Join us

ना हेअर कलर ना हेअर डाय या नॅचरल उपायानं केस काळे करते भारती सिंग, काय आहे उपाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:23 IST

Bharti Singh Hair Care Tips : प्रसिद्ध कॉमेडिअन भारती सिंगने एका पॉडकास्टमध्ये केसांची काळजी घेण्यासाठी ती काय करते याबाबत सांगितलं आहे.

Bharti Singh Hair Care Tips : जर तुमचं वय वाढलं असेल आणि केस पांढरे झाले असतील तर ही एक सामान्य बाब आहे. पण जर कमी वयातच तुमचे केस पांढरे झाले असतील तर ही चिंतेची बाब आहे. वेळेवर न जेवणं, पौष्टिक आहार न घेणं, केसांची काळजी न घेणं, केमिकल प्रोडक्ट्सचा वापर करणं अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आजकाल कमी वयातच केस पांढरे होऊ लागले आहेत. त्यामुळे बरेच लोक हेअर डाय किंवा कलरचा वापर करतात. या गोष्टींनीही केसांचं नुकसानच होतं. अशात केस काळे ठेवण्यासाठी आम्ही काही नॅचरल उपाय सांगणार आहोत.

काय आहे उपाय?

प्रसिद्ध कॉमेडिअन भारती सिंगनं एका पॉडकास्टमध्ये केसांची काळजी घेण्यासाठी ती काय करते याबाबत सांगितलं आहे. भारती म्हणाली की, 'मी आजपर्यंत  केसांना कधीच कलर केलं नाही. त्याशिवाय मी केस काळे ठेवण्यासाठी एक नॅचरल गोष्टी केसांवर लावते'.

भारतीनं सांगितलं की, 'मी केसांवर मेहंदी लावते. ती लावण्याची सुद्धा एक खास टेक्नीक आहे. यासाठी लोखंडी कढईमध्ये नॅचरल मेहंदी टाका. त्यानंतर त्यात चहा पावडरचं पाणी, अ‍ॅलोवेरा जेल टाका. हे मिश्रण रात्रभर तसंच ठेवा. सकाळी केसांवर लावा'.

कसा मिळतो फायदा?

मेहंदी

मेहंदीमध्ये हीना असतो, जो केसांना नॅचरल पद्धतीनं रंग देतो. मेहंदी तयार करण्यात कोणत्याही केमिकल्सचा वापर केला जात नाही. त्यामुळे याचे काही साइड इफेक्ट्सही होत नाहीत.

चहा पावडरचं पाणी

चहा पावडरमध्ये टॅनिन नावाचं एक तत्व असतं, जे केसांना नॅचरल काळा रंग देण्यास मदत करतं. त्याशिवाय चहा पावडरच्या पाण्यानं केसांवर नॅचरल चमकही येते. याच्या नियमित वापरानं केस मुलायम, चमकदार दिसतात.

अ‍ॅलोवेरा जेल

अ‍ॅलोवेरा जेलनं केस मॉइश्चराइज करण्यास मदत मिळते. ड्राय आणि फ्रिजी झालेले केस चमकदार दिसू लागतात. त्याशिवाय अ‍ॅलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ई असतं जे केसांसाठी फायदेशीर असतं.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स