Lokmat Sakhi >Beauty > चेहरा काळवंडला? घरी हळद आहे, हा १ उपाय करा, मिळेल नितळ त्वचा

चेहरा काळवंडला? घरी हळद आहे, हा १ उपाय करा, मिळेल नितळ त्वचा

Use Turmeric to Remove Tan from the Face चेहऱ्यावरील टॅनिंग दुर करण्यासाठी हळदीचा करा असा वापर, चेहरा चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2023 06:39 PM2023-01-24T18:39:16+5:302023-01-24T18:40:44+5:30

Use Turmeric to Remove Tan from the Face चेहऱ्यावरील टॅनिंग दुर करण्यासाठी हळदीचा करा असा वापर, चेहरा चमकेल

Blackened face? Have turmeric at home, do this 1 remedy, you will get smooth skin | चेहरा काळवंडला? घरी हळद आहे, हा १ उपाय करा, मिळेल नितळ त्वचा

चेहरा काळवंडला? घरी हळद आहे, हा १ उपाय करा, मिळेल नितळ त्वचा

बदलत्या ऋतूनुसार त्वचेची निगा राखणं महत्वाचं आहे. कारण प्रत्येक ऋतूनुसार आपल्या त्वचेचा पोत देखील बदलत जातो. हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होते तर उन्हाळ्यात त्वचा काळवंडण्याच्या समस्येमुळे बरेच जण त्रस्त असतात. स्किन काळवंडल्यामुळे सौंदर्यावर बाधा निर्माण होते. थंडीच्या दिवसात त्वचा रुक्ष, कोरडी आणि काळपट पडू लागते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक प्रोडक्ट्सचा वापर करतो. मात्र, महागडे प्रोडक्ट्स आपल्या त्वचेवर योग्य काम करतीलच हे सांगता येत नाही.

त्वचेवरील टॅन आणि काळपटपणा दुर करण्यासाठी काही घरगुती उपाय आपल्याला मदत करतील. यासाठी बहुगुणी हळद आपल्या कामी येईल. हळद आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी खूप उपयुक्त ठरते. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो. ही वनस्पती बारमाही आहे. हळदपासून आपण एक पॅक बनवू शकता. याने चेहऱ्यावरील टॅन आणि काळपटपणा दुर होईल.

त्वचेवरील टॅन दुर करण्यासाठी हळदीचा करा असा वापर

हळद

मध

दुध

कृती

सर्वप्रथम, एका लोखंडी तवा गॅ    सवर गरम करत ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यात हळद टाका. त्या हळदीला गरम तव्यावर चांगले भाजून घ्या. हळद भाजून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. गरम हळद थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. हळद थंड झाल्यानंतर त्यात दुध टाका. १ टेबलस्पून मध टाका. संपूर्ण साहित्य टाकल्यानंतर मिश्रण चांगले मिक्स करा.

मिश्रण मिक्स झाल्यानंतर एका ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण चेहऱ्यावर १० ते १५ मिनटे तसेच ठेवा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवून काढा. उत्तम रिझल्टसाठी ही प्रक्रिया आठवड्यातून २ वेळा करा. याने चेहऱ्याचा काळपटपणा ब्लॅक स्पॉट आणि मुरूम निघण्यास मदत मिळते.

Web Title: Blackened face? Have turmeric at home, do this 1 remedy, you will get smooth skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.