Join us  

बिपाशा बासूचा आवडता बेसन पीठ - जास्वंद फेसपॅक, चेहऱ्यावर येईल नितळ ग्लो, पाहा कसा करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2023 7:17 PM

Bipasha Basu's Favorite Besan - Hibiscus Facepack बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा चाळीशीतही दिसते तितकीच यंग, एक फेसपॅक, चेहरा दिसेल तुकतुकीत

बंगालची बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री बिपाशा बासू वयाच्या ४४ वर्षातही तितकीच सुंदर दिसते. तिला नुकतंच कन्यारत्न प्राप्त झाली असून, ती सध्या आपले मातृत्व एन्जोय करत आहे. बिपाशा नेहमी आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसून येते. ती आपल्या स्कीनची देखील तितकीच काळजी घेते. अनेक महिलांच्या चेहऱ्यावर तिशीनंतर सुरकुत्या दिसू लागतात. मात्र, बिपाशाच्या चेहऱ्यावर एकही रिंकल्स दिसून येत नाही.

बिपाशा आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी होममेड फेसपॅकचा वापर करते. बेसन आणि जास्वंदापासून तयार हा  फेसपॅक चेहऱ्याला ग्लो तर देतोच यासह रिंकल्स, सुरकुत्यापासून बचावही करतो.

बेसन - हिबिस्कस  फेसपॅक बनवण्यासाठी लागणारं साहित्य

बेसन

एलोवेरा जेल

दही

गुलाब जल

जास्वंद पावडर

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये बेसन घ्या, त्यात एलोवेरा जेल, हिबिस्कस पावडर, दही, गुलाब जल टाकून चांगले मिक्स करा. हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर चेहऱ्याला आणि गळ्यावर लावा.

मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावल्यानंतर २० मिनिटे तसेच ठेवा. मिश्रण सुकल्यानंतर सध्या पाण्याने धुवून घ्या. हा फेसपॅक आपण आठवड्यातून २ वेळा लावू शकता.

बेसन - हिबिस्कस फेसपॅकचे फायदे

२०१७ मध्ये द ओपन डर्मेटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, बेसन त्वचेसाठी टॉनिक म्हणून काम करते, यासह चेहरा स्वच्छ आणि एक्सफोलिएट करण्यास मदत करते.

हे फेसपॅक त्वचेवरील टॅन यासह अतिरिक्त ऑयल काढण्यास मदत करते.

हिबिस्कस या फुलांच्या अर्कांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँथोसायनिन्स आढळते. जे त्वचेवरील फाइन लाइन्स कमी करण्यास मदत करते.

टॅग्स :बिपाशा बासूब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी