Lokmat Sakhi >Beauty > ५४ वर्षीय भाग्यश्रीच्या दाट-शायनी केसाचं सिक्रेट; सुंदर केसांसाठी २ प्रकारच्या तेलाने करते मालिश

५४ वर्षीय भाग्यश्रीच्या दाट-शायनी केसाचं सिक्रेट; सुंदर केसांसाठी २ प्रकारच्या तेलाने करते मालिश

Bhagyashree shares her secret for long and healthy hair : केस मऊ, चमकदार ठेवण्यासाठी नारळ आणि बदामाच्या तेलाने हेअर मसाज करते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 04:25 PM2023-10-08T16:25:51+5:302023-10-08T16:29:39+5:30

Bhagyashree shares her secret for long and healthy hair : केस मऊ, चमकदार ठेवण्यासाठी नारळ आणि बदामाच्या तेलाने हेअर मसाज करते.

Bhagyashree shares her secret for long and healthy hair Bhagyashree's hair care tips | ५४ वर्षीय भाग्यश्रीच्या दाट-शायनी केसाचं सिक्रेट; सुंदर केसांसाठी २ प्रकारच्या तेलाने करते मालिश

५४ वर्षीय भाग्यश्रीच्या दाट-शायनी केसाचं सिक्रेट; सुंदर केसांसाठी २ प्रकारच्या तेलाने करते मालिश

अभिनेत्री भाग्यश्री आता चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर कायम एक्टिव्ह असते. ती नेहमी आपल्या स्किन केअर टिप्स, फिनटेस टिप्स चाहत्यांबरोबर शेअर करत असते. ५४ वर्षीय भाग्यश्रीने  इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने आपल्या चमकदार, मुलायम केसांबद्दल सांगितले होते. (Bhagyashree shares her secret for long and healthy hair)

भाग्यश्रीच्या लांब केसांचे रहस्य काय? (Secret of Bhagyashree's Healthy Hair)

अभिनेत्री भाग्यश्री आपल्या केसांना मऊ, चमकदार ठेवण्यासाठी नारळ आणि बदामाच्या तेलाने हेअर मसाज करते. भाग्यश्रीच्या मते पुरातन काळापासूनच केसांना तेलाने मसाज करणं फायदेशीर मानलं जातं. केसांना तेलाने मालिश केल्यास केस हेल्दी राहण्याबरोबरच दाट राहण्यासही मदत होते.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये भाग्यश्रीने लिहिले की नारळाचे तेल केसांसाठी लाभदायक मानले दाते. पण स्काल्पसाठी बदामाचे तेल उत्तम ठरते. म्हणूनच जरी तुम्ही केसांच्या लांबीसाठी नारळाचं तेल वापरत असाल तरीही स्काल्पवर बदामाचे तेल लावावे.

नारळाच्या तेलाने मसाज केल्यास केसांना कोणते फायदे मिळतात?

१) केसांना फाटे फुटण्याचे प्रमाण कमी होते

२) स्काल्पमध्ये रक्ताभिसरण चांगलं होतं त्यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळते. 

३) याशिवाय स्काल्प आणि केस कोरडो पडत  नाहीत. केस स्ट्राँग होण्यास मदत होते. 

४) केसांचा फ्रिजीनेस निघून जातो आणि कोंड्याच्या समस्येवरही आराम मिळतो. केसांना पोषण मिळते.

बदामाचे तेल स्काल्पवर लावण्याचे फायदे

बदामाच्या तेलात व्हिटामीन ई आणि प्रोटीन्स यांसारखी पोषक तत्व असतात जे केसांना मजबूत होतात. याशिवाय केसांना दाट बनवतात. रोज बदामाचे तेल लावून केस धुतल्याने केसांच्या वाढीस  मदत होते. बदामाच्या तेलातील एंटी ऑक्सिडंट्स प्रदूषण आणि उष्णतेमुळे होणारं केसाचं नुकसान टाळतात.

१) बदामाच्या तेलाने केस मुळांपासून मजबूत होतात.

२)  केसांची वाढ चांगली होते. 

३) वेळेआधी केस पांढरे होण्याची समस्या रोखता येते.

४)  केस मऊ आणि चमकदार बनतात. तेल न लावल्यास हेअर फॉल वेगाने होऊ शकतो. 

Web Title: Bhagyashree shares her secret for long and healthy hair Bhagyashree's hair care tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.