Lokmat Sakhi >Beauty > सतत चष्मा वापरून नाक आणि कपाळावर काळे झाले? ७ टिप्स, डाग होतील गायब..

सतत चष्मा वापरून नाक आणि कपाळावर काळे झाले? ७ टिप्स, डाग होतील गायब..

How To Get Rid Of Spectacle Marks On The Nose & Forehead : नैसर्गिक गोष्टींचा वापर करून घरच्या घरी स्किनवरील हे चष्म्याचे काळे डाग घालवू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2023 04:25 PM2023-01-18T16:25:32+5:302023-01-18T17:01:05+5:30

How To Get Rid Of Spectacle Marks On The Nose & Forehead : नैसर्गिक गोष्टींचा वापर करून घरच्या घरी स्किनवरील हे चष्म्याचे काळे डाग घालवू शकतो.

Black nose and forehead from constant use of glasses? 7 tips, stains will disappear.. | सतत चष्मा वापरून नाक आणि कपाळावर काळे झाले? ७ टिप्स, डाग होतील गायब..

सतत चष्मा वापरून नाक आणि कपाळावर काळे झाले? ७ टिप्स, डाग होतील गायब..

आजकालच्या काळामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये नवीन पिढी सर्वात पुढे आहे. मोबाईलचा अतिवापर, ऑनलाइन शिक्षण, जास्त काळ टीव्ही पाहणे, कॉम्प्युटरवर काम यांसारख्या गोष्टींमुळे आपल्या डोळ्यांचा सतत स्क्रीनशी संपर्क येत असतो. चष्मा लागण्याच्या कारणांमध्ये मुख्यत्वे करून या सगळ्या कारणांचा समावेश होतो. जितका वेळ आपण कामाच्या ठिकाणी असतो किमान तितका वेळ तरी डोळ्यांवर चष्मा लावणे भाग असते.

हा चष्मा सतत डोळ्यांवर लावल्यामुळे आपल्या नाकावर आणि डोळ्यांच्या खाली त्या चष्म्याचे हळुहळु काळे डाग पडू लागतात. या काळ्या डागांमुळे आपल्या चेहेऱ्याचे सौंदर्य हरवून जाते. हे डाग घालविण्यासाठी आपण विविध महागड्या क्रिम्सचा वापर करतो. कधी या क्रिम्सचा वापर करून आपल्याला फरक जाणवतो तर कधी इतक्या महागड्या क्रिम्स घेऊनसुद्धा काही उपयोग होत नाही. अशावेळी आपण काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करून घरच्या घरी स्किनवरील हे चष्म्याचे काळे डाग घालवू शकतो(How To Get Rid Of Spectacle Marks On The Nose & Forehead). 

नक्की कोणत्या नैसर्गिक घटकांचा वापर करू शकतो? 

१. एलोवेरा जेल - दिवसभर सतत चष्मा लावल्याने आपल्या नाकावर आणि डोळ्यांखाली एक प्रकारचे काळे डाग दिसू लागतात. हे काळे डाग नैसर्गिक पद्धतीने घालविण्यासाठी एलोवेरा जेल फायदेशीर ठरू शकते. एलोवेरा जेल आपल्या स्किनला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता अगदी नैसर्गिक पद्धतीने चष्म्याचे काळे डाग काढून टाकण्यास मदत करेल. रात्री झोपताना स्किन आणि नाकावरील जो भाग काळा झाला आहे त्या भागावर एलोवेरा जेल लावून झोपावे आणि सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे. हे एलोवेरा जेल तुम्ही दिवसा देखील लावू शकता परंतु रात्री झोपताना आपण चष्मा लावत नसल्यामुळे रात्री लावल्यास अधिक फायदेशीर होईल.

  

२. काकडी - चष्म्यामुळे स्किनवर आलेले काळे डाग कमी करण्यासाठी आपण काकडीचा देखील वापर करू शकतो. काकडी घेऊन तिच्या गोल मोठ्या आकाराच्या चकत्या करून घ्या. या चकत्या थंड होण्यासाठी काही काळ फ्रिजमध्ये ठेवा. चकत्या थंड झाल्यावर त्या फ्रिजमधून बाहेर काढून घ्या. या चकत्या आपल्या चेहेऱ्यावरील स्किनला सोसवेल इतक्या नॉर्मल टेंम्प्रेचरला आल्यावर त्या काळ्या डागांवर या चकत्या ठेवा. हा उपाय आठवड्यातून किमान ३ वेळा करावा. यामुळे स्किनवर आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होईल.

 

३. बदामाचे तेल - बदामाचे तेल चष्म्यामुळे स्किनवर आलेल्या काळ्या डागांना घालविण्यासाठी फायदेशीर ठरते. बदामाच्या तेलाचे ५ ते ६ थेंब हातावर घेऊन जो भाग काळा झाला आहे त्या भागावर या तेलाने हलक्या हाताने मालीश करावे. असे केल्याने त्या भागावरील स्किनचा काळपटपणा दूर होण्यास मदत होते. 

४. बटाट्याचा रस - बटाटा प्रत्येक घरात उपलब्ध असतोच. बटाट्याचा रस वापरुन आपण चष्माचे काळे डाग मिटवू शकतो. कच्चा बटाटा किसल्यानंतर त्याचा रस काढा. बटाट्याचा रस थोडावेळ डागांवर लावा. नाकावरील काळे डाग काही दिवसांत अदृश्य होतील.

५. मध - मध हे स्किनसाठी खूप फायदेशीर असते. त्यात अँटिऑक्सिडेंट आणि एंटीसेप्टिक गुणधर्म असतात. ते स्किनवरील गडद डाग दूर करण्यात मदत करतात. आपण मध वापरुनदेखील आपल्या नाकावरील काळ्या डागांपासून मुक्ती मिळवू शकतो. 

६. टोमॅटो - चेहर्‍यावरील डाग दूर करण्यासाठी टोमॅटो खूप प्रभावी आहे. त्यात एक्सफोलिएशन हा घटक असतो, तो आपल्या चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकतो. आपला चेहरा आणि नाकावरचे काळे डाग दूर करण्यासाठी टोमॅटो पेस्ट लावा. याचा उपयोग केल्याने काही दिवसात तुमच्या चेहेऱ्यावरील काळे डाग अदृश्य होतील.  

७. संत्र्याची साल - नाकावरील काळे डाग दूर करण्यासाठी आपण संत्र्याच्या फळाची साल देखील वापरु शकतो. संत्र्याची साल बारीक करून त्यात दूध मिसळा आणि पेस्ट म्हणून तयार करुन डाग असलेल्या जागेवर हलके हाताने मालिश करा. नाकावरील काळ्या खुणा काही दिवसातच कमी होतील.

Web Title: Black nose and forehead from constant use of glasses? 7 tips, stains will disappear..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.