Join us  

ओठांभोवतीची त्वचा काळी पडलीय? त्यावर उपाय काय, तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 5:17 PM

Skin Pigmentation Disorders ओठांभोवतीच त्वचा काळी पडण्याची कारणं, काही आजाराची लक्षणं तर नाही ना? दुर्लक्ष करणे योग्य नाही

विशिष्ट वयानंतर चेहऱ्यावर पिंपल्स, डाग, मुरूम उठण्याची समस्या सामान्य आहे. त्वचेची योग्य काळजी घेतल्यावर काही डाग निघून जातात. मात्र, काही डाग चेहऱ्यावर तसेच राहतात.  परंतु, चेहऱ्यावर पिगमेंटेशनची समस्या सुरू झाली की महिला चिंतेत पडतात. ओठांच्या भोवतीने अथवा चेहऱ्यावर काळे गडद डाग उठतात. पिगमेंटेशनचे हे डाग काही केल्या निघून जात नाही.

कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. निधी यांनी या समस्येबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी यामागची कारणे काय आहेत हे सांगितले आहे. एवढेच नाही तर तोंडाभोवती पिगमेंटेशनवर उपचार करण्याचे उपायही त्यांनी सांगितले आहेत.

टूथपेस्टची ऍलर्जी

जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग पडत असतील तर, तुमची टूथपेस्ट बदलून पाहा. अनेकवेळा चेहरा टूथपेस्टच्या संपर्कात आल्याने अॅलर्जी सुरू होते, ज्यावर नंतर डाग बनतात. त्यामुळे टूथपेस्ट बदलून पाहणे उत्तम ठरेल.

लिपस्टिक

काही स्वस्त लिपस्टिक महागात देखील पडू शकतात. याने ओठ तर काळे पडतातच यासह चेहऱ्याच्या भोवतीने काळे डाग तयार होतात. लिपस्टिक लावल्यानंतर ओठ व्यवस्थित स्वच्छ न केल्यास ओठ आणि आजूबाजूची त्वचा काळी पडू लागते. त्यामुळे लिपस्टिक लावताना काळजी घेणं आवश्यक.

त्वचेला चाटणे

काही लोकांना ओठ चाटणे अथवा चावण्याची सवय असते. असे केल्याने त्वचेवर काळे डाग तयार होतात. त्यामुळे ओठ आणि चेहरा स्वच्छ ठेवणे आवश्यक.

हार्मोनल पिगमेंटेशन

अनेक वेळा महिलांमध्ये पीरियड्स किंवा प्रेग्नेंसीमुळे हार्मोनल बदल वेगाने होतात. त्यामुळे चेहऱ्यावर पिगमेंटेशनची समस्या सुरू होते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक.

आर्यन कंटेंट वाढणे

शरीरात लोहाचे प्रमाण प्रमाणावर असणे आवश्यक. जर आर्यनचे प्रमाण शरीरात वाढले तर, त्वचेवर डाग दिसू लागतात. त्याचा थेट परिणाम ओठ आणि नाकाच्या आजूबाजूच्या त्वचेवर होऊ लागतो.

व्हिटॅमिनची कमतरता

शरीरात आवश्यक जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे पिगमेंटेशन समस्या होऊ शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक. याशिवाय तुमची तपासणी करून घ्या आणि तुमच्या आहारात योग्य बदल करा.

पिगमेंटेशन दूर करण्यासाठी उपाय

आहारात व्हिटॅमिन सीचा समावेश करा. याशिवाय अल्फा आर्बुटिन, कोजिक अॅसिड, अॅझेलेइक अॅसिडच्या मदतीने पिगमेंटेशन दूर करण्यासाठी त्याचा वापर करा. त्वचारोग तज्ज्ञांच्या मदतीने तुम्ही त्वचेची काळजी घेणारे पौष्टिक आहाराचे सेवन करू शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी