Hair Growth Remedies : केसगळती, केस लांब न होणं किंवा केस चमकदार आणि काळे न राहणं या वेगवेगळ्या समस्यांचा सामना आजकाल जास्तीत जास्त महिलांना करावा लागत आहे. जास्तीत जास्त महिलांना कंबरेपर्यंत लांब आणि चमकदार केस हवे असतात. पण काही कारणांनी किंवा योग्य ती काळजी न घेतल्यानं केस लांब होत नाहीत. अनेक उपाय करूनही हवे तसे केस लांब होत नाहीत. अशात काही नॅचरल उपाय खूपच फायदेशीर ठरतात. असाच एक उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलोय.
महत्वाची बाब म्हणजे या उपायाचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. ब्युटी कंन्टेट क्रिएटर प्रिती प्रेरणानं केसांची वाढ होण्यासाठी एक खास उपाय सांगितला आहे. चला जाणून घेऊ काय आहे हा उपाय.
केसांच्या वाढीसाठी भाताचा वापर
प्रीतीनं एका हेअर मास्कबाबत सांगितलं आहे, ज्यात शिजवलेल्या भाताचा वापर केला जातो. कच्चे आणि शिजवलेले दोन्ही प्रकारचे तांदूळ आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतात. पण अनेकांना हे उपाय माहीत नसतात.
भातामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. ज्यामुळे डोक्याची त्वचा साफहोते आणि केस मजबूत होतात. सोबतच केस हेल्दी राहतात आणि त्यांची वाढही वेगानं होते. अशात जाणून घेऊ हा हेअर मास्क तयार करण्याची पद्धत.
हेअर मास्क बनवण्याचं साहित्य
एक वाटी शिजवलेला भाज
जास्वंदीचे २ ते ३ फूल
कोरफडीच्या एका पानाचा गर
रोज वॉटर स्प्रे बॉटल
कसा बनवाल हेअर मास्क?
सगळ्यात आधी मिक्सरमध्ये भात, जास्वंदीचे फुलं आणि कोरफडीचा गर टाकून चांगली पेस्ट तयार करा. तुमचा केसांची वाढ करणारा हेअर मास्क तयार आहे. हा हेअर मास्क केसांवर लावण्याआधी केस कंगव्यानं आधी मोकळे करा आणि त्यावर गुलाबजल स्प्रे करा. त्यानंतर केसांवर भाताचा हेअर मास्क कावा आणि ३५ ते ४० मिनिटं तसाच लावून ठेवा. नंतर केस साध्या पाण्यानं स्वच्छ करा. केस चमकदार आणि मुलायम झालेले दिसतील.
केसांसाठी फायदेशीर कोरफड
कोरफड ही एक अशी वनस्पती आहे, जी आपलं आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर असते. केसांच्या वेगवेगळ्या समस्या कोरफडीच्या गरानं दूर होतात.
जास्वंदीच्या फुलाचे फायदे
जास्वंदीच्या फुलामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सीडेंट्स, अॅंटी-इन्फ्लमेटरी गुण असतात. सोबतच यातील नॅचरल ऑइलनं डोक्याची त्वचा आणि केसांना पोषण मिळतं.