मालिश सुरू करा. ४ ते ५ मिनिटे स्क्रब केल्यानंतर, साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. ४ ते ५ दिवसात तुम्हाला स्वतःहून फरक दिसू लागेल. उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेचा रंग उजळवण्यासाठी हा विड्याच्या पानांचा उपाय फायदेशीर ठरतो.