Join us  

अनुष्का शर्मा ते आलिया भट, पाहा तुमची आवडती अभिनेत्री केसांना कोणतं तेल लावून मसाज करते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2024 5:51 PM

Bollywood Actresses Hair Care Secrets : या ५ बॉलीवूड अभिनेत्री केसांना खोबरेल तेल लावतात आणि..

बॉलीवूड अभिनेत्रींसारखे सुंदर केस आपलेही असावेत, असं नेहमी वाटतं (Bollywood Actress). प्रत्येक महिलेला एकदातरी अभिनेत्रींप्रमाणे केस आणि तेजस्वी स्किन दिसावी असे वाटले असेल (Hair Care Secrets). आपल्याला वाटत असेल अनेक अभिनेत्री केसांवर महागडे ब्यूटी उत्पादनांचा वापर करीत असतील (Hair Care Routine).

पण असे नाही आहे, काही नायिका आपल्याला केसांवर नैसर्गिक घरगुती गोष्टींचा वापर करतात. ज्यामुळे त्यांचे केस नैसर्गिकरित्या सुंदर आणि घनदाट दिसतात. अभिनेत्री आलीया भट ते अनुष्का शर्मा कोणती अभिनेत्री केसांची निगा राखण्यासाठी कोणत्या उत्पादनांचा वापर करतात? पाहूयात(Bollywood Actresses Hair Care Secrets).

अनुष्का शर्मा

अनुष्काचे केस घनदाट आणि काळेभोर आहेत. ती केसांवर खोबरेल तेलाचा वापर करते. ती केसांना खोबरेल तेल कोमट गरम करून स्काल्पला तेल लावून मसाज करते. यामुळे स्काल्प निरोगी आणि केस मजबूत राहतात.

उपमा करताना रव्याच्या गुठळ्या होतात? १ भन्नाट ट्रिक; नाश्ता सेंटरला मिळतो तसा उपमा होईल भन्नाट

कतरिना कैफ

कतरिना कैफचे केस फार सुंदर आणि आकर्षक दिसतात. ती आपल्याला केसांवर फ्रुट ऑईलचा वापर करते. याशिवाय नियमित हेअर स्पा आणि कंडिशनिंग हे कतरिनाच्या सुंदर केसांचे रहस्य आहे.

प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपल्याला केसांवर घरगुती उपायांचा वापर करते. या अभिनेत्रीच्या हेअर केअरचे रहस्य दही आहे. अर्धा कप दह्यात दोन लिंबाचा रस मिसळा आणि स्काल्पवर लावा. ३० मिनिटानंतर केस शाम्पूने धुवा. यामुळे केसांना नवी चमक येईल.

करीना कपूर खान

करीना महिन्यातून एकदा स्काल्पवर तेल लावून मसाज करते. तिला एरंडेल तेल, ऑलिव्ह ऑईल , बदाम आणि खोबरेल तेलाने मसाज करायला आवडते.

नवीन चपला चावतात, फोड येतात-चालणं मुश्किल? ४ घरगुती उपाय- नव्या चपला घाला बिंधास्त

आलिया भट

आलिया दररोज भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए युक्त पदार्थ खाते. त्याच्या दुसऱ्या दिवशी स्काल्पवर तेल लावून मालिश करते आणि शाम्पूने केस धुते. यामुळे केसांमधील घाण निघून जाते.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्सबॉलिवूड