Lokmat Sakhi >Beauty > केस पिकलेत-डाय, मेहेंदीची सवय नाही? 'या' पानांचा घरगुती डाय लावा, काळभोर होतील केस

केस पिकलेत-डाय, मेहेंदीची सवय नाही? 'या' पानांचा घरगुती डाय लावा, काळभोर होतील केस

Bhringraj Oil For Grey Hairs (Pandhare kes kale karynayche gharguti Upay) : भृंगराजलला केशराज असंही म्हटलं जातं. याच्या वापराने कमकुवत केस मजबूत होतात आणि स्काल्पच्या समस्याही टाळता येतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 01:44 PM2024-01-02T13:44:15+5:302024-01-02T16:56:55+5:30

Bhringraj Oil For Grey Hairs (Pandhare kes kale karynayche gharguti Upay) : भृंगराजलला केशराज असंही म्हटलं जातं. याच्या वापराने कमकुवत केस मजबूत होतात आणि स्काल्पच्या समस्याही टाळता येतात.

Bhringraj Oil For Grey Hairs : White Hairs Turn To Black Hair Using Bhringraj For Hair According to Research | केस पिकलेत-डाय, मेहेंदीची सवय नाही? 'या' पानांचा घरगुती डाय लावा, काळभोर होतील केस

केस पिकलेत-डाय, मेहेंदीची सवय नाही? 'या' पानांचा घरगुती डाय लावा, काळभोर होतील केस

केसांच्या वाढीसाठी आणि काळा रंग (Black Hairs) टिकवून ठेवण्यासाठी केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करू नका, असं वारंवार सांगितलं जातं. केसांसाठी औषधी गुणांनी परिपूर्ण भृंगराज सौंदर्य उत्पादनांसाठी उत्तम मानले जाते. (Grey Hairs Solution Bhringraj) हेअर केअर उत्पादनांमध्ये भृंगराजचा वापर पूर्वापार केला जात आहे. (Home remedies for grey hairs) केसांना भृंगराज लावण्याची योग्य पद्धत माहीत असेल तर दाट, लांब केस मिळवणं सोपं होईल. भृंगराजलला केशराज (Keshraj) असंही म्हटलं जातं. याच्या वापराने कमकुवत केस मजबूत होतात आणि स्काल्पच्या समस्याही टाळता येतात. (White Hairs Turn To Black Hair Naturally Using Bhringraj Leaves For Hair)

हेल्थलाईनच्या माहितीनुसार आयुर्वेदात भृंगराजला (Bhringraj) केसांच्या वाढवण्यासाठी,  पांढरे केस होऊ नयेत, कोंडा होऊ नये यासाठी महत्वपूर्ण मानले जाते. २०११ च्या एका अभ्यासानुसार भृंगराजचा अर्क बॅक्टेरियांच्या संसर्गाशी लढण्याासठी प्रभावी आहे. २००८ मध्ये  उंदिरावंर केलेल्या एका अभ्यासात दिसून आले की भृंगराज तेल वापरल्याने केसांच्या फॉलिकल्सची संख्या वाढते आणि केसांची गळती थांबवण्यासाठी ते प्रभावी ठरते. भृंगराजच्या तेलात व्हिटामीन ई सुद्धा असते.  यामुळे फ्रि रॅडिकल्सची वाढ होत नाही.

केसांवर भृंगराज पानांचा वापर करा करावा? (How to Use Bhringraj Leaves For Hairs)

1) या उपायामुळे केसांचा काळा रंग टिकून राहील आणि  कोंडा कमी होण्यासही मदत होईल. सगळ्यात आधी  ताजी भृंगराजची पानं घेऊन वाटून घ्या.

2) भृंगराजची पानं वाटल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की त्याचा रंग काळा पडला आहे. या पानांची पेस्ट तुम्ही थेट केसांवर डाय म्हणून अप्लाय करू शकता किंवा मेहेंदीमध्ये या पानांची पेस्ट घालून केसांना लावू शकता.

3) मोहोरीच्या किंवा कोणत्याही तेलात या पानांची पेस्ट घालून  तेल तयार करून घ्या. पानांची पेस्ट केसाच्या मुळांनाही लावू शकता. कोणत्याही खर्चाशिवाय केसांचा पोत सुधारेल आणि केसांची चांगली वाढसुद्धा होईल. 

भृंगराजचे तेल केसांवर कसे लावावे? (How to Make Bhringraj Oil)

भृंगराजच्या तेलाचा (Bhringraj Oil) वापर केल्यास केसांमध्ये आश्चर्यकारक फरक दिसून येईल. भृंगराज तेल तयार करण्यासाठी मूठभर भृंगराजची पानं घ्या ही पानं एकदम बारीक चिरून घ्या.(How to Apply Bhringraj Oil)  ही पानं भाजून त्यात १ कप नारळाचे तेल मिसळून जवळपास ५ मिनिटं शिजवून घ्या. जवळपास ५ मिनिटं व्यवस्थित शिजवा नंतर गॅस बंद करा. नंतर हे तेल गाळून एका बरणीत भरून घ्या. केसांची मालिश करण्यासाठी तुम्ही या तेलाचा वापर करू शकता. 

Web Title: Bhringraj Oil For Grey Hairs : White Hairs Turn To Black Hair Using Bhringraj For Hair According to Research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.