Join us  

'सर जो तेरा चकराये'.. अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय केसांना चंपी करताना नेमकं कोणतं तेल वापरणं उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 2:39 PM

Bhagyashree Shares Her Favourite 2 Hair Oils For Strong & Shiny Hair : केसांना तेल मालिश कोणत्या तेलाने करावी, भाग्यश्री सांगते २ उपाय...

केसांच्या उत्तम आरोग्यासाठी नियमितपणे त्यांना तेलाने मसाज करणे आवश्यक आहे. दररोजच्या धावपळीत आपल्याला केसांना मसाज करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशावेळी आपण आठवड्यातून किमान २ वेळा तरी डोक्याला तेल लावून मसाज करतो. केसांना व डोक्याला मसाज करणे जितके महत्वाचे असते तितकेच आपण हा मसाज कोणत्या प्रकारच्या तेलाने करतो हे देखील गरजेचे असते. केसांना व डोक्याला मसाज करण्यासाठी सध्या बाजारांत अनेक प्रकारची मसाज ऑइलस उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत आपण तेलाची जाहिरात पाहून कोणतेही तेल वापरण्यास सुरुवात करतो आणि काही फायदा होत नसल्यास आपण ते त्वरित बदलतो. या प्रकारचा प्रयोग केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरत नाही तर आणखी हानिकारक ठरू शकतो.  

जर खरोखरच आपल्याला केस चमकदार, मजबूत आणि दाट बनवायचे असतील तर, केसांचा पोत लक्षात घेऊन, गरजेनुसार योग्य तेलाची निवड करण्याचा सल्ला 'मैंने प्यार किया फेम' अभिनेत्री भाग्यश्री देत आहे. यासोबतच भाग्यश्रीने चंपीसाठी खास तेलाची माहिती दिली आहे. भाग्यश्रीने नुकताच तिच्या इंस्टग्राम पेजवरून केसांना तेल मालिश - चंपी करत असतानाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, भाग्यश्रीने केसांची मालिश करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या तेलाचा वापर करावा याची सविस्तर माहिती दिली आहे(Bhagyashree Shares Her Favourite 2 Hair Oils For Strong & Shiny Hair).

भाग्यश्रीने चंपी करण्यासाठी कोणते तेल वापरण्याचा सल्ला दिला आहे... 

भाग्यश्रीने केसांना मालिश करण्यासाठी शुद्ध नारळाचे खोबरेल तेल व बदामाचे तेल वापरण्याचा सल्ला दिला आहे. या दोन्ही प्रकारच्या तेलांमध्ये असणारी पोषक तत्व केसांच्या वाढीसाठी व मसाज करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

महागडे तेल-शाम्पू -केमिकल्सचा मारा टाळा, जावेद हबीब सांगतात सुंदर केसांसाठी ५ नॅचरल उपाय...

केसांना खोबरेल तेलाने मसाज करण्याचे फायदे :- 

१. खोबरेल तेलामध्ये असणारे फॅटी अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन्स केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी अतिशय फायदेशीर असतात.

२. केसांना नियमितपणे खोबरेल तेल लावल्यास केसांतील मॉइश्चर टिकून राहण्यास मदत होते. तसेच हवेमुळे केसांवर होणाऱ्या परिणामांपासून केसांचे रक्षण करण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर ठरते. 

३. केसांची मुळे, केस मऊसूत व्हावेत, त्यांना चांगले पोषण मिळावे यासाठी खोबरेल तेलाचा चांगला उपयोग होतो.

४. डोक्याच्या केसांच्या मुळांना खोबरेल तेल गरम करुन लावल्यामुळे कोंड्याची समस्या दूर होते. फक्त आठवड्यातून एकदा कोमट तेल डोक्याला लावून बोटांनी हलका मसाज करा. त्यानंतर संपूर्ण डोक्याला रात्रभर तेल राहू द्या.   

महागडे प्रयोग कशाला, ५ सोपे उपाय-केस गळणं बंद ! जावेद हबीब सांगतात सोपे स्मार्ट उपाय...

केस गळतीची समस्या कायमची संपवायची ? करा कढीपत्त्याच्या एक परफेक्ट उपाय...

केसांना बदामाच्या तेलाने मसाज करण्याचे फायदे :- 

१. बदामाच्या तेलाने मसाज केल्यास दुभंगलेल्या केसांची समस्या कमी होण्यास मदत मिळेल.

२. टाळूची त्वचा निरोगी राहण्यास बदामाचे तेल फायदेशीर ठरते. 

३. बदामाच्या तेलामुळे बॅक्टेरिअल इंफेक्शनची समस्या उद्भवणार नाही. 

४. केसांवरील नैसर्गिक चमक कमी होणार नाही. 

आता विसरा केसगळती, केस घनदाट करण्यासाठी आजीच्या बटव्यातील सिक्रेट नैसर्गिक शॅम्पूची जादू...

इतर तेलांचाही करा वापर... 

केसांना मसाज व चंपी करण्यासाठी भाग्यश्री खोबरेल तेल व बदामाच्या तेलासोबतच इतर प्रकारची देखील तेलं वापरण्यास सांगते. याशिवाय खोबरेल तेलात व मोहोरीच्या तेलात कलौंजी घालून ते हलकेसे गरम करून केसांच्या मुळांना लावल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. याचबरोबर आपण खोबरेल तेलात मेथीचे दाणे भिजत घालून हे तेल देखील केसांना मसाज करण्यासाठी वापरू शकतो.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स