Join us  

करिनासारखी फ्लॉलेस ग्लोइंग स्किन हवी? फक्त ती करते त्या ३ गोष्टी करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 1:03 PM

बॉलीवुड ॲक्ट्रेस करिना कपूर खानने तिचे ब्यूटी सिक्रेट नुकतेच एका इंटरव्ह्यू दरम्यान शेअर केले आहे. 

ठळक मुद्देबॉलीवुडमधील सगळ्यात नितळ, फ्लॉलेस, रॅडियन्ट स्किन असणारी अभिनेत्री म्हणजे करिना कपूर.

बेबो करिना कपूर खान नेहमीच तिचे सौंदर्य, फिटनेस, प्रेग्नन्सी यासगळ्या गोष्टींबाबत चर्चेत असते. साेशल मिडियावरही करिना कपूर प्रचंड ॲक्टीव्ह आहे. तिच्या फिटनेस टिप्स आणि प्रेग्नन्सी, बाळांतपण यानंतरही तिने स्वत:ला किती फिट ठेवलं आहे, या सगळ्याच गोष्टी अनेक जणींसाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत. यासोबतच करिनाविषयीच्या एका बाबतीत अनेक जणींना कायम उत्सूकता असते, ते म्हणजे तिची ग्लोईंग आणि फ्लॉलेस स्किन.

 

बॉलीवुडमधील सगळ्यात नितळ, फ्लॉलेस, रॅडियन्ट स्किन असणारी अभिनेत्री म्हणजे करिना कपूर. केवळ गोरेपणा हे तिच्या त्वचेचे वैशिष्ट्य नाही. तर तजेलदार आणि चमकदार त्वचेमुळे करिना अधिकच आकर्षक वाटते. म्हणूनच तर करिनाचे झीरो मेकअप फोटोजदेखील नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. करिनाचे लाईफस्टाईल जसे आहे, तशा लाईफस्टाईलमध्ये त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवणे सोपे आहे, आपल्याला हे कसं काय जमणार? असा प्रश्न काही जणींना पडणे शक्य आहे. पण लाईफस्टाईलमध्ये जरी खूप फरक असला तरी करिना तिच्या त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी जे काही उपाय करते, ते आपल्याला घरच्या घरी आणि ते ही अगदी कमी पैशात करणे सहज शक्य आहे. 

 

काय आहे करिनाचे ब्यूटी सिक्रेट१. बदामाचे तेलबदामाच्या तेलाने नियमितपणे त्वचेची मालिश करणे, हे करिनाच्या सुंदर त्वचेचे रहस्य आहे. बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे जर बदामाच्या तेलाने त्वचेला मालिश केली तर त्वचेचे मॉईश्चर तर टिकून राहतेच पण त्यासोबतच डार्क सर्कल, मुरूमांचे डागदेखील कमी होतात. बदामाच्या तेलाने त्वचेचा थकवा दूर होतो आणि त्वचा टवटवीत, तजेलदार दिसू लागते, रंगदेखील उजळतो. तसेच बदामाच्या तेलामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि स्किन टाईट होण्यास मदत होते. त्वचेला अल्ट्रा व्हॉयलेट किरणांपासून संरक्षण देण्याचे कामही बदामाचे तेल करते. म्हणूनच तर करिना बदामाच्या तेलाने त्वचेची मालिश करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व देते. 

 

२. दररोज ३ लीटर तेलपाणी पिणं हा काय सौंदर्य टिकवून ठेवण्याचा उपाय असू शकतो का, असा प्रश्न अनेकजणींना पडतो. पण खरोखरच त्वचेचा नितळपणा टिकवून ठेवायचा असेल, तर योग्य प्रमाणात पाणी पिणं खूप गरजेचं आहे. योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे शरीरात असणारे टॉक्झिन्स शरीराबाहेर टाकण्यासाठी मदत होते. कमी पाणी घेतल्यास अनेक विषारी घटक शरीरात अडकून राहतात आणि त्यामुळे मग त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे बॉडी डिटॉक्स करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणून दररोज न चुकता योग्य प्रमाणात पाणी पिणे. करिनाही हेच करते. योग्य प्रमाणात पाणी घेतल्यामुळे तिच्या त्वचेचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते. काेरड्या त्वचेची एजिंग प्रक्रिया खूप लवकर सुरू होते.

 

३. योगाकरिनाला योगा करणे किती आवडते, हे तिच्या सोशल मिडिया पोस्टवरून नेहमीच दिसून येते. वेगवेगळे फोटो शेअर करून ती योगासनांचे फायदे नेहमीच तिच्या चाहत्यांना पटवून देत असते. योगा हे देखील आपल्या सुंदर त्वचेचे रहस्य आहे, असे करिना सांगते. योगा केल्यामुळे शरीरातून खूप जास्त घाम बाहेर पडतो, घामावाटे शरीरातील विषारी द्रव्येदेखील बाहेर जातात आणि त्वचा नितळ होण्यास मदत होते. तसेच योगा केल्यामुळे रक्ताभिसरण क्रियादेखील सुरळीत होते आणि या सगळ्यांचा सकारात्मक परिणाम चेहऱ्यावर लगेचच दिसून येतो.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकरिना कपूर