अनेकदा टॅनिंग आणि धुळीमुळे चेहरे निस्तेज आणि काळपट दिसतात. ही समस्या सोडवण्यासाठी फेशियल केले जाते. पण असे करत असताना महिलेकडून मात्र, पायांकडे दुर्लक्ष होते. परिणामी, पायांवरची त्वचा टॅन आणि काळपट तर होतेच यासह कोरडी आणि निर्जीव देखील दिसते. अशा परिस्थितीत पायांची त्वचा चेहऱ्यासारखी हायड्रेटेड, ग्लोइंग आणि मॉइश्चराइज ठेवण्यासाठी खास पेडिक्युअर स्क्रब लावा. हे पेडिक्युअर स्क्रब तुम्ही घरी देखील सहज बनवू शकता. त्याचीच ही रीत..
कसे करायचे स्क्रब
१. फूट स्क्रब बनवण्यासाठी सर्वप्रथम १ कप मध, अर्धा कप एप्सम मीठ, १ कप इन्सटेंट कॉफी, २-३ थेंब इसेंशियल तेल. एका बाऊलमध्ये सर्व मिश्रण एकत्र करावे. एका टबमध्ये गरम पाणी घ्यावे. त्यात हे मिश्रण मिक्स करावे. या पाण्यात आपले पाय सुमारे १० मिनिटे भिजवा. पाय भिजल्यानंतर प्युबिक स्टोनने पाय हलकेच चोळा. यासह नखे स्वच्छ करा. स्वच्छ पाण्याने पाय धुवा आणि टॉवेलने कोरडे पुसून टाका. आता पायांना मॉइश्चरायझर लावा. महिन्यातून एकदा ही प्रक्रिया करावी. पाय स्वच्छ आणि सुंंदर दिसेल.
२. पायातील टॅनिंग दूर करण्यासाठी सर्वप्रथम ३ लिंबुंचा रस, अर्धा कप दूध आणि ३ चमचे ऑलिव्ह ऑइल घेणे. आता स्क्रब बनवण्यासाठी एका भांड्यात सर्व मिश्रण एकत्र करा, टबमध्ये गरम पाणी घाला, बनवलेलं मिश्रण देखील घाला. या गरम पाण्यात पाय काही वेळ भिजवा. आपले पाय भिजल्यानंतर फोम स्पंजने घासून स्वच्छ करा. शेवटी स्वच्छ पाण्याने पाय धुवा आणि फूट क्रीम लावा. ही प्रक्रिया महिन्यातून एकदा करा. पाय काळपट दिसणार नाहीत.