Lokmat Sakhi >Beauty > दिवाळीतील कामाच्या व्यापातून कंटाळात, चेहऱ्यावरील थकवा दूर करतील 'हे' घरगुती फेसपॅक

दिवाळीतील कामाच्या व्यापातून कंटाळात, चेहऱ्यावरील थकवा दूर करतील 'हे' घरगुती फेसपॅक

Diwali Facepack दिवाळीचा थकवा चेहरा आणि डोळ्यांपासून दूर करा, घरगुती फेसपॅक लावा, मिळेल लगेच आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 07:01 PM2022-10-27T19:01:35+5:302022-10-27T19:02:52+5:30

Diwali Facepack दिवाळीचा थकवा चेहरा आणि डोळ्यांपासून दूर करा, घरगुती फेसपॅक लावा, मिळेल लगेच आराम

Bored from busy work in Diwali, these homemade face packs will relieve facial fatigue | दिवाळीतील कामाच्या व्यापातून कंटाळात, चेहऱ्यावरील थकवा दूर करतील 'हे' घरगुती फेसपॅक

दिवाळीतील कामाच्या व्यापातून कंटाळात, चेहऱ्यावरील थकवा दूर करतील 'हे' घरगुती फेसपॅक

दिवाळी या पाच दिवसांच्या सणाच्या तयारीला सगळेच जण महिनाभराआधीपासूनच लागतात. संपूर्ण घराची साफसफाई, फराळ, गोड पदार्थ बनवणे, शॉपिंग इत्यादी. अश्या अनेक गोष्टी महिलावर्ग उत्साहाने करत असतात. यासह आपल्या घरच्यांसाठी देखील ती धावपळ करत असते. मात्र, दिवाळी संपल्यानंतर काहीसा थकवा महिलांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. तुम्हालाही दिवाळीच्या मुहूर्तावर काम करून कंटाळा आला असेल तर खास प्रभावी फेसपॅक लावा. हा फेस पॅक लावल्याने तुमच्या चेहऱ्याचा थकवा काही दिवसातच निघून जाईल. चला तर मग जाणून घेऊयात, थकवा दूर करण्यासाठी चेहऱ्यावर कोणता घरगुती फेस पॅक लावावा ?

नारळाच्या दुधाचे फेसपॅक

चेहऱ्याचा थकवा दूर करण्यासाठी नारळाच्या दुधाचा फेस पॅक लावा. यासाठी १ चमचे नारळाचे दूध घ्या. त्यात १ चतुर्थांश हळद घाला. त्यानंतर कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. सुमारे 15 मिनिटे फेसपॅक चेहऱ्यावर ठेवणे. त्यानंतर चेहरा धुवा. यामुळे थकवा दूर होईल. यासोबतच टॅनिंग आणि मुरुमांच्या समस्यांपासूनही सुटका मिळेल.

काकडी करेल डोळ्यांचा थकवा दूर

दिवाळीच्या कामामुळे केवळ चेहऱ्यावर थकवा जाणवत नाही तर डोळ्यांनाही थकवा जाणवतो. यासाठी काकडीचे काप कापून काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर हे तुकडे डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होईल. आणि आपणास फ्रेश देखील वाटेल.

बदामाची पेस्ट गुणकारी

चेहऱ्याचा थकवा दूर करण्यासाठी कच्च्या बदामाचे दूध उपयुक्त ठरेल, हे दूध चेहऱ्यावर लावावे. पेस्ट बनवण्यासाठी बदाम रात्रभर भिजत ठेवा. यानंतर सकाळी बारीक पेस्ट करून चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा मऊ करतात. यासोबतच तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी देखील हे गुणकारी आहे.

Web Title: Bored from busy work in Diwali, these homemade face packs will relieve facial fatigue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.