Join us

पन्नाशीत तरूण दिसणारी भाग्यश्री पिते 'या' भाजीचे ज्यूस; तुम्हीही प्या-सुरकुत्या येणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 17:18 IST

Bhagyashree Green Juice Recipe (Bhagyashree Skin Care Secret) : ती तिची फॅमिली आणि स्वत:साठी नेहमीच वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असते.

बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) सध्या सिनेसृष्टीपासून लांब असली तरी तिच्या ग्लोईंग, सुंदर त्वचेमुळे कायम चर्चेत असते. (Bhagyashree Green Juice Recipe) तिचे फॅन्स नेहमीच तिच्या सुंदर चेहऱ्यामागचे सिक्रेट विचारत असतात. भाग्यश्री आपल्या इंस्टाग्राम पेजवरून नेहमीच चाहत्यांसाठी फिटनेस टिप्स शेअर करत असते. ती खवय्यी असून तिला नेहमीच वेगवेगळे प्रयोग करायला फार आवडतं. ती तिची फॅमिली आणि स्वत:साठी नेहमीच वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असते. (Bhagyashree Green Juice Recipe A Nutrients Packed Elixir For Glowing Skin And Enhanced Immunity)

अलिकडेच भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर एक नवीन रेसिपी शेअर केली आहे. ही रेसिपी ट्युसडे टिप विथ सिरिज या नावाने इंस्टाग्रामवर आहे. एका हिरव्या भाजीचा ज्यूस तिने यामध्ये दाखवला आहे. ही रेसिपी न्युट्रिएंट्स आणि एंटी ऑक्सिडेंट्सनी परिपूर्ण आहे. या हेल्दी ज्यूसने तुम्ही तुमची तहान भागवू शकता.

भाग्यश्रीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्याला कॅप्शनही दिले आहे. सकाळी एक ग्लास हा ज्यूस प्यायल्याने माझी स्किन ग्लोईंग दिसते, माझ्या त्वचेला बरेच फायदे मिळतात. या ज्यूसमध्ये  गट बुस्टींग प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे इम्यूनिटी वाढते. हा ग्रीन ज्यूस मला फार आवडतो, तुम्हीही ट्राय करून पाहा असे म्हणत तिने इंस्टाग्रावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. भाग्यश्रीने ग्रीन ज्यूस बनवण्याची रेसिपी शेअर केली आहे. या पोस्टवर पॉझिटिव्ह रिएक्शन्स येत आहे.

पालकाचे सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य

१) पालक - १ कप

२) कोथिंबीरीची पानं- अर्धा कप

३) सेलेरीच्या (हिरवी भाजी) फांद्या- २ ते ३

४) आवळा -१ ते २

पालकाचा ज्यूस बनवण्याची परफेक्ट पद्धत

सगळ्यात आधी पालक, कोथिंबीर आणि सेलेरी स्वच्छ धुवून चिरून घ्या. आवळ्याचे लहान लहान तुकडे काढून बिया वेगळ्या करून घ्या. सर्व साहित्य एकत्र करून त्यात थोडं पाणी घाला. हे मिश्रण चाळणीतून किंवा बारीक जाळीच्या गाळणीतून वाडग्यात किंवा भांड्यात गाळून घ्या. चाळणीवर लगदा दाबण्यासाठी एक चमचा वापरा शक्य तितका रस काढून घ्या. 

अचानक BP वाढलं तर काय कराल? डॉक्टरांनी सांगितला BP कंट्रोलसाठी व्यायाम; ६ सेकंदात नॉर्मल व्हाल

चाळणीवर लगदा दाबण्यासाठी चमचा वापरा, शक्य तितका रस काढा. चव वाढवण्यासाठी तुम्ही यात चिमुटभर मीठ किंवा लिंबाच्या रसाचे काही थेंब घालू शकता. फ्रेश पालकाचा ज्यूस तयार आहे. हा ज्यूस तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पिऊ शकता.  

हिरवा ज्यूस पिण्याचे फायदे

भाग्यश्रीने पालक खाण्याचे फायदे सांगितले आहेत. पालक व्हिटामीन्स, मिनरल्सनी परिपूर्ण असतात. ज्यामुळे इम्यूनिटी वाढते. शरीर हायड्रेट राहते,  डोळ्यांच्या आरोग्यासाठीही पालक फायदेशीर टरते. यात व्हिटामीन ए असते.  कोथिंबीरीत एंटी ऑक्सिडेंट प्रॉपर्टीज असतात. ज्यामुळे गट हेल्थ आणि डायजेशन चांगले राहते. यातून कॅल्शियम, पोटॅशिमय, मॅग्नेशियम, सेलेनियम  ही महत्वाची पोषक तत्व मिळतात आणि चेहरा ग्लो करतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी