Join us

महिन्याभरात केस १ इंचही वाढत नाहीत; बायोटीनयुक्त ५ पदार्थ खा, लांबचलांब-दाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 11:40 IST

Biotin Foods For Long Hairs : बायोटीन पाण्यातील सोल्यूबल व्हिटामीन बी आहे. यामुळे केस  मजबूत होतात.

हेअर केअरमध्ये (Hair Care  Tips) केसांना तेल लावणं आणि डाएटची काळजी घेणं फार महत्वाचे असते. हेअर ग्रोथसाठी बायोटीन अनेक प्रकारे फायदेशीर ठरतेत. बायोटीन बी-कॉम्पलेक्स फॅमिलीचे आहे. याला बी-७  असंही म्हटलं जातं. बायोटीन पाण्यातील सोल्यूबल व्हिटामीन बी आहे. यामुळे केस  मजबूत होतात आणि केसांशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते. केस पातळ होणं, कोरडे पडणं, बायोटीन रिच फूडमुळे अनेक फायदे मिळतात. आपल्या आहारात कोणत्या बायोटीन रिच्ड पदार्थांचा समावेश केल्यास केसांची वाढ चांगली होईल ते समजून घेऊ. (Best Biotin Rich Food For Hair Growth)

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार बायोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने केसांची वाढ चांगली होते. एका छोट्या अभ्यासात दिसून आले की, केस आणि नखांच्या चांगल्या वाढीसाठी १८ जण बायोटीनचा वापर करत होते. बायोटीन सप्लिमेंट्सच्या वापरानंतर त्यांच्या नखं आणि केसांच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचं दिसून आले.

1) शेंगा आणि नट्स

बदाम, शेंगदाणे, अक्रोड, सुर्यफुलाच्या बीयांना नट्स  आणि सिड्चं सुपरफूड म्हटले जाते. यात भरपूर प्रमाणात बायोटीनबरोबरच मिनरल्स आणि हेल्दी फॅटी एसिड्स असतात. हेल्दी हेअर्ससाठी डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश करा. 

2) एवाकॅडो

एवोकॅडो बायोटीनचा खजिना असण्याबरोबरच हेल्दी फॅट, मिनरल्स आणि व्हिटामीन्सनी परिपूर्ण आहे. एवोकॅडोचा आहारात समावेश करून केसांना हेल्दी बनवता येते. हेल्दी केस वेगाने वाढतात.

3) रताळे

रताळ्यांमध्ये बीटा कॅरोटीन आणि बायोटीन असते. याला शरीर व्हिटामीन ए मध्ये बदलते. व्हिटामीन ए हेअर रूट्सना मजबूत बनवते ज्यामुळे केस वाढण्यास मदत होते. 

4) पालक

पालकात आयर्न, व्हिटामीन एस आणि व्हिटामीन सी यांबरोबर बायोटीन असते. हे हेअर फॉलिकल्सना स्ट्राँग बनवते. ज्यामुळे केस वेगाने वाढतात. 

5) अन्नधान्य

ओट्स, जवस, ब्राऊन राईस मध्ये मोठ्या प्रमाणात बायोटीन असते. ज्यामुळे हेअर ग्रोथसाठी मदत होते. डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश केल्यास  केस दाट होतील आणि गळणंही थांबेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी