Lokmat Sakhi >Beauty > Blackheads Removal Tips :नाकावरचे ब्लॅकहेड्स, चेहऱ्यावरचे खड्डे, वैतागलात स्वतःलाच पाहून? एका केळ्याचा स्क्रब, समस्या खतम

Blackheads Removal Tips :नाकावरचे ब्लॅकहेड्स, चेहऱ्यावरचे खड्डे, वैतागलात स्वतःलाच पाहून? एका केळ्याचा स्क्रब, समस्या खतम

Blackheads Removal Tips in Marathi : त्वचा स्वच्छ करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे ओट्चे जाडे भरडे पीठ-केळी आणि मधाचा स्क्रब.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 04:17 PM2021-12-14T16:17:14+5:302021-12-14T17:00:29+5:30

Blackheads Removal Tips in Marathi : त्वचा स्वच्छ करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे ओट्चे जाडे भरडे पीठ-केळी आणि मधाचा स्क्रब.

Blackheads Removal Tips in Marathi : Diy tips to remove blackheads at home close skin pores | Blackheads Removal Tips :नाकावरचे ब्लॅकहेड्स, चेहऱ्यावरचे खड्डे, वैतागलात स्वतःलाच पाहून? एका केळ्याचा स्क्रब, समस्या खतम

Blackheads Removal Tips :नाकावरचे ब्लॅकहेड्स, चेहऱ्यावरचे खड्डे, वैतागलात स्वतःलाच पाहून? एका केळ्याचा स्क्रब, समस्या खतम

त्वचेवरील ब्लॅकहेड्सची समस्या महिलांसह पुरूषांमध्येही पाहायला मिळते. त्यांना त्वचेतून बाहेर काढणे देखील खूप वेदनादायक आणि वेळखाऊ काम आहे. त्वचेतून काढून टाकताना थोडीशी चूक झाली तर ते  मुरुमांच्या रूपात देखील वाढू लागतात. अशा परिस्थितीत, कोणत्याही वेदनाशिवाय आणि जास्त वेळ न घेता, आपली त्वचा स्वच्छ करण्यात मदत करत असलेल्या  काही पद्धतींबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. म्हणून आम्ही तुम्हाला ब्लॅकहेड्स काढून टाकण्याचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. (How to remove black heads)

त्यामध्ये तुम्हाला जास्त पैसे गुंतवण्याचीही गरज नाही. कारण हे सर्व घरगुती उपाय आहेत आणि त्यामध्ये वापरल्या जाणार्‍या बहुतेक गोष्टी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात असतात.  तसेच या घरगुती उपायांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. जर तुम्ही तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार आणि त्वचेच्या प्रकारानुसार या टिप्स वापरल्या तर तुम्हाला ब्लॅक आणि व्हाइटहेड्स सारख्या समस्यांबद्दल कधीही काळजी करण्याची गरज नाही आणि तुमचा चेहरा देखील चमकू लागेल.

ओट मिल आणि केळी

त्वचा स्वच्छ करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे ओट्चे जाडे भरडे पीठ-केळी आणि मधाचा स्क्रब. ते कसं तयार करायचे, कसं वापरायचे आणि किती वेळा वापरायचं जाणून घेऊया. 

स्क्रब बनवण्यासाठी आवश्यक गोष्टी

पिकलेली केळी - 1

ओट्स - 1 टीस्पून

मध - 1/2 टीस्पून

प्रथम केळी मॅश करून पेस्ट बनवा. आता ओट्स कुस्करून घ्या किंवा बारीक वाटून घ्या, त्यात मध घाला, केळीच्या पेस्टमध्ये दोन्ही गोष्टी मिक्स करा. तुमचे ब्लॅकहेड्स काढणारा स्क्रब तयार आहे. ते लावण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने धुवा आणि टॉवेलने पुसून टाका.

हा स्क्रब आधी तुमच्या चेहऱ्याच्या त्या भागांवर लावा, जिथे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या जास्त असते. जसे तुमचे नाक आणि तुमच्या नाकाच्या सभोवतालचे क्षेत्र. याशिवाय, तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या टी-झोनवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे. टी-झोन म्हणजे तुमचे कपाळ, नाक आणि हनुवटी. या ठिकाणी तेल सर्वात जास्त येते, त्यामुळे या भागात चेहऱ्यावर काळे आणि पांढरे डाग येतात. हे स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि ५ ते ६ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यानंतर 2 ते 3 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. केस खुप पांढरे झालेत? हेअर कलरनं लपवण्यापेक्षा 'हा' पदार्थ नियमित खाऊन मिळवा काळेभोर केस

जर तुम्ही त्वचेची खुली छिद्रे बंद करण्याचा सोपा उपाय शोधत असाल तर ही पद्धत तुमच्या समस्येवरही उपाय आहे.
केळी-ओट्सपासून बनवलेला हा स्क्रब तुमच्या चेहऱ्यावर लावल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच त्वचा घट्ट, चकचकीत आणि चमकदार वाटेल. हा स्क्रब त्वचेच्या एक्सफोलिएशन आणि हायड्रेशनचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. हा स्क्रब आठवड्यातून फक्त 3 वेळा वापरा, तुम्हाला फेशियलची गरजही भासणार नाही. पातळ केसांमुळे एकही हेअरस्टाईल सूट होत नाही? जावेद हबीबनं सांगितल्या पातळ केसांसाठी खास टिप्स

Web Title: Blackheads Removal Tips in Marathi : Diy tips to remove blackheads at home close skin pores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.