Lokmat Sakhi >Beauty > चहापत्तीच्या पाण्यात दडलंय घनदाट केसांचं सिक्रेट; पण 'या' जादुई पाण्याचा वापर कसा करावा?

चहापत्तीच्या पाण्यात दडलंय घनदाट केसांचं सिक्रेट; पण 'या' जादुई पाण्याचा वापर कसा करावा?

Black Tea Hair Rinse for Hair Growth : चहाच्या पाण्यात मिसळा २ गोष्टी; केस वाढतील भरभर - होतील काळेभोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2024 04:17 PM2024-05-30T16:17:24+5:302024-05-30T17:44:52+5:30

Black Tea Hair Rinse for Hair Growth : चहाच्या पाण्यात मिसळा २ गोष्टी; केस वाढतील भरभर - होतील काळेभोर

Black Tea Hair Rinse for Hair Growth | चहापत्तीच्या पाण्यात दडलंय घनदाट केसांचं सिक्रेट; पण 'या' जादुई पाण्याचा वापर कसा करावा?

चहापत्तीच्या पाण्यात दडलंय घनदाट केसांचं सिक्रेट; पण 'या' जादुई पाण्याचा वापर कसा करावा?

आपल्या किचनमध्ये अशा अनेक गोष्टी असतात (Hair Growth). ज्या अत्यंत गुणकारी असतात, आणि याचा फायदा आरोग्य, त्वचा आणि केसांनाही होतो. यात चहापत्तीचा देखील समावेश आहे (Hair Care Tips). चहापत्तीचा वापर करून आपण चहा करतो, पण याचा वापर आपण केसांसाठीही करू शकता. यामुळे केसांना चमक तर येतेच, शिवाय ग्रोथही होते.

पण केसांवर चहापत्तीचा वापर कसा करावा? याची माहिती ब्युटी एक्सपर्ट पूनम चुग यांनी दिली आहे. त्या म्हणतात, 'चहामध्ये असलेले कॅफिन डायहायड्रोटेस्टोस्टेरोन हार्मोनच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवते. या हार्मोनमुळे केस गळतात. यावर उपाय म्हणून केसांवर चहापत्तीचा वापर करू शकता.' पण केसांवर चहापत्तीचे पाणी लावण्याचे फायदे किती पाहूयात(Black Tea Hair Rinse for Hair Growth).

केसांच्या ग्रोथसाठी चहापत्तीच्या पाण्याचा वापर कसा करावा?

चहापत्तीचे पाणी

केस होतील काळेभोर, फक्त मेहेंदीत '१' सिक्रेट पावडर मिसळा- केस गळतीही थांबेल..

व्हिटॅमिन-ई कॅप्सूल

अशा पद्धतीने करा चहापत्तीचे पाणी

सर्वात आधी एक भांडं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यात दोन कप पाणी घाला. त्यात ३ चमचे चहापत्ती घाला. पण याला उकळी आल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. एका भांड्यावर गाळणी ठेवा, त्यात गाळून चहाचे पाणी वेगळे करा.

चहाचे पाणी वेगळे केल्यानंतर थंड होण्यासाठी काही वेळ ठेवा. चहापत्तीचे पाणी थंड झाल्यानंतर त्यात व्हिटॅमिन-ई कॅप्सूल घालून मिक्स करा. तयार पाणी केसांवर लावण्याआधी केस विंचरून घ्या. चहापत्तीचे पाणी केसांच्या मुळांवर लावा आणि हातांनी हलका मसाज करा. ३० मिनिटानंतर केस पाण्याने धुवा. आपण या पाण्याने केस आठवड्यातून एकदा धुवू शकता.

केसांसाठी चहापत्तीच्या पाण्याचा वापर करण्याची दुसरी पद्धत

लागणारं साहित्य

चहापत्तीचे पाणी

फेशिअल हेअर्स काढण्यासाठी हळदीत मिसळा 'सिक्रेट' पीठ आणि माती; त्वचा करेल ग्लो आणि..

हेअर मास्क

अशा पद्धतीने तयार करा हेअर मास्क

केसातून कोंडा आणि केस गळती थांबावी यासाठी आपण चहापत्तीचा हेअर मास्क तयार करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये चहापत्तीचे पाणी घ्या. त्यात २ चमचे दही घालून मिक्स करा. केस विंचरून घ्या, आणि स्काल्पवर तयार मिश्रण लावा. ३० मिनिटानंतर केस पाण्याने धुवा. याचा वापर आपण आठवड्यातून २ वेळा करू शकता. दह्यातील पौष्टीक घटक आणि चहापत्तीतील गुणधर्म केसांच्या वाढीस मदत करते.

Web Title: Black Tea Hair Rinse for Hair Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.