Join us  

केसांच्या वाढीसाठी वापरा आयुर्वेदातील एक खास वनस्पती, केसांच्या अनेक समस्यांवर पारंपरिक उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2024 9:27 AM

TOP WAYS TO USE BHRINGRAJ FOR HAIR GROWTH : केसांचे सौंदर्य व आरोग्य चांगले राहण्यासाठी पारंपारिक आयुर्वेदिक उपचारात भृंगराज वापरण्याचा सल्ला दिला जातो..

आपले केस निरोगी, घनदाट आणि लांबसडक होण्यासाठी आपण हेअर ऑयलिंग करतो. यासाठी आपण शक्यतो खोबरेल तेल किंवा इतर प्रकारची तेल वापरतो.  परंतु , आणखी एक तेल आहे जे आयुर्वेदात अत्यंत लोकप्रिय आहे, ते म्हणजे भृंगराज तेल. भृंगराज केसांच्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी मदत करते. केसांचे सौंदर्य व आरोग्य चांगले राहण्यासाठी पारंपारिक आयुर्वेदिक उपचारात भृंगराज वापरण्याचा सल्ला दिला जातो(Wonderful Benefits of Bhringraj for hair).

केस गळती, केस पातळ होणे, केसांची वाढ खुंटणे यांसारख्या अनेक समस्यां दूर करण्यासाठी भृंगराज हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. भृंगराज तेलात भरपूर पोषक घटक असतात जे केसांना मुळांपासून मजबूत करण्‍यात आणि स्कॅल्पला निरोगी ठेवण्‍यात मदत करतात. केसांसाठी भृंगराज का महत्वाचे आहे व त्याचा वापर केसांसाठी कसा करावा हे पाहुयात(Bhringraj can help you boost hair growth and control hair fall! Know how to use it).

केसांसाठी भृंगराज का महत्वाचे आहे ? 

भृंगराज ही एक औषधी वनस्पती आहे जी केसांसाठी इतकी फायदेशीर आहे की, केसांच्या कोणत्याही गंभीर समस्येवर रामबाण उपाय ठरु शकते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने त्यांच्या एका अभ्यासात असे लिहिले आहे की भृंगराज हेअर ग्रोथ सायकल अ‍ॅक्टिव्ह करण्याचे मुख्य कार्य करते. त्यामुळे केसगळती कमी करून केसांच्या वाढीसाठी भृंगराजचा अवश्य वापर करावा. 

जान्हवी कपूर सांगते, आईने तिला शिकवलेला खास उपाय! चेहऱ्यावर श्रीदेवीसारखा ग्लो हवा तर...

केसांसाठी भृंगराज वापरण्याचे फायदे... 

१. भृंगराज केसांची मुळे मजबूत करते आणि केस गळणे कमी करते.२. याच्या वापरामुळे अकाली पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते आणि केसांना नैसर्गिक रंग मिळू शकतो.३. केसांना मुलायम, चमकदार करण्यासाठी भृंगराज फायदेशीर ठरू शकते.४. भृंगराजमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात जे कोंडा दूर करण्यास मदत करतात, तसेच स्कॅल्पची स्वच्छता ठेवतात.५. ही औषधी वनस्पती केसांच्या वाढीस आणि त्यांना मजबूत करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

केसांना मेहेंदी लावूनही सुंदर गडद रंग येत नाही? पाहा मेहेंदी भिजवण्याची योग्य पद्धत...

केसांसाठी भृंगराजचा वापर कसा करावा ? 

१. आजकाल बाजारात सर्व काही अगदी सहज उपलब्ध  होते. भृंगराजची ताजी फुले, पाने पावडरच्या स्वरुपात मिळू शकते. त्याचबरोबर आपण भृंगराजच्या तेलाचा वापर देखील करु शकता. भृंगराज साधारणपणे पावडर स्वरूपात वापरतात. ही औषधी वनस्पती तिळाचे तेल, नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह तेल यासारख्या इतर कोणत्याही तेलात मिक्स करुन वापरली जाऊ शकते. 

२.  भृंगराज पावडर खोबरेल तेलात मिसळून त्याची पेस्ट तयार करावी. तयार केलेली पेस्ट केसांना १ ते २ तास लावून ठेवावी. त्यानंतर केस पाण्याने धुवा. हा  उपाय स्कॅल्पची स्वच्छ करण्यात आणि केसांना पोषण देण्यास मदत करेल.

३. भृंगराज पाने घेऊन त्याची बारीक पेस्ट बनवून केसांवर लावा. या पेस्टमध्ये आपण आवळा तेल किंवा पावडर मिक्स करू शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी