हिवाळ्यात अनेकांची त्वचा ही कोरडी, निस्तेज आणि काळपट पडू लागते. जास्त वेळ उन्हात फिरल्याने देखील त्वचा टॅन पडते. अनेक वेळा टॅनिंग झाल्यावर चप्पलचे डिझाइन पायावर उठतात. अशा परिस्थितीत, आपण अनेक प्रोडक्ट्सचा वापर करतो. मात्र, पार्लरमधील उपचार किंवा महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा आपण घरगुती उपाय करून टॅनिंग दूर करू शकता. आज आपण अश्या काही फूट पॅक्स संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. जी घरच्या साहित्यात बनणारी आहे. या फूट पॅक्सचा जर आपण नियमित वापर केलात तर, आपली कोरडी, निस्तेज आणि काळपट त्वचा लवकर कोमल होईल आणि पूर्वीसारखी उजलेल.
दूध आणि क्रीम
पायांवर दिसणारा काळपटपणा या पॅकमुळे दूर होईल. यासह एक ओलावा देखील आपल्या पायांना मिळेल. हे फूट पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात चार ते पाच चमचे दूध घ्या, त्यात एक मोठा चमचा फ्रेश क्रीम टाका. हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्याला हाताने पायावर लावणे. हे मिश्रण आपण रात्रभर लावून ठेऊ शकता. अथवा दोन ते तीन तासात धुवून टाकू शकता. हे मिश्रण नियमित लावल्याने पायांना ओलावा येईल यासह काळपटपणा दूर होऊन एक नवी चमक येईल.
हळदी आणि बेसन
त्वचेची डेड स्किन आणि टॅनिंग काढून टाकण्यासाठी हळद आणि बेसनाचा स्क्रब खूप फायदेशीर आहे. हा स्क्रब बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात तीन चमचे बेसन घ्या, त्यात अर्धा चमचा हळद मिक्स करा. बेसन आणि हळद मिक्स झाल्यानंतर त्यात दोन चमचे दही टाका. आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. पेस्ट तयार झाल्यानंतर पायांना चांगले लावा, आणि साधारण पंधरा ते वीस मिनिटे ठेवावे. त्यांनतर थंड पाण्याने धुवून टाका. जोपर्यंत पायावरील टॅनिंग निघत नाही, तोपर्यंत हे मिश्रण लावावे.
ओट्स आणि दही
ओट्स बारीक करून एका भांड्यात घ्यावे. त्यात दही मिक्स करावे. हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर पायावर लावावे. हे मिश्रण साधारण वीस मिनिटे ठेवावे. आणि चांगले घासून काढावे. वीस मिनिटे झाल्यानंतर धुवून टाकावे. पाय धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावावे. हे स्क्रब एक्सफोलिएटर म्हणूनही काम करते. रिझल्ट दिसण्यासाठी आपण हे स्क्रब आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरू शकता.
दही आणि टोमॅटो
टोमॅटोचा रस त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यासाठी फायदेशीर आहे. त्वचा स्वच्छ आणि उजळ करण्यासाठी खूप मदतगार आहे. यासह दही त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते. पायातील काळपटपणा दूर करण्यासाठी टोमॅटोची साल काढून बारीक करा. आता त्यात एक चमचा दही मिसळा आणि अर्धा तास पायांवर ठेवा. शेवटी थंड पाण्याने धुवून टाका. उत्तम रिझल्टसाठी आठवड्यातून तीन ते चार वेळा ही प्रक्रिया करावी.
मध आणि पपई
सर्वप्रथम पिकलेला पपई घ्या आणि त्यात मध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट पायांवर अर्धा तास ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर पाण्याने धुवा. उत्तम रिजल्टसाठी ही पेस्ट आठवड्यातून दोनदा लावा. पायांवरील काळपटपणा दूर होईल त्वचा कोमल दिसेल.