'लग्न' हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप मोठा महत्वाचा क्षण असतो. आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. आपले लग्न ठरले असेल आणि येणाऱ्या काहीच दिवसांत 'ब्राईड टू बी' होणार असाल तर आपल्या पार्लरच्या फेऱ्या वाढतात. लग्नासारख्या खास प्रसंगी सुंदर दिसण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखांसाठी अनेक ट्रिटमेंट्स करून घेतो. यातही स्किनकडे विशेष लक्ष दिले जाते. लग्नात आपली स्किन सुंदर दिसावी, स्किन ग्लो अधिक उठून दिसावा म्हणून पार्लरमध्ये स्किनवर अनेक उपाय केले जातात. असे असले तरीही स्किनवर मनासारखा ग्लो येण्यासाठी नेहमी पार्लरलाच जावं असं काही नाही(Bridal Glow Home Remedy).
घरच्याघरी काही वस्तूंचा वापर करून तुम्ही (Bridal skin care routine at home naturally) पार्लरसारखा ग्लो मिळवू शकता. अनेकदा बाहेरच्या क्रिम्समध्ये केमिकल्सयुक्त घटकांचा वापर केला जातो ज्याचा चेहऱ्यावर तात्पुरता परिणाम दिसतो. लग्नासारख्या खास प्रसंगी स्किनवर असा तात्पुरता ग्लो आणण्यापेक्षा काही घरगुती उपाय करुन नॅचरल स्किन ग्लो आणणे केव्हाही चांगलेच. घरात उपलब्ध असणाऱ्या काही नॅचरल पदार्थांचा वापर करून लग्नासाठी स्किनवर सिलेब्रिटींसारखा ग्लो येण्यासाठी वापरुन पहा हा खास फेसमास्क. ब्रायडल ग्लो येण्यासाठी फेसमास्क तयार करण्याची सोपी कृती पाहूयात(Home Remedy For Glowing Skin For That Bridal Glow).
साहित्य :-
१. तांदुळाचे पीठ - १ टेबलस्पून २. मसूर डाळ पावडर - १ टेबलस्पून ३. दही - १ टेबलस्पून ४. काकडीचा रस - १ टेबलस्पून ५. मध - १ टेबलस्पून
कृती :-
१. एका बाऊलमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून तांदुळाचे पीठ, मसूर डाळ पावडर, दही, काकडीचा रस असे सगळे पदार्थ घ्यावेत. आता चमच्याच्या मदतीने हे सगळे पदार्थ व्यवस्थित ढवळून एकजीव करून घ्यावे. आपला ब्रायडल ग्लो फेसमास्क वापरण्यासाठी तयार आहे.
गरबा खेळून घाम येतो - मेकअप पसरू नये म्हणून 'असा ' करा वॉटरप्रूफ मेकअपबेस...
कुरळे केस हवे की कर्ल्स? नवरात्रात गरबा खेळायला जाताना चटकन करा २ भन्नाट उपाय...
या फेसमास्कचा वापर कसा करावा ?
जर तुमचं लग्न ठरलं असेल तर त्वचेचा पोत सुधारण्यासाठी चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी किमान महिनाभर आधी तुम्ही हा होममेड फेस मास्क लावू शकता. चेहऱ्यावरचे काळे डाग, पिग्मेंटेशन निघून जाण्यासाठी हा मास्क उपयोगी ठरतो. आपल्याला हा मास्क स्किनवर रोज किंवा आठवड्यातून किमान ४ वेळा तरी लावायचा आहे. हा फेसमास्क स्किनवर लावल्यानंतर २० ते २५ मिनिटे तसाच ठेवायचा आहे.
हा ब्रायडल ग्लो फेसमास्क वापरण्याचे फायदे...
१. तांदुळाचे पीठ :- तांदुळाचे पीठ चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.२. मसूर डाळ पावडर :- मसूर डाळ एक नैसर्गिक एक्सफोलिएटर प्रमाणे काम करते. ज्यामुळे आपल्या त्वचेचा रंग उजळ होण्यास मदत होते.३. दही :- दही त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते. जर चमकदार चेहरा हवा असेल तर तुमच्यासाठी दही फायदेशीर ठरू शकते.४. काकडीचा रस :- स्किनवरील काळे डाग नाहीसे करून चमकदार, मऊ स्किन साठी काकडीचा रस उपयोगी ठरतो. ५. मध :- त्वचा उजळ आणि चमकदार होण्यास मध फायदेशीर असते.